रौप्य महोत्सवी वधू-वर पालक मेळावा
रौप्य महोत्सवी वधू-वर मेळावा
👩❤️💋👩💑🌹🌹🌹💑👩❤️💋👩
************************
... नानाभाऊ माळी
स्वप्न कधीचे मनात माझ्या
.........आज साकार झाले
शिकूनी बाई उपवर झाले
.....वधू-वर मेळाव्यास आले!🌹
शिक्षण नोकरी स्थिर होता
..........मी मलाच उभे केले
माझं लग्नाळूचं वय बाई
......वधू-वर मेळाव्यास आले!🌹
आई बाबा अन माझी पसंती
..........वर शोधण्यासीं आले
स्वप्न कधीचे मनात माझ्या
......वधू-वर मेळाव्यास आले!🌹
मुलाखतीनें परीचय होतो
........वरती स्टेजवर गेले
निरखूनी पाहती अनंत डोळे
........मी वरासं पसंत आले!🌹
हुरहूर धडधड मनात माझ्या
........मज मेळाव्यासं नेले
मुलाखतीतूनि परिचय होई
........बाई मी पसंतीस आले!🌹
वधू-वर मेळावा आयोजित करून योगदान देण्याचं,सामाजिक ऋण फेडण्याचं महान कार्य अनेक सामाजिक मंडळं गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहेत!जातीनिहाय अनेक मंडळं कार्यरत आहेत! पूर्वी गल्लीच्या एका टोकातून दिलेला आवाज दुसऱ्या टोकावर ऐकायला यायचा!आता काळ बदलला आहे!जग बदललं आहे!नको त्या अपेक्षा वाढल्या!🌹
विवाह संदर्भातील बदल जाणवू लागलें आहेतं!अत्याधुनिक सुख सुविधा अन शिक्षणामुळे हा बदल अपरिहार्य होता!अपेक्षेवर पसंती हाऊ लागली आहे!चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांनी उपवर मुला-मुलींची दृष्टी बदलली आहे!नजर बदलली आहे!विवाह वेदीवर चढणाऱ्या विवाह इच्छुक तरुण-तरुणींची अपेक्षा बदलली आहे!नोकरीं असूनही शेती आहे का असा आट्टहास होत आहे!शेती असूनही नोकरी आहे का? दोन्ही असूनही घरदार अन कुटुंबातील संख्या किती?असं काहीतरी अनपेक्षित घडू लागलं आहे!🌹
शिक्षण!नोकरी!शेती!हँडसम!सुंदर!प्रॉपर्टी!... अशा अनेक अपेक्षाचं ओझं घेऊन हिंडणारा वधू-वर पालक वर्ग आसपास नजरेला पडतो आहे!उपवरांचं वय वाढत असतं!ताण तणावही वाढतो आहे!नात्यागोत्यातं स्थळं ही मिळत नाहीत!खेडेगावातही अनेक पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या दिसतं आहेत!शिकून नोकरी नाही अशा शेती करणाऱ्या मुलांनांही योग्य स्थळं मिळत नाहीत!त्यांनी तरी काय करावं?
शहरात राहणाऱ्या,नोकरी असणाऱ्या पण शेती नसलेल्या मुलांची लग्न होण्यास देखील अडचणी येत आहेत!मुलींचं शिक्षण जास्त!मुली त्यांच्याशी सुसंगत पसंतीला प्राधान्य देत आहेत!पूर्वी मुली कमी शिकलेल्या असतं!आता मुलींचं उच्च शिक्षणातील प्रमाणही वाढले आहे!दर वर्षी नवीन बॅच तयार होत असतें!जुनी बॅच वय वाढीमुळे नाईलाजाने तडजोड स्वीकारण्यास तयार होत असतें!योग्य वयात तडजोड स्वीकारून योग्य वधू किंवा वर पसंत केलं तर उत्तमचं असतं!प्रत्येक गोष्ट आपल्या पसंतीप्रमाणे घडत नसते!🌹
लग्न जुळणं खरंच दिव्य होऊन बसले आहे!मुलीचं असो वा मुलांचं....दोघेही दिव्यातून जात आहेत!म्हणूनच जातीनिहाय सामाजिक मंडळं वधू-वर पालक परीचय मेळावा आयोजित करून गरजवंतांनां हातभार लावीत आहेत!मेळाव्यातून पसंतीला प्राध्यान्य मिळत आहे!लग्न जमवणं सुकर होत आहे!
पिंपरी-चिंचवड,पुणे परिसरात कार्यरत असलेलं 'खान्देश माळी मंडळ' गेल्या २५ वर्षांपासून माळी समाजासाठी राज्यव्यापी वधू-वर पालक परीचय मेळावा आयोजित करीत आहे!या वर्षी मेळाव्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे!मंडळाचे सर्व पदाधिकारी अन अनंत कार्यकर्ते राबत असतात!१९९९साली पहिला राज्यव्यापी वधू-वर परीचय मेळावा आयोजित करण्यात आला!त्यानंतर सातत्य ठेऊन या वर्षी २५ वा राज्यव्यापी वधू-वर मेळावा आयोजित होत आहे!
रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त या वर्षी पिंपरीतील ycm हॉस्पिटल जवळ, 'आचार्य अत्रे रंगमंदिरात दिनांक १७ डिसेंबर २०२३रोजी रविवारी सकाळी ९-०० वाजता २५ वा माळी समाजाचा राज्यव्यापी वधू-वर पालक परीचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे!मेळावा समाज जोडतो!माणसं जोडतो!खान्देश माळी मंडळ हे पुण्याचं काम करीत आहे!माळी समाजाच्या उपवर वधू-वरांनी याचा लाभ घ्यावा अन जीवनाचा साथीदार निवडावा!🌹
🌹🌹🌹🌹💑🌹🌹🌹
**************************
... नानाभाऊ माळी,अध्यक्ष
खान्देश माळी मंडळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परीसर,पुणे-४११०२८
मो. नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१४ डिसेंबर २०२३
Comments
Post a Comment