देवाचिया भेटी (श्री परळी वैजनाथ जोतिर्लिंग देवस्थान)भाग -०८
देवाचिया भेटी
(श्री.परळीवैजनाथ ज्योतिर्लिंग)
भाग-०८
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
**************************
...नानाभाऊ माळी
कोण मी कुणासंगे
पुढे चाललो आहे
शोधित स्वतःलाही
कधी ना कळलो आहे!🚩
खेळ हा भ्रमाचा
युगानयुगे सुरूचं आहे
कळले ना कुणासही
हा कठीण बुरुज आहे!🚩
'अंतर' या शब्दातून अनेक गोष्टींचा अर्थबोध होत असतो!इंग्रजीमध्ये आपण space म्हणतो!कधी distance म्हणतो!जेथे भावनेचा उमाळा जन्म घेतो तेथे space चां निश्चितचं काहीतरी संबंध असावा! space शब्दातून 'अंतराळ डोळ्यासमोर येतं असतं!अंतराळ अतिविशाल आहे!कल्पना करवत नाही इतकं विशाल आहे!पण कल्पनेत जाऊन येऊ शकतो!खरचं अंतरळाचीं पोकळी अगम्य आहे का?अनाकलनीय आहे?किलोमीटर मध्ये मोजता येतं नाही इतकं अनाकलनीय आहे!त्याची निर्मिती कल्पनेच्या बाहेर असावी!अंतराळ पोकळी अर्थात space मानवी मनाच्यां पलीकडे असावं!निर्मितीचा ऐतिहासिक सिद्धांत सांगितला जातो!इतिहास तंतोतंत जुळत नसतोच!सगळं काही चमत्कारिक,अनामिक, आगम्य अनाकलनीय असतं!याला ब्रह्मांड म्हणतं असतो का?🚩
ब्रह्मांड नजरेत भरल्यावर देवत्व ओढीचा सिद्धांत हृदयाला ओढायला लागतो!सत्यत्वाकडे घेऊन जाणारं space गृहीतक हृदयाला पोहचत असतं!धार्मिक आस्थेकडे नेत असतं!का कोण जाणे आपण श्रद्धाळू होऊ लागतो!श्रद्धा अंतरात्माचा खोल बोल असतो!शतकानू शतके मागे गेलें असतील,दृश्यरूपात श्रद्धेच्यां खाणाखुणा बोलावित असतात! भावनेच्या तराजूत आपण श्रद्धेचं सकारात्मक मोजमाप करू लागतो!सश्रद्ध होऊन नतमस्तक होऊ लागतो!विज्ञातील गृहीतकं भावनेच्या तराजूत मोजू लागतो!भावना जडल्यावर बुद्धी हृदयात जाऊ पहाते!हृदय बुद्धीच्या पदरी सुसंस्कारीत जगण्याचं मापट टाकते!.....बघा ना!!धार्मिक सश्रद्ध भावनेतून पाहिलं तर दिसतंय...ज्याचां प्रारंभ माहीत नाही,शेवटही माहीत नाही!असाही अनादी अनंत,या space पोकळीचा अनाकलनीय, गूढ स्वामी जटाधारी भगवान शंकर असावा!हिचं सश्रद्ध भावना हृदयात उतरते आहे असं समजू या!महादेव अनादी अनंत आहे!त्याच्या अस्तित्वाच्यां अनंत अख्यायिका सांगितल्या जातात! पिढ्यानं पिढ्या आपण ऐकतो आहोत!भारतात अनंत प्राचीन मंदिरं शिवास्तित्वाची ग्वाही देतअनंत काळा पासून उभी आहेत!....आम्ही यात्रेकरू दिनांक ०२ एप्रिल २०२४ रोजी अंबाजोगाई योगेश्वरी मातेच दर्शन घेऊन श्री.परळीवैजनाथ महादेवाकडे निघालो होतो!🚩
मी माझा असूनही
माझाचं होत नसतो
अहो आहे भ्रम सारा
भास मृगजळ आहे!🚩
सूर्य साक्षी असतो
सत्ता हाती घेऊन
रात्र निघून जाते हो
प्रकाश ठसे मागे ठेवून!🚩
महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई पासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर परळीवैजनाथ आहे!रस्ता घाट माथ्याचा असला तरी उत्तम आहे!श्री.परळीवैजनाथ १२ ज्योतिर्लिंगां पैकी एक असून ०९ वे जोतिर्लिंग आहे!बघा ना,अंबाजोगाई पासून फक्त २५ किलोमीटर अंतर आहे!योगेश्वरी माता अर्ध शक्तीपीठ आहे तर परळीवैजनाथ ज्योतिर्लिंग आहे!अशी प्राचीन अख्यायिका आहे की....... लंकाधिपती रावण महाशिवभक्त होता!कैलासातं महादेवास प्रसन्न करून रावण शिवलिंग घेऊन लंकेकडे निघाला होता!जाता जाता एका ठिकांनी त्याला लघुशंका आली होती!त्यानें गुऱ्हाकी असलेल्या देवाच्या हाती दिली होती!वजन खूप असल्यामुळे भार पेलवनं शक्य नव्हतं!वजन सहन न झाल्याने ते शिवलिंग श्री गणेशानी तेंथेचं जमिनीवर ठेवले!शिवलिंग तेथेचं स्थापित झाले!त्या ठिकाणाचं नाव श्री.परळीवैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळं म्हणून प्रसिद्ध पावले होते! येथील मंदिरं अतिशय टणक काळ्या पाषाणातील आहे!कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता!
मराठवाड्यात असलेली श्रद्धा तीर्थक्षेत्रे अन मंदिरं म्हणजे दगडातील अप्रतिम कलाशिल्प आहेतं!प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रवाही द्योत्तकं आहेत!तेथे जाऊन नतमस्तक व्हावं!जीवनाभूतीचा अध्यात्मिक अन आत्मिक सुख शोधावं!आनंद घेत जगावं!नवी दृष्टी घेत जगावं!मन अन अंतरात्म्याचीं कल्पनातीत नाळ जोडून जगावं!भगवंतास हृदयी घ्यावं क्षणभंगूर जगण्यातून सश्रद्ध भक्कम मार्ग बनवून घ्यावा!देवाचं अगम्य, अनाकलनीय रुपाला नतमस्तक व्हावं!देवदर्शन घेत अनादी अनंतांचां सोईस्कर रस्ता बनवून घ्यावा!ज्याची सुरुवात अन शेवटीही कळतं नाही,ज्ञात नाही अशा महादेव स्वरूप परळी वैजनाथांच्यां दर्शनाला गेलो होतो!
माणसं एकमेकांना space देत जगत असतात!space ऐवजी स्पर्शातून जगणं आंतरिक सुख देत असतं!महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून पाहावा!भावविभोर होत सुखाणंद होतो!होणारा हा आनंद अनंत काळ टिकत असतो!साक्षात ज्योतिर्लिंग महादेवास शरण गेलो होतो!श्री. परळीवैजनाथ महादेव भक्त वत्सल आहे!भोळा आहे!सेवेस प्रसन्न होतो!माणसांना मोकळीक हवी असतें!
देवास सवड असतें!महादेवाचं space अतिविशाल आहे!आम्हा सर्वांना सामावून घेण्याइतपत मोठं आहे!इथं अंतर(distance )पुसलं जातं असतं!येथे अंतरात्म्याच्या आवाजातून पुकारा होत असतो!हर हर महादेवाचा जय जयकार होत असतो!अशा भावभोळ्या श्री.परळी वैजनाथांकडे भावफुलं वाहायला गेलो होतो!स्वतःसं अर्पण करण्यासाठी गेलो होतो!🚩
कडक उन्हाळा होता!चटका बसत होता!मंदिरात शीतलता होती!महादेवाच्या विशाल शांत स्वरूपाचं दर्शन होतं!अखंड पाषाणातील अतिशय सुरेख गर्भगृहात मन प्रसन्न झाले होते!अशी अख्यायिका सांगितली जाते की श्री.परळी वैजनाथ महादेवाचा विवाह श्री.योगेश्वरी मातेशी होणारं होता!पण पहाट झाली!अंबाजोगाईतील विवाह मंडप दगडात रूपांतर झालं होतं!विवाह होऊ शकला नव्हता!श्री परळी वैजनाथ महादेव येथेच राहीलें!....असं म्हणतात की देवदर्शनानें पाप मुक्त होतं असतो!वाईट कर्मास मन धजावतं नसतं!अशा भोळ्या भाबळ्या महादेवाच्या चरणी स्वतःस अर्पण करण्या गेलो होतो!श्री.परळी वैजनाथ येथे गेलो होतो!अंतःकरण समाधानाने न्हावून निघालं होतं!या जन्माचं सार्थक झालं होतं!🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ एप्रिल २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment