चला जाऊया वसंतासंगे

चला जाऊ 'वसंता'संगे
🚩👏🏼🚩👏🏼🚩👏🏼
*******************
... नानाभाऊ माळी

         वसंतऋतू पानगळीतून नवचैतन्याकडे,नव्या पालवीकडे, नव्या प्रवासाकडे नेत असतो!जुनं गळतं असतं!नवीन हसरं बाळ उठू लागत!रांगू लागतं!झाडांवर टवटवीत पालवी फुटू लागते!कोवळी पालवी मोहक असतें!लोभस असतें!अवखळ घोड्यावर आरूढ असतें!वसंतऋतूतं नवतीचा साज-शृंगारीक असतें!सृष्टी अंग झटकून पुन्हा नव्या दमाने,नव्या जोमाने स्वागतास उभी रहाते!अंगावरचं जुनं झटकून नवा शृंगार लेवून उभी असतें!मानवी जीवन असंच असतं नाही का!!!

बाल,तरुण,जेष्ठाच्या सर्व अवस्था पार करीत,कात टाकीत पुन्हा उभे राहून बदल घडवीत असतो!तो वसंत...शुष्कात हिरवा असतो!वसंत हवाहवासा वाटत असतो!वसंत प्रेरणादायी असतो!अंगात जोश, उत्साह चैतन्याचा स्फूर्तीदाता असतो!परीवर्तनाचा प्रारंभ असतो!.....असेचं चेतनामूर्ती 'वसंत' आपल्यात आहेतं! "चला जाऊया गड-किल्ल्यांवर!"... साहसातून आनंदाकडे,भटकंतीकडे, निसर्गाकडे,तंदुरुस्तीकडे,सुदृढ आरोग्याकडे,निकोप-निखळ आनंदाकडे घेऊन जाणारे आदरणीय "वसंतराव बागूल सर"वसंतऋतूचं आहेत नाही का!!!

     माणसं वेचली जातात!माणसं वाचली जातात!माणसं पोसली जातात!माणसं खोचली जातात!माणसं खेचली जातात!माणसं खेचणारी लोहचुंबकीय,सत्संगी माणसं आपल्या अवती भवती असतात!तें इतरांचं जीवन बदलून टाकीत असतात!आतून-बाहेरून सुदृढ
साध्याकडे नेत असतात!अशी सद्गुणी माणसं स्वतः सत्संगातं वावरत असतात!उगवता कोमल-कोवळा सूर्य दाखवणारी असतात!इतरांची रटाळ जिंदगी पार पार बदलून टाकीत असतात!अशी व्यक्तिमत्व इतरांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेत असतात!सतसत्वाचा उजेड दाखवीत असतात!अशी माणसं सन्मार्गी असतात!कर्मयोगी असतात!आपल्याला महाभाग्याने लाभलेले असतात!रटाळ जगण्याला वेग,वेळ अन दिशा देतं असतात!या व्यक्ती स्वतः शिस्तप्रिय असतात!शिस्त शिकवीत संस्काराचां आनंदी पेढा हाती ठेवत असतात!वसंतात हिरवी पालवी असावी असे वंदनीय "वसंतराव बागूल सर" आम्हास भेटले!

आचार विचारांचीं समृद्धी घेऊन निघालेले,परोपकारी कर्मयोगी अन सदशील माणसं इतरांचें आदर्श असतात!मार्गदर्शक असतात!शरीर-मन तज्ञ असतात!निष्णात चिकत्सक असतात!योग गुरु असतात!मानसोपचार तज्ञ असतात!मी 'अशाचं'.. व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलो होतो!पाहता पाहता त्यांचाचं शिष्य होऊन गेलो!हो!.. 'वसंतराव' असं वसंताचं सुंदर नाव घेऊन माणसं जोडणारं हे व्यक्तिमत्व आहे!व'संत' वसंतात संत आहेत!शीतल आहेत! डोळस संत आहेत!संतांसारखे स्थितप्रज्ञ आहेत!उत्तम गुरु आहेत!सदविचार प्रचारक आहेत!माणसांचा गोतावळा निर्माण करणारे निर्मिक आहेत!डोळस वाटाडया आहेत!वसंत ऋतुसारखे उन्हात हिरवीगार पालवी फुलवीत आहेत!सावली आहेत!शिस्तप्रिय शिक्षक देखील आहेत!तजेलाचीं तुडुंब भरलेली अमृतघागर आहेत!आल्हादाची जडी-बुटी आहेत!वसंतात संत जगण्याची उब देत असतात!वसंतराव बागूल सर!चेतनेचा झरा आहेत!वसंतराव नावाचा लौकिक आहेत!🌹

दोन वर्षांपूर्वी 'चला जाऊ या गड-किल्ल्यांवर' ही स्वप्नातीतं मोहीम सत्यात उतरवली होती!सचोटी कार्याची पावती असतें!!अनेक गौरव पावत्या घेऊन हिंडणारे बागूल सर खरचं मोहिमेचे सरसेनापती आहेत!अनेक अबाल-वृद्ध या मोहिमेचे सदस्य झाले,घटक झालेले आहेत!नावीन्याचां संदेश देत,नवनवीन माणसं कायमचीच जोडतं आहेत!निखळ आनंद द्यायला धाडस लागतं! तें धाडस वसंतराव बागूल सरांनी आत्मसात केलं आहे!किल्ला सर करणाऱ्या प्रत्येक सैनिकांचीं, मोहिमेतील सहभागी व्यक्तींची काळजी घेत असतात!वेळेत मोहीम फत्ते करून सर्व सैनिकांना आपापल्या ठाण्यात आणून सोडणे साधी गोष्ट नाही!सेनापतींना साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी,अर्धांगिनी सौ.सुरेखा ताईसाहेब यांचं योगदान देखील अनमोल आहे!त्यांच्या अथक कष्टाला देखील प्रणाम आहे!इतर सर्व सहकारी कुटुंबासारखे आहेत!अशा सर्व सहकाऱ्यांचा रास्त अभिमान असणारे 'सेनापती' विशाल हृदयी आहेत!याचा सार्थ अभिमान आहे!कौतुक शब्दपुष्प उधळावे तेवढे कमीच आहेतं !🌹

 वसंतऋतूत उन्हात कोवळी-हिरवी पालवी असतें!उत्साही-तजेलदार वातावरण असतं!वसंत... वेली-फुलं -वृक्षांनी फुललेला असतो!बहरलेला असतो!नवी पालवी फुटत असतांना लिंब,आंबा,चिंच यांचा मोहर डोळ्यांचं पारणें फेडीत असतो!जुनी पानं गळून फुटणारी नवीन पालवी शुभ्र हिरव्या रंगातून नजरेत भरत असतें!जन्माने "वसंतराव" नाव परिधान केलेल्या या योग्यामुळे अनंत माणसांच्या जीवनात हिरवीगार पालवी फुटली आहे!अनेक साहसी मोहिमेच्या सदस्यांचे शारीरिक आजारपण, bp, शुगर, मानसिक आजारपण छुमंतर झालेल्याची नोंद होत आहे! "चला जाऊया गड-किल्ल्यांवर"..हा ग्रुप कमी वेळात लोकप्रिय झाला!!ब्रँड अँबेंसॅडर झालेले आदरणीय वसंतराव बागूल सर हृदयमित्र होत होत हृदयप्रिय चित्तचोर झालेले आहेतं!प्रेरणास्थान झालेले आहेत!

आदरणीय वसंतराव बागूल सर पुण्यातील चंदननगर भागात राहात असतात!गेल्या २४-२५ वर्षांपासून ओळखं-स्नेहबंधनात अडकले!एका सामाजिक मंडळात कार्यरत असतांना भेटले!आम्ही त्यांचाचं झालो!माणसांची नेमकी पारख,कमी शब्दात बोलक्या प्रतिक्रियेतून ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं कळलं देखील नाही!मंडळाच्या कामानिमित्त एकत्र उठ-बस तर सुस्वभावाची गुणसंपन्न ओळख हृदयात खोलवर जाऊन बसली होती!मुळात एअरफोर्स.. सैनिकी अधिकारी असलेले,शिस्तप्रिय जीवन जगलेले, सकारात्मक दृष्टिकोनातून सुसंस्कार अंगी बाळगलेले,कृतीतून वेळ,काळ, माणसं जोडणारे  व्यक्तिमत्व असलेले बागूल सर,एरफोर्स नंतर महाराष्ट्र सरकारच्या अपारंपारीक ऊर्जा खात्यात मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते!या बहूआयामी व्यक्तिमत्वाच्या अनेक गुणांच्या ओळखीतून जास्त जवळ गेलो!निकट सानिध्यात गेलो!knowlege dictionary असणाऱ्या बागूल सरांचीं टेक्निकल क्षेत्रातील गरुड झेप त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचं यश आहे!mechanical, IT तील उत्तुंग भरारी अभिमानास्पद आहे!सरकारी नोकरीतून सेवानिवृत्ती नंतर पवन चक्की बनविणाऱ्या कंपनीतं आपल्या कार्याचा ठसा उमटवत राहिले!सरांचे थोरले सुपुत्र सैन्यात कर्नल पदावर असून!कनिष्ठ सुपुत्र अमेरिकेत MS करून mnc कंपनीतं IT क्षेत्रात कार्यरत आहे!आदरणीय बागूल सर स्वतः तानमुक्त जीवन शैलीचे कट्टर पुरस्करते आहेत!आनंदयात्री आहेत!🌹

बहुआयामी म्हणजे..... नोकरीं,कला संगीत,व्यक्तिमत्व विकास अशा विभिन्न गुणांनी समृद्ध असणाऱ्या वसंतराव बागूल सरांनी दरम्यानच्या काळात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर एकपात्री तीन तासांचं नाटक बसविले होते!नाटक उत्तम सादरीकरणामुळे गाजले देखील!संत ज्ञानेश्वरांच्या जन्म तें संजीवन समाधीचां प्रवास हृदयात भक्तीरस, करूणरसाचा हळवा शिडकावा होता!बागूल सरांच्या नाट्याभिनयाने नेत्रकडा भिजू लागतात!भक्तीरस हृदयी पाझरु लागतो!आपलं चित्त हरपून संत ज्ञानेश्वरांच्या ठायी मस्तक टेकले जातं असतं!हें तीन तासांचं एकपात्री नाटक जीवनाचं महत्व अधोरेखित करतं!💐

योग्य वेळी अचूक निर्णय घेतं आपलं जीवनकार्य लोक समर्पित करणारे ! बागूल सर साहसातून भक्तीचा, श्रद्धेच्यां मार्गांवर देखील चालत आहेत ११ मारुती दर्शन सहल देखील काढत असतात!अष्टविनायक दर्शन
सहल वेळात वेळ काढून जातं असतात!श्रद्धा चंदन होत असतें!भक्तीसुगंध चौफेर पसरत असतो!"चला जाऊया गड-किल्ल्यांवर!" या लोकप्रिय साहसी मोहिमेचे मुख्य प्रवर्तक असणारे बागूल सर आनंद, शिस्त, शिक्षण, शिकवण, शिक्षक, मनोरंजनातून माणसाचं चित्त हरण करीत असतात!आमचे आरोग्यगुरु देवदूत बनून मोहिमा आखतं मोहीम राबवत असतात!या यशस्वी सेनापतीनें दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी २५ मोहिमांचां आनंद सोहळा साजरा करण्याचा चंग बांधला आहे!सेनापती यशस्वी आहेत!कार्य सिद्धीस नेण्यास तत्पर आहेत!रौप्य महोत्सवानिमित्त विविध गुण दर्शनाचा भव्य भरगच्च कार्यक्रम आहेत!येता रौप्यमहोत्सवी आनंद सोहळा एका निर्गवी व्यक्तिमत्वाचीं,ज्ञानदायी
अंतरंर्चक्षु डोळस ओळख आहे!अशा शूर सेनापतीस नतमस्तक होत सॅल्यूट करतो!🌹
(वसंतराव बागूल सरांचा मो.नं-९८२३२८९०४१)
🚩🙏🚩🚩🙏🚩🙏🚩🙏
*****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०४ फेब्रुवारी २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol