माझी आई अशीच आहे (आई सुगंधी धूप )भाग-२६

!!आई सुगंधी धूप!!
🌹माझी आई अशीच आहे🌹
               (भाग-२६ )
     💐👏🏼💐👏🏼💐👏🏼
      ********************
... नानाभाऊ माळी 

       माझ्या मित्राच्या मुलाचीं निवड परदेशातील एका कंपनीतं झाली होती!मित्र आणि त्यांची पत्नी अर्थातं सौ.वहिणी अतिशय खुश होतें!मुलगा परदेशात निघाला होता!दोघे मुलाला विमानतळावर पोहचवायला गेले होते!मुलगा विमानतळाकडे निघाला!आई त्याच्या पाठमोरी आकृतीकडे पाहात असतांना एकाएकी आईचीं ममता उफाळून आली!आई ओक्सा बोक्सी रडू लागली!मुलगा लांब जाणार होता!आई पळत गेली!आपले हात मुलाच्या डोक्यावरून फिरवू लागली!ज्याला जन्म दिला!मोठा झाला!अन खूप दूर चालला होता!मुलाला धरून थांबवत होती!विमानाची वेळ झाली तसा मुलगा आईची समजूत काढून निघून गेला!आई पुत्रप्रमाणे रडत होती!मुलगा दूर निघून गेला होता!आईच्या रक्ताचा गोळा डोळ्यापलीकडे गेला होता!आई डोळ्यांनी पाझरतं होती!विमान आकाशी उडालं होतं!आईचं रक्त दूर देशी गेलं होतं!आई अश्रुतुन पाझरतं होती!💐

जीव सोशिक आई
अनंत आकाशी पाही 
साऱ्या घरांची दाई
असुनी,स्वतःची नाही 

माझ्या आईचं घर
खोल हृदयाचं दार
नजरे बांधाच्या पार
ओढी संसाराचां भार

       आई नावाचं 'परीस' पृथ्वीवर कसं बरं आलं असेल?देवानेचं आई रूप घेतलं असावं!कोमल, कनवाळू, ममतेच काळीज घेऊन भूवरती आलेल्या परीसरुपी आईनें,पृथ्वीवरील जीवन पिवळेधमक करून टाकलं असावं!चमकदार करून टाकलं असावं!प्रकाशित करून टाकलं असावं! साखर,गूळ, खोबरं, लोणी, पेढा असा मायेचा गोडवा घेऊन हिंडणारी आई असतें!सोशिक होऊन अंधार सहन करणारी आई आयुष्यभर अपत्यांना प्रकाशित करीत असतें!परीस लोखंडास चकाकी आणते!जगातल्या साऱ्या मातांना नमन करतो!माझी आई अशीच आहे!

आई परीसाचीं खान
मिळे लोखंडासी मान
आई घासुनी घासुनी 
 देह सोन्याचां.... दान!🌹 

आई देवाचंचं गाणं
देव ओतीतसें जानं
सूर लागतांत छान
आई देवश्वासें दान!🌹

आई गर्भातील जान
जन्म फुंकितसें कान
मुक्त झालायं रें जीव
चिव चिवाटसें रान...!🌹

आई माऊली असतें!सतपाऊली असतें!विशाल सावली असतें!आई खळाळता झरा असतें!हास्य मुखी डोळंधारा असतें!आई कणकेचा गोळा असतें!जीव भोळा असतें!आई आनंदी सुखाचा मळा असतें!हाडांची काडं करणारी कष्टाळू 'माय'असतें!आई मुलांची कान असतें!आई डोळे असतें!सोनेरी तोळे असतें!सर्वस्व दानी असतें!आई स्वाभिमानी असतें!आई चेताग्नी असतें!आई पाळण्यातील गाणी असतें!आई अनंताची वाणी असतें!आई गोडांबा झाड असतें!आई परीसाहून महान असतें!'आई' प्रकाशमान असतें!आई चारित्र्य खान असतें!आई देवाहून महान असतें!आई पोटी जन्म महा भाग्याचा असतो!माझी आई अशीच आहे!💐

आई कवितेचीं पानं
गीत होतसें गाणं
कशा कशानें मोजावी?
आई खणखणीत नाणं!🌹 

आईचें हरपते भान
काळीज देतसें दान
देवरुपे आई माझी
आकाशाहुनी महान..!🌹

आई डोळ्यातं दिसावी
आई कानात असावी
आई श्वासात बसावी
बाळ स्तनमुखे हसावी!🌹

आई पोटी जन्म घेणारं बाळ अपार ऋण घेऊन जन्माला येत असतं!स्वतःच स्वतंत्र शरीर,सर्व अवयवांयुक्त देह आईच्या उदरातून घेऊन येत असंतं!नवीन श्वास घेत असतं!अपार कळांचं गोड फळ असतं!नव प्रकाश पाहात असतं!आईच्या कुशीत विसावत असतं!आई यमयातनेतून जात असतें,म्हणून सन्मानित जन्म भाग्यात असतो!आईचे आकाशाहुन विशाल उपकार कधी फिटतील का?श्वास अन प्रकाश देणाऱ्या महामातेचे ऋण जन्मोजन्मी परोपकारी पुंजी असतें!झिजूनी झिजूनी घासुनी देह दान देणाऱ्या आईस त्रिकाल वंदन असतं!देवसुपुत्री मातेच्या डोळ्यात अश्रुंची फुले नसावीत!तिच्या सेवेतं श्रावणबाळ खुले असावेतं!"आई" अशीच असतें!माझीही आई अशीच आहे!💐
 
आई उन्ह पालवी
आई झाड सावली
आई देव पावली
जन्मभर तू धावली!🌹

आई मर्यादा बोल
आई जखम खोल
अंतरी खोल ओल
जन्म आई अनमोल!🌹

आई देवाचेही दार
होऊनिया घार
उडतें गगना पार
आई जन्माचा सार..!🌹

आई सुगंधी धूप
आई अस्सल तूप
कंठी वेदना खूप
माय तरीही चूप...!🌹
..... आई माझी!!!!!!💐

आपण आई-वडिलांच्या पुण्याईनें जन्मभर उभा राहतो!जग पाहतो!जीवन ओझी वाहतो!आयुष्यात सुखानंदा जवळी जातो!वडिलांमुळे शरीर कठोर बनतं,पण हृदय आईमुळे मृदू,हळवे,कनवाळू कोमल बनत असतं!आपलं जीवन आईश्वासांची पुंजी असतं!म्हणूनच जगणं मधमांशासारखं रुंजी घालत असतं!आकाश,पृथ्वी,अग्नी,पाणी, वायूचीही जन्मदात्री आई असणाऱ्या आपल्या आईच्या जन्मोजन्मीच्या उपकारास, ऋणास शत शत नमन!
🌹👏🏼🌹💐👏🏼🌹💐👏🏼
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०२ फेब्रुवारी २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol