खवटायेल

🙏🌹खवटायेल🌹🙏
      💐💐💐💐💐💐💐
... नानाभाऊ माळी 

       एक दिन रामकोर आत्यानां जिभाउ जपम्हायीन उठना!बाशीतोंडें हातमा थैली लिस्नी नीटचं नींघनां!!गल्लीन्या शेऱ्या वलांडतं,डावा हातम्हा थैली आन जेवना हाते निंमनी काडी घायी दात घसडतं नींघना!आंगवर..ना फराक व्हता ना कुडची व्हती!कंबरनां धव्व्या पायजमा कस्नीलें तंनगेलं व्हता!हुघडं भंम पोट टरबूजना मायेक दिखी ऱ्हायंत!तोंडंम्हा निंमनी काडी दातस्वर फिरी ऱ्हायंती!तशाच दात घसडतं दुकानम्हा घुस्ना!🌹

आट्रम-सट्रम गंजज खरदी कयी!च्यान्ही पुडी, तपकीरनी डबी,अर्धा किलो साखर,चव्वीनी दाय,नारंय,एक लाईफ बाय साबन,ऱ्हायी सुयी उडीदनी धव्वी दाय लीधी!निंमनीं काडी तोंडंम्हा फिरीचं ऱ्हायंती!दात घसडानं कडू जरत थुक तोंडंम्हा गोया व्हयेलं व्हतं!थुकमुये फुगऱ्या गाल दिखी ऱ्हायंतात!घसडता घसडता, बोलता बोलता,तोंडंमां बोम दबेल थुक....बटण दाबताच पाच हास पावरनीं पानींनी मोटरनीं मायेक भस्करी तोंडंम्हायीन दुकानन्हा दारमाचं पचक्कनं पडनं!हेट्या उगता सूर्य नारायण दखी ऱ्हायंता!सक्कायम्हा दुकाननां मव्हरे थुकेलं दखीस्नी,दुकानदार इठ्ठलनं उज्जी डोकं फिरी गये!जिभाउनां आंगवर यीस्नी निस्त्या वल्ल्याजरत,इसड्या फोक गाया टिकाडी बाप-आजला काढी ऱ्हायंता!

जिभाउनां तोंडंनां मोटरनीं गल्ती व्हती!जश्या-तशा इठ्ठल वाण्यांना पैसा दिनात!खाले मान घाली राग गियेत, चुरमायी-चारमायी जिभाउ नींघालें लाग्ना!वान्यांना दारसे दुकान पुसानं धुडक पडेल व्हतं!तें उखली पायंखाले  थुकवर भावडाये!इठ्ठलनां तोंडे सोतानां माय बापनां उद्धार व्हयेलं व्हता!सबद उज्जी जिव्हारी लागेलं व्हतात!नाईलाज व्हता!हातमा किराना भरेलं सामानन्ही थैली लिधी!धाकलं तोंडं करी,पायऱ्या उतरी,पाय उखली चालना ग्या!🌹

जिभाऊनीं घर येताचं किरानानी थैली उल्टी कयी!रामकोर आत्या त्यावर खेकस्नी,'जिभाउ तुन्ह डोक्स से का खोकं से?थैली आशी फेकतस? सक्कायम्हा काय व्हयी गे रें तुले?चित्तमन नही दिखी ऱ्हायन तुन्ह!!'.. जिभाउनं मायगंम ध्यान व्हती!दारसे वइनवरतीन रुमाल-आंडरपँट व्हढी लिधा!आनी मोरीम्हा जायी बठना!पित्तयन्हा बोघनाम्हा हुनं पानी वतेलं व्हतं!तीन चार तांब्या डोकावर-आंगवर वतांत!डोक्स थंडगार व्हयन!राग जराखा थंडा व्हयना!आंग धोयीस्नी ल्हवं-ल्हवं आंगवर कपडा घालात!हातमा नारंय लिध!तांब्याभरी पानी लिध आनी सिधा मंदिरन्हागंम चालत नींघना!

जिभाउनीं मंदिरन्ह्या पायऱ्या चढी देवन्ह दर्शन लिध!कंबर वाकी डोकं ठेव!डोया मिटी हिरदथून देवन्ह नाव लिध!देव दर्शनं व्हयनं!मंदिरन्हा मव्हरे चौडा-चिप्पट दगड ठेयेल व्हता!जिभाउनीं हातमा नारंय लिध आन  त्या दगडवर जोरमा फोडं!नारंय फुटताच,खउट नारंयन्ह्या चिरकांड्या उडन्यात!खउट नारंय दखी जिभाउनं डोकं उज्जी तडकी गये!

खरी परथा आशी से,नारय फोडी देवलें परसाद ठेवा का,दर्शनलें येल लोकेस्लें परसाद वाटीस्नी ऱ्हायेल-सुयेलं घर लयी जावानीं दुन्यानी जुनी रीत-भात से!गावंनी परंपरा से!गावंम्हा देव येवाफाइन हावू रीती रीवाज चालूच व्हयी!मनलें शांतीनं ठिकान भेटन का हात जोडी डोकं ठी लेवो,सुखन्हा दिन निंघी जातंस!पन आठे तें जिभाउनां डोकाम्हा तिडीक नींघेंले व्हती!खउट नारायनीं चिरकांडी आंगवर उडनी व्हती!खउट वास यी ऱ्हायंता!तें दखी जिभाउनं डोकं फिरी जायेलं व्हतं!

जिभाउनीं फुटेल खउट नारंय हातमा लिध!सीधा दुकानमव्हरे इस्नी,इठ्ठललें गाया टिकाडालें लाग्ना,'कारे ओ सॅजूकना पोटना पैदा व्हयेलं!तू तें भलता टेकदार से नां?नेकीनां धंदा करस ना तू?सकायलें तून दारसे उंनतूं तव्हयं चुकीस्नी बोलता बोलता तोंडंम्हायीनं थुक गयनं व्हतं!तव्हयं भर रस्तावर,माज गल्लीमा मन्हा माय-बापन्हा उद्धार कया तू!तव्हय मनवर व्हझ ठी चूप बठनू व्हतु!आनी कारे बाट्टोड तू लोकेस्लें फसाडी खउट नारंय इकी ऱ्हायना!'

इठ्ठल भी कमी नई व्हता!तो बोलें तें गल्ली हाले!बोलें तें बिल्डिंग हाद्रे!जिभाउवर चांगलाचं डाफरी रवसडीस्नी सुटना,'आरे पापनपाड्या,नारंय मधम्हा चांगलं ऱ्हास का खउट,तुले कसं समजी रें येडी मत्थी ना?तुन्हा पोटम्हा काय से माले माहीत से कारे अफलातूरनां पोटना?' जिभाउनीं नस आखों तडकी गयी!तो मांगे हाटालें तयार नई व्हता!आते तें सकायनी भरपायी करालेंचं येल व्हता!तो गल्ली मैदान करी बोली ऱ्हायंता,'तू शिकाडू नको चोट्टा!लोकेस्न्या मुंड्या मोडी,त्यास्नाचं जीव्वर मोठा व्हयेलं खवड्या तू!खउट नारंय इकीस्नी लोकेस्ले बांग बनाडस तू!तुले काय तोंड्यालें बोलानं जबून लागी ऱ्हायन आते!खवटायेलन्हा पोटनां से तू!'

गाया देता देता तठेचं दोन्हीस्नी धरा धरी व्हयी गयी!खवटायेल बोलावर इठ्ठलनंभी डोकं फिरी गयेत!तितलाम्हा गल्लीना दोन चार लोके गोया व्हयनातं!दोन्हीस्लें समजाडी-सुमजाडी ज्यानं त्यानं घर -दारे वाट लावं!🌹

मानोस खउट ऱ्हास का नारंय?खउट नारंय डोयालें दिखी येस!खउट मानसेस्ना खउटपना कुडील्हे खउट करी टाकस!कायमन्हा दुरावा व्हाढी जास!मानसे तोडी जास!खवटायेलपना जिंदगी तोडी जास!देवं दारसे खउट नारंय पवतीर व्हयी जास!पन मानोसनां खउटपना डाग लायी जास!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
***************************
... नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे)
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१५ फेब्रुवारी २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)