देवाचीया भेटी (आकलाईमाता मंदिर ग्रामदैवत-अकलूज)भाग-०5
देवाचीया भेटी
(आकलाईमाता मंदिर ग्रामदैवत- अकलूज)
भाग-०५
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
***********************
... नानाभाऊ माळी
प्रवासातील सुंदर घरं ही
आम्ही मंदिरं म्हणतो त्यांला
जिथे भक्तीने वाकते मान
समर्पित करीतो देह त्यांला!🚩
यात्रा आम्हा कष्टाचा देव
शोधित फिरतो दारोदारी
देह अपुला झिजूनी जावा
आपुली पूर्ण व्हावी वारी!🚩
प्रवास होतो दारोदारी
सुखशांती घेण्यासाठी
पर्यटन नव्हे यात्रा सारी
देव दरबारी जाण्यासाठी!🚩
कधी कधी वाटत,आपण भरकटलेलो तर नाही? मनाला शांती नाही!उदविग्न मनस्थितीतं जगणं सुरूच असतं!भरकटलेपण असतं तरी कसं मग? जेव्हा आपण ताण तणावातून मानसिक आजारपण घेऊन हिंडत असतो!जगण्याला अर्थ राहात नाही!सर्व नकोसं वाटतं!रस निघून गेल्यासारखं वाटत!एकटेपणाचं भूत मनाचा कोंडमारा करीत असतं!सर्वचं मनाविरुद्ध घडत असतं!घर, दार, गल्ली, समाजात कुठे कुठे जावस वाटत नाही!मानसोपचार तज्ञ देखील हात टेकतात!अशा नकोशा अवस्थेत कोणीतरी फुंकर मारीत असतं!
भावनेचा कोंडमारा असह्य असतो!शरीरिक जखमेच्या वेदनेहून असह्य असतो!वेदनाशामक,वेदनानाशक औषधं भेटतात!त्याचं मार्केट वेगळं असतं!हे मार्केट भावनेला आवाहन करीत असतं!मानसिक विस्कटलेपणाचं अंशता निराकरण करीत असतं!विज्ञान थांबल्यावर सुज्ञानाचं दार उघडत असतं!सुज्ञानाचा ऊर्जास्रोत अध्यात्म असतं! अध्यात्माच्या उपचाराने मानसिक दोलायमान अवस्था स्थिरतेकडे मार्गक्रमण करू लागते!आध्यत्मिक गोडी लावणारे तज्ञ संतमहात्मा असतात!भक्ती मार्गातून श्रद्धावस्थेकडे घेऊन जाणारे आध्यात्मिक महात्मे पूजनीय होतात!देवत्वाला पोहचलेले असतात!मन विकारावर मनन, चिंतन, उपासना, योगा, व्यायाम सारखे गुणकारी औषधी देऊन माणसांवर उपचार सुरु होतो!सदाचाराचां सात्विक नितीधर्म शिकविणारे गुरु सर्वसामान्य माणसासं देवाची ओळख करून देत असतात!
आम्ही दिनांक ०१ एप्रिल २०२४ रोजी श्री.ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपाशीर्वादानंतर पुढील देवदर्शन मार्गांवर निघालो होतो!डोळे अन मन अस्थिरतेकडून स्थिरतेकडे प्रवास करीत होते!चंचलतेकडून ज्ञानगर्भाकडे वाटचाल सुरु होती!देवदर्शनाची तृष्णा व्याकुळ करीत होती!बस पळत होती!जातांना आमच्या मार्गांवर एक अंत्यविधी दिसला होता!लोक समुदाय जमला होता!अंत्यविधीतील देह चंदनातं जळत होता!लाकडातून विस्तव, विस्तवातून राखेत जातांना दिसला होता!भस्म होतांना दिसत होता!स्मशान भूमीत स्मशान शांतता होती!रक्ताचे,जवळचे अश्रू गाळीत होते!स्मशानातील दृश्य पाहून डोळ्यात न सांगताही पाणी आलं होतं!का कोण जाणे अर्थ समजत नव्हता!वेळ काळाप्रमाणे सर्वांना जायचंचं आहे!आमची बस हळूहळू पुढे जात होती!स्मशानातील ते दृश्य डोळ्यासमोर येत होतं!मनात आलं...'आपण जीवंत आहोत तोवर चांगलं ते वाटत राहू!नंतर सरणावर जायचंच आहे!मी,माझा स्वार्थ गळून जाऊ देऊ!' खरचं दुसऱ्यांसाठी जगता येतं,थोडं जगून पाहू!डोळे पुढील दृश्य टिपण्यात सरसावले होते!🚩
अर्ध्या तासानंतर सोलापूर जिल्यातील अकलूज जवळ पोहचलो होतो!एका उंच टेकडावर बस थांबली!खूप मोठी फळबाग अन मसाले उपयुक्त झाडांची विशेष बाग होती!बागेत अतिशय सुरेख अन सुंदर बांधकाम असलेलं आनंदी गणेशाचे मंदिर होतं!मंदिराचे बांधकाम आधुनिक पद्धतीच होतं!श्री गणेशासमोर मनोभावे नतमस्तक होत आपोआप हात जोडले गेले होते!श्री गणेशाच्या सुंदर मूर्तिकडे पाहात राहावेसे वाटत होत!विघ्नहर्त्याच्या पायांवर डोकं ठेवलं!तेथून जवळच असलेल्या महादेव मंदिरात गेलो!बाहेर उभे असलेले नंदी एकाग्रतेने महादेवाच्या पिंडीकडे पाहात असलेले दिसलें!आम्ही देखील शंभु महादेवाच्या पिंडीवर हस्तस्पर्श करीत माथा टेकवला होता!महादेव शिव हृदयात ठेवून बसवून अकलूज शहराकडे निघालो होतो!शहराच्या बाहेर सयाजीराव वॉटर पार्क आहे!भव्य-दिव्य आहे!आम्ही वेळे आम्ही वेळेअभावी तिकडे गेलो नव्हतो!
अकलूज आशिया खंडातील सर्वात प्रगत ग्रामपंचायतीचं शहर आहे!अनेक सुविधा उपलब्ध आहेत!येथील राजकीय महत्वाकांक्षा अन नेतृत्वास याचं श्रेय द्यावं लागेल!शहर देखील उत्तमरित्या वसंविले आहे!येथील आकलाई माता देवी अकलूजचं ग्राम दैवत आहे!संध्याकाळी पश्चिमेस सूर्यनारायण आपला रथ क्षितिजापलीकडे घेऊन निघाला होता!थकलेला सूर्यदेव विश्रांतीसाठी पलीकडे निघाला होता!पश्चिमेसं तांबूस छटा पसरू लागली होती!मावळत्या समयी आम्ही अकलूजचीं आकलाई देवीचं दर्शन घेत होतो!
अतिशय भव्य दिव्य प्रवेशद्वारातून आत निघालो होतो!सभोंवतालचा सुंदर परिसर मन वेधून घेत होतं!आकलाई देवीच्या मंदिरातील शांत वातावरण हृदयाला भावलं होतं!
गर्भगृहातील देवीची मूर्ती आशीर्वाद देत होती!रांगेने देवीमूर्ती जवळ गेलो अन दोन्ही हात जोडले गेले होते!देवीची मूर्ती डोळ्यातून हृदयात बसवत होतो!अकलूजच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेत होतो!सूर्यनारायण कधीच पश्चिमेला क्षितिजापलीकडे निघून होता!अंधाराच्या गडद छायेत अनंत प्रकाशित पथदिवे उजेड देत होते!आकालाई माता मंदिर देखील प्रकाशात उजळून निघाले होते!मातेचा नमस्कार करून आशीर्वाद घेत बसमध्ये जाऊन बसलो!अंधारात दिव्यांच्या उजेडसाक्षीने बस पंढरपूरकडे निघाली होती!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०६ एप्रिल २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment