लढूनी जिंकले वीर मराठे
लढूनी जिंकले वीर मराठे
🚩🚩👏🏼👏🏼🚩🚩
*******************
... नानाभाऊ माळी
रक्त सांडले कातळावरीं
योध्यास वीर मरण आले
देव देश अन धर्मासाठी
राजे छत्रपती झाले !धृ!..🚩
घाव सोशील्या तटबंदीनीं
परके मारीत होते डल्ला
तलवारींनी फोडील्या ढाली
वीर जिंकतं गेले किल्ला!.....🚩
तोफांनीं बडीमार केला
चढवूनी दुश्मनांवरती हल्ला
लढाई लढले मर्द मराठे
शौर्यानें जिंकित गेले किल्ला! 🚩
लढवय्यांचें रक्त सांडले
हिंदवी माय भूमीसाठी
गर्जती हर हर महादेव
बांधिल्या मर्दांनी गाठी!..... 🚩
स्मृती अजुनी बोलक्या होती
पडक्या गड-किल्ल्यांवरती
लढूनी जिंकले वीर मराठे
भगवा फडकवीतं फिरती!🚩
********************
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२७ फेब्रुवारी २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment