चला जाऊया 🙏गड-किल्ल्यांवर
चला जाऊ या गड-किल्ल्यांवर
🚩रौप्यमहोत्सव🚩
🌹🌹🚩🚩🌹🌹
********************
... नानाभाऊ माळी
स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द, चिकाटी अन सातत्य लागतं!सातत्यातून नियम बनतो!नियम नियमित होतो!झाड लावणे,नियमित पानी टाकून निगा राखणे,मशागत करणे असतं!पोटच्या मुलासारखं जीव लावणे असतं!कदाचित भल्यासाठी थोड कठोर होणे सुद्धा असतं!पुढे झाडाला गोड फळं येतात!कष्टाचं गोड फळ आंतरिक तृप्ती देत असतं!मी असाच बागवान पाहिला आहे!कष्टाळू माळी पाहिला आहे!अनुभवाचे गोड फळ वाटणारा कर्मयोगी अनुभवला आहे!आपण निसर्गाशी एकरूप होऊन जीवनातल्या ताण तनावांना मूठमाती देत असतो!शिल्लक राहतो त्यासं आनंद म्हणतात!🚩
आनंदाची झाडं लावणारा!स्वतः कष्ट घेत राबणारा!फळं आली की वाटणारा!आनंदफळ वाटीत माणसाला निखळ आनंद देणारा, असा कर्मयोगी मी पाहिला आहे!फुलं,फळ वाटीत सर्वांच्या आरोग्याची उत्तम निगा राखणारा!काळजी घेत माणसाला निसर्गाशी जोडणारा निसर्ग प्रेमी पाहिला आहे!निसर्ग माणसाचा सखा असतो!गुरु असतो!शुद्ध श्वास असतो!माणूस मातीचाचं अंश असतो!माणूस आनंदवृक्ष असतो!घडवू तसा घडत असतो!🚩
निसर्ग...नदी,पर्वतरांगा,सागर,जंगलां चा प्रतिनिधी आहे!निसर्गाच्या पक्षी चिव चिवाटातं अतिदुर्गम ठिकाणी मानव निर्मित दुर्ग बांधलेले दिसतात!गड बांधलेले दिसतात!किल्ले बांधलेले दिसतात!प्राचीन काळी ते स्वसंरक्षणार्थ बांधले असतील!नंतर मानवानेचं मानवावर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता स्थापन केली असेल!राज्य करीत आपल्या अस्तित्वासाठी आक्रमक झाला असेल!विस्तारवादातून अनंत उंच डोंगर माथ्यांवर किल्ले बांधली असावीत!असे अनंत किल्ले आहेत!पडझडं, ढासळलेल्या स्थितीत आहेत!काळ लोटला!किल्ले त्याचं अवस्थेत आहेत!आज मितीस अनेक दुर्गप्रेमी प्राचीन अस्तित्वाच्या खाणाखुणा पहायला जातं असतात!घटित खडतर जीवनाचा थरार अनुभवण्यासाठी जात असतात!शोधक दृष्टी सोबत घेऊन जात असतात!अशाचं एका दुर्गप्रेमीनें 'निसर्गाच्यां सानिध्यात एक' दिवसाची हाक दिली होती!ती 'चला जाऊ या गड-किल्ल्यांवर'चीं हाक होती!"त्या" दुर्गप्रेमीच्यां मोहपाशात,प्रेमपाशात अनेकजन अडकले!किल्ला आणि निसर्गाच्या सानिध्यात साहसी प्रवास सुरु झाला!🚩
प्रवास कुठलाही असो,कठीण असतोचं!किल्ला चढणे कठीणचं असतं!पाहता पाहता प्रतिसाद वाढत गेला!साहसी प्रवास घडवून आणणारा वाटाडया आमचा शिक्षक झाला!पुढे तर असं वाटू लागलं 'हा दुर्गप्रेमी वाटाड्या आमचा आरोग्य रक्षकचं आहे!' किल्ला चढाईमुळे छोटे मोठे आजारपण पळून गेलेतं!शुद्ध प्राणवायूमुळे शारीरिक तंदुरुस्ती जाणवू लागली!मन,डोळे शरीर निसर्गातं नाचू लागलें!'घाम फुटला, शरीर थकलं तरी जिद्द कायम'.. अशी अवस्था होती!पाहता पाहता एक नाही,दोन नाही अवघ्या दोन वर्षात तब्बल २५ किल्ल्यांचा साहसी प्रवास झाला!महिन्यातून एकदा जायचं!परीक्षेला बसायचं!घामाघूम व्हायचं!थकल्यावर थोड थांबायचं!पुन्हा चढाईलां सुरुवात करायची!किल्ल्यावर चढून इतिहासाला गवसणी घालायची!पून्हा परतीचा प्रवास सुरु करायचा!दुपारी योग्य ठिकाणी जेवन घ्यायचं!जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत राहायचा!दोन-अडीच तास पूर्णतः त्यात डुंबुन जायचं!बसमध्ये बसून आपल्या परतीच्या प्रवासाला निघायचं!असा हवाहवासा अविस्मरणीय प्रवास घडवून आणणारा एक सेनापती होता!सेनापती आपल्या तुकडीची काळजी घेत होता!सेनापतीलां दूरदृष्टी असावी लागते!असे सर्वांना दृष्टी प्रदान करणारे व्यक्तिमत्व आहेत आदरणीय 'वसंतराव बागूल सर' आहेत!🚩
काल २७ फेब्रुवारी २०२४ रोजी चला 'जाऊ या गड-किल्ल्यांवर' ग्रुपचा रौप्यमहोत्सव साजरा झाला!आधी २५ किल्ल्यांचा यशस्वी प्रवास झाला होता!त्यानिमित्ताने चंदननगर,पुणे येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं!आम्ही विविध रंगारंग कार्यक्रमांचां आनंद घेत होतो!महाराष्ट्र भूमीचा गौरव,विविध गड-किल्ल्याचं दर्शन कार्यक्रमातून झालं!विशेष म्हणजे स्मरणीका प्रकाशनही झालं!स्मरनिकेत २५ किल्ल्यांचा अतिशय सुदंर प्रवास नमूद केला आहे!...अनेकांचां गौरव,सत्कार पार पडलेतं!पडद्यावर २५ किल्ल्यांचं दर्शन झालं!🚩
२५ किल्ल्यांचा रौप्यमहोत्सव आनंद देऊन गेला!मनात,हृदयात खोल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असा झाला!स्मृतीत जपून ठेवावा असा झाला! नजरेचा कॅमेरा सर्व दृश्य टिपित राहिला!समाधानाने,तृप्तीने मन भरलं होतं!पुन्हा स्वादिष्ट,रुचकर भोजनाने पोटाचीं भूक शांत झाली होती!तृप्तीचा ढेकर देत होतो!तृष्णा शांत झाली होती!२५ किल्ल्यांचा अविस्मरणीय सोहळा 'शिवनेरी ते प्रतापगड सफरीचीं ' सांगता झाली होती!आदरणीय बागूल सरांकडे अनेक मावळे आपापल्या घरी निघण्या पूर्वी पुढील गड-किल्ल्याचं, २६ वा किल्ला साताऱ्यातील 'अजिंक्यतारा' किल्ल्यासाठी सीट बुकिंग करत होते!रात्री घरी पोहचलो तेव्हा रात्रीचे ११वाजले होते!पुढील किल्ल्याचा,स्वप्नातीत प्रवासाचा विचार करीत झोपेच्या अधीन झालो!
🌹🌹🚩🚩🚩🌹🌹
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२८ फेब्रुवारी २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment