कानिफनाथ( ट्रेक) दर्शन
कानिफनाथ(ट्रेक) दर्शन
🚩👏🏼🚩👏🏼🚩👏🏼
******************
... नानाभाऊ माळी
दर्शन या शब्दाने डोळे, मन आणि देहाशी अतिशय जवळचे नाते जोडले आहे!नातं थेट हृदयाला स्पर्श करीत असतं!त्यातून समाधान मिळत असतं!समाधानातून समाधीकडे चित्तवृत्ती प्रवास करू लागते!दर्शन जगण्यालां अर्थ देत असतं!दर्शनातून शांती आणि मन स्थिरतेकडे वाटचाल सुरु होते!देहाला आतून बाहेरून कष्ट दिल्याशिवाय दर्शनाचा लाभ व्यर्थ असतो!🚩👏🏼
दर्शन श्रद्धा असलेल्या ठिकाणाचं असतं!कधी देव दर्शन असतं!कधी किल्ला दर्शन असतं!कधी शिखर दर्शन असतं!दर्शनाची अतृप्ती, मनीषा,ओढ अंतःकरणातून असतें!अशी दर्शनस्थळं जवळपास उंच डोंगरावर असतात!जवळपास ९०% मंदिरं उंचावर असतात!तेथवर पोहचण्यासाठी शरीराचा कस लागतो!कसोटी पार करीत देवदर्शनाचां सोहळा अवीट गोड होत असतो!
ज्याप्रमाणे हाती हाताला चटके मग मिळे भाकर,तसंच पर्वतारोहनातून आपलं शरीर थकत असतं!घाम निघत असतो!श्वासोश्वास गतिमान होत असतात!दम लागतो!गुडघे म्हणतात,'बस्स आता!!' तेथेच शुद्ध श्रद्धा दर्शनाचां लाभ होतो!तो आनंद अवर्णनीय असतो!तेथेच आपला माथा टेकला जातो!देहाची झीज झाल्याशिवाय,कष्टाशिवाय देवदर्शन होत नाही!आत्मिक सुखाचा आनंद मंदिर,गड,किल्ले,घाट, वेडीवाकडी वळणे वाट चढून आल्यावर होतो!
आज दिनांक ११फेब्रुवारी २०२४ रविवारचीं पहाट होती!काल संध्याकाळी हडपसर, पुणे येथील जेष्ठ नागरिक दादासाहेब गुरव यांच्याशी मोबाईलवर बोलणं झालं होत!पहाटे ५-०० वाजता "कानिफनाथ ट्रेकिंग ग्रुपसोबत" चार चाकी गाडीवर निघालो!कानिफनाथ दर्शनासाठी निघालो!पहाटे ५-२० लां कानिफनाथ पायथ्याशी गाड्या पार्क केल्या!पायथ्यापासून कानिफनाथ मंदिर साधारण तीन किलोमीटर असेल!पहाट म्हणजे घन अंधार होता!घाट वळणं होती!घाट रस्ता अंगावर येणारा होता!चढायला अवघड नाही पण अंगावर येणारा रस्ता आपली परीक्षा घेत होता!पूर्णतः कच्चा रस्ता!
पर्वतारोहिंसाठी रस्ता होता!अंधार असल्यामुळे ग्रुपच्या पाठीमागून चालत होतो!दगडं होती,चढ अंगावर येतं होता!गारवा असूनही दम लागतं होता!🚩👏🏼
हळूहळू आम्ही आमच्या दर्शन साध्यापशी पोहचलो!सकाळचे ६-३५ वाजत होते!उजेड आल्यावर
सभोवतालचा परिसर डोळ्यांनी पाहात होतो!उंच डोंगरावरून पाठीमागे पाहत होतो!पुणे शहराचा अजब नजारा दिसत होता!आकाशात चांदण्या लुकलूक कराव्या तस कानिफनाथ गडावरून (मंदिरावरून ) पुणे शहर दिसत होतं!उंचावर असल्यामुळे अंगाला गारवा झोबंतं होता!मंदिराच्या सभोवती खाली जंगलानें वेढलेला दिसला!🚩
अंधाराचीं चादर डोंगरावरून काढली जात होती!पूर्वेच्या क्षितिजावर पिवळसर तांबूस रंग उजळू लागला होता!काही क्षणात उगवत्या सूर्य नारायणाने आपलं डोकं वर काढलं!सूर्यदर्शन!डोळ्यात भरून घेत होतो!उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने कानिफनाथांचं दर्शन घेतलं!अंदाजे अरुंद अशा एक फूट बाय एक फूट चौकोनी मार्गातून सरपटी करतं आत गर्भगृहात गेलो!आतील कानिफनाथांच्या दर्शनानें मनाची तृष्णा शांत झाली होती!मन अतृप्तीकडून आनंद सागरात प्रवेश करीत होतं!दर्शन देहातील श्वास असतं!त्याची अनुभूती कानिफनाथ चरणी माथा टेकल्यावर आली होती!दर्शन श्वासात एकजीव झालं होतो!मी मी नव्हतो!मी कानिफनाथ मंदिरातील समाधीवर विरघळत होतो!🚩
आजचा दिवस सुवर्ण अक्षरांत लिहिला गेला असेल!ट्रेकिंगतून देह परीक्षा झाली!साहसातून सुखानंद घेतं माघारी फिरलो!देह झिजल्या शिवाय सर्वोच्च आनंद नाही!हें समाधान
मन मंदिरी चिरकाल टिकणारे आहे!
🚩👏🏼🚩👏🏼🚩👏🏼🚩👏🏼
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं-९९२३०७६५००
दिनांक-११फेब्रुवारी २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment