२३मार्च २३ वा स्मृतिदिन
२३ मार्च २३वा स्मृतिदिन
💐💐💐💐💐💐
*********************
... नानाभाऊ माळी
२३मार्च २००० या दिवशी एका वातीची ज्योत अखंड उजेड देत असतांना अचानक मावळली होती!एका ज्ञानज्योतीचं अकस्मात निधन झालं होत!अखंड ज्ञानदानात मन-शरीर झिजवित असतांना तोंड ज्ञानवृक्ष अचानक कोलमडला होता!ज्ञान माऊलीच्या ज्ञानदानाने प्रकाशमान झालेल्या संपूर्ण परीवारावर मोठा आघात झाला होता!मोठा धक्का होता!असहनीय धक्का होता तो!दाटलेल्या कंठातून रडणे अन डोळ्यातून अश्रू ओघळत होते!जणू सर्वस्व देवाने हिरावून नेलं होतं!
पूण्यातल्या हडपसर भागातील ससाणे नगर हे अत्याधुनिक नगर म्हणून ओळखले जात आहे!थोर समाज सुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुलें यांच्या सुनबाईचं अर्थात सुपुत्र डॉ. यशवंत फुलें यांच्या पत्नीचं माहेरचं नाव ससाणे होतं!त्यावेळेस कदाचित ससाणेनगर नसेलही!ससाणें मळ्यातील घरं असतील!कदाचित ससाणे वस्ती असेल!ससाणे माळावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्वतःच्या पाठीवर पटकीच्या साथीचें रोगी घेऊन जात असतं!अशा थोर ज्ञानसाध्वीच निधन ससाणें माळावर पटकी साथीच्यां रोगीनां घेऊन जातांना झालं होतं,असं म्हणतात!क्रांतीज्योतीचीं ज्योत महान कार्यानंतर विसावली होती!मालवली होती!अखंड मानव समाजाला अतिशय दुःख झालं होतं!त्या दिवशी प्रकाशमान सूर्यही ढगाआड अंधारात गेला असावा!अंधारात त्यानें स्वतः अश्रू गाळली असावीत!चौफेर अंधार पसरला असावा!ज्ञानी महापुरुष,ज्ञानयोगिनी सर्व सामान्यांना ज्ञानरस पाजून निघून जात असतात!अद्वितीय कार्य करून निघून जातात!मागे इतरांच्या डोळ्यात अश्रू ठेवून जात असतात!💐
पेहरलेलं उगवत राहातं!मातीचीं मेहनत झालेली असतें!आकाशातील चांदणं जमिनीवर दिसावं!चौफेर टिप्पूरं प्रकाश दिसावा तसा समाज ज्ञानी होऊन पुढे जात असतो!अवघ्या समाजाला ज्ञानामृत पाजून,ज्ञानी निघून गेले!ज्ञानप्रकाश देऊन गेलेत!ज्ञानाधांर दूर व्हावा!त्यांच्या स्मृती ह्या ...पुण्यतिथी,जयंती अन सततच्या विशाल कार्याढावातून जागृत रहाव्यातं म्हणून काल चक्राचं चाक काळाला घेऊन फिरतं आहे!वेळेच गणित घेऊन फिरतं आहे!तास, दिवस, महिने अन वर्ष घेऊन फिरत आहे!अनेक वर्ष संपली!💐
परवाचं २३मार्च रोजी २३वर्ष पूर्ण झालीत!रोपट्याचं झाड झालं!एक एक वर्षांनी झाडाच्या अनेक फांदया विस्तारत गेल्या!स्मृती हृदयात जपून ठेवत मार्ग क्रमण चालूच आहे!२३ वर्ष म्हणजे दोन तपं आहेत!तपात तापून स्मृती उजाळा सुरूच आहे!ज्योतीची वात अखंड जळत आहे!जळतांना ज्ञान उजेड देणं सुरूच आहे!💐
पाच हजार विध्यार्थी!दोनशे ज्ञानदान देणारे शिक्षकवृंद!वारजे माळवाडी ते लोणी काळभोर पर्यंत ज्ञानशाळांचा विस्तार!विध्यार्थी म्हणजे कच्ची माती असतें!शिक्षक कुंभार होऊन कच्च्या मातीवर योग्य संस्कार करून,घडवून भाजून पक्के मडके बाजारात पाठवीत आहेत!दर वर्षी सुसंस्कारीत विध्यार्थी घडवीत आहेत!ज्या भूमीत, मातीत क्रांतीसूर्य महात्मा फुले अन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती पाऊल खुणा आहेत त्याचं ससाणेनगर भूमीत,१९७४साली "महात्मा जोतिराव फुले विद्यानिकेतन संस्था" स्थापन करून ज्ञानउजेड देण्याचं गगनाहुन विशाल कार्य करणाऱ्या कै.शैलाताई रतन माळी यांचा २३ मार्चला २३वा स्मृतिदिन वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा झाला!उभयता पती-पत्नीनी आपलं संपूर्ण आयुष्य विध्यार्थी घडविण्यातं घालविले!देशाचं उज्वल भवितव्य विध्यार्थी असतात!देशाचे भावी संस्कारीत युवा असतात!भावी सुजाण नागरिक असतात!त्यांच्यावर योग्य पैलू पडण्याचं ज्ञानसोनाराच काम शिक्षक करीत आहेत!💐
संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय रतन माळी सरांच्या अथक परिश्रमास उत्तम साथ संगत करण्याचं काम विद्यमान अध्यक्षा सौ. स्मिताताई वाघ अन विद्यमान सचिव प्राचार्य रवींद्र वाघ करीत आहेत!शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी अमूलाग्र बदल स्वीकारून संस्थेला स्पर्धेत उतरवलं आहे!प्रत्येक वर्षी संस्थेतील शाळांमध्ये नावीन्यपूर्ण बदल घडतं आहेत!जागतिकरणाच्या रेट्यात आपणही बदललं पाहिजे असं विद्यमान अध्यक्षा अन विद्यमान सचिवांच्या बोलण्यातून जाणवत असतं!शाळा व्यक्तित्वाची जडनघडणं करीत असतात!विध्यार्थ्यांच्या परिपूर्ण व्यक्तित्वासाठी शिक्षक आयुष्यभर राबत असतात!असे शिक्षक आदर्श असतात!विद्यार्थीप्रिय शिक्षक जगण्याचा पाया रचित असतात!विध्यार्थ्यांना नजर देत असतात!डोळस करीत असतात!सर्वांगीण गुणांकडे लक्ष देत असतात!
महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या संस्थापक कै. सौ शैलाताईचं स्वप्न साकार करण्याचं महान कार्य गुरुजनांच्या हातून होत आहे!जेव्हा हृदय ओतून शिकवणारे शिक्षक रस्त्यावर भेटतात तेव्हा माजी विध्यार्थी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होतात!तो क्षण शिक्षकांसाठी जग जिंकल्याचा असतो!असे शिक्षक महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेला लाभले आहेत!म्हणूनच पुण्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये या संस्थेचा नावलौकीक आहे!
अनंत नद्या पाणी घेऊन सागरास मिळतात!जल निर्मळ असतं!निर्मळस्वरूप जीवनज्योती अश्रू घेऊन वहात असतात!शेवटी जल काय अन अश्रू काय, दोन्ही सिंधू सागरासं येऊन मिळत असतातं!
अश्रूतं जल असतं!डोळ्यातील जल मौल्यवान असतं!थेंबा थेंबानी गालावर ओघळले तर विशाल सिंधू होतो!
सिंधूसम अथांग,कै.सौ.शैलाताईचं कार्य सर्वांसाठी जगण्याची ऊर्जा देत आहे!शक्ती देत आहे!सुसंस्कृत राष्ट्राचे नागरिक विध्यार्थी घडत आहेत!ताईंच्या २३ व्या स्मृतिदिनी हिचं आदरांजली!भावपूर्ण भावांजली!विनम्र अभिवादन!💐
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२५ मार्च २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment