देवाचीया भेटी (नारायण बेट )भाग -०१
देवाचीया भेटी
(नारायण बेट)
(भाग-०१)
🚩🚩🚩🚩
***************
... नानाभाऊ माळी
मन झाले उतावीळ
गावोगावी रें चाललो
देव शोधाया निघालो
कष्ट भक्तीतून गेलो!🚩
श्वास माझा देव झाला
श्रद्धेतं चिंब मी न्हालो
भेट अंतरीची होई ना
देव गाभाऱ्यात गेलो!🚩
देव दगडात बंद
देव दर्शनासी आलो
अश्रू वाहती रोज रोज
तुझा बंदिवान झालो!🚩
भेट होई ना रें तुझी
आंसू घेऊनियां आलो
असा दगडाचा रें देव
आज भेटावया आलो!🚩
देव भावाचा भुकेला असतो!भाव तेथे देव असतो!देवाला अंतःकरणात ठेवण्यासाठी एकचित्त व्हावं लागतं!एकचित भावावस्था देवाजवळ नेत असतें!देवाची ओळख करून देत असतें!व्याकुळता जन्मावी लागते!ओढ लागल्याशिवाय भक्तीअमृत मिळत नाही!🚩
आम्ही आज दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी सहा वाजता शतायु जेष्ठ नागरिक संघ आयोजित देव अंतरी ठेवण्यास निघालो होतो!देवामृताचे थेंब प्राप्त करण्यास हडपसर,पुण्याहून निघालो होतो!देव दर्शनाला निघालो होतो!यात्रेला निघालो होतो!देवदर्शन खरचं कठीण असतं का हो? भाजल्या शिवाय भाकर नाही!कष्टा शिवाय देह नाही!भक्तीच्या ओढी शिवाय देव नाही!
देव शोधता शोधता माणसं ओळखीत स्वतःस जाणण्या यात्रेला निघालो होतो!देव चरणाशी माथा टेकन्या निघालो होतो!हडपसर पुण्याहून सोलापूर रस्त्यावर आमची बस पळत होती!सूर्यनारायण झोपेतून उठण्या आधी आम्ही अंतरिच्यां साध्याकडे निघाली होतो!पवित्र,सात्विक हित साधण्यासाठी निघालो होतो!चंदन सुगंधापाशी स्वतःस अर्पण करण्या निघालो होतो!🚩
सकाळचें आठ वाजले होते!सोलापूर महामार्गावर यवत गेल्यावर एका मंगल कार्यालयाबाहेर सूर्यसाक्षीनें नाश्ता उरकला!पुढे चौफुला नंतर आमची बस चार-पाच किलोमीटरवर असलेल्या नारायण बेटाकडे वळली!
सर्व प्रथम तीनमुखी श्री दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतलं!गाभाऱ्यातील श्री गुरुदत्तानां हृदयी बसविले!मंदिराचं दगडी बांधकाम शिल्पकलेंचा उत्तम नमुना आहे!मनोभावे प्रदक्षिणा मारून पुढे नारायण महाराज समाधी मंदिराकडे गेलो!दौंड तालुक्यातील नारायण बेट भक्तीचं अढळ स्थान आहे!नारायण महाराजांच्या विशाल अन अलौकिक योगदान हृदयात खोलवर जाऊन बसले!🚩
नारायण बेट येथे सद्गुरु नारायण संस्था ट्रस्ट आहे!येथे महाराजांची समाधी आहे!येथे तीनमुखी दत्तमंदिर आहे!नारायण महाराज कर्नाटकातून या स्थळी आले असावेत!महान कार्य म्हणजे दौंड तालुक्यातील केडगाव येथील ख्रिस्त मिशीनरी कडून होणाऱ्या धर्म प्रसारास अध्यात्मिक तत्वज्ञानातून भक्तीमार्ग दाखवत उत्तर दिले होते!आयुषभर अध्यात्माचां अर्थ सांगत सगुण भक्तीचा साधा सरळ मार्ग दाखविला होता!नारायण बेट येथील सेवाकार्य विशाल स्वरूपाचं असावं!जवळपास दोन-एकशे ऐकर जमीन या देवस्थानच्या नावे आहे!नारायण बेटातील घरं दीडशे ते दोनशे वर्षांची असावीत!दगडी बिल्डिंग अन बांधकामाचा अतिशय सुंदर अन अप्रतिम नमुना पहायला मिळतो!सुंदर मंदिर आणि श्रद्धा दोन्ही एक होऊन कार्य करीत असाव्यात!साभोवतालचा सर्व परिसर शांत, प्रसन्न होता!सद्गुरू नारायण महाराजांचं आसन चाळीस किलोचे आहे असं म्हणतात!आम्ही समाधीचं दर्शन घेतलं!श्रद्धास्थानी एकरूप होता आलं!त्या परिसरातील जागेवर चौफेर कडू लिंबाची झाडं दिसतं होती!सावली सोबत शुद्ध प्राणवायू देखील देत होती!संत देवाचे लाडके असतात!आम्ही भक्त संतांचे लाडके होण्याचा कसोशीने प्रयत्न करण्याचा मानस केला अन पुढील देवदर्शनाला निघालो!🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१ एप्रिल २०२४
(आज पंढरपूर मुक्कामी)
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment