पापडवाडीतील प्रजासत्ताक दिन
पापडवाडीतील प्रजासत्ताक दिन
🇮🇳👏🏼🇮🇳👏🏼🇮🇳👏🏼🇮🇳👏🏼
*************************
... नानाभाऊ माळी
शेती माणसाच्या जीवनाचा आधार असतें!पोटाची माय असतें!काळी माय हिरवाईतून फुललेली असतें!माय लेकरांसाठी सोनं पिकवीत असतें!काळी माय अन जनमदेती आय (आई)लेकरांना कुशीत घेऊन जीवापाड जीव लावीत असतें!जपत असतें!मांडीवर घेऊन जीवापाड प्रेम करीत असतें!अतूट धाग्यांचं ओलं नातं शिवत असतें!माया करीत असतें!...अशा काळ्या आईच्या कुशीत आम्ही गेलो होतो!पुणे जिल्ह्यातल्या खेड (राजगुरूनगर) तालुक्यातील आखरवाडी मानकर माथा येथील पापडवाडी गावात गेलो होतो!महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी अन गझलकार आदरणीय म.भा.चव्हाण यांच्या गावी गेलो होतो!त्यांच्या शेतावर गेलो होतो!भुरट-बरड मातीच्या मानकर माथ्यावर गेलो होतो!कुडकूडणाऱ्या थंडीत शेतातील हिरव्यागार पिकांच्या शेती मातीत गेलो होतो!तिरंगी ध्वजास सलामी देण्या गेलो होतो!अंतरगी वसलेल्या पवित्र नात्यास नमन करण्या गेलो होतो!🇮🇳
काल २६जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिन होता!मानकर माथ्यावर कविराज म.भा.चव्हाण यांच्या शेतातील ताठ मानेने उभा हिरवागार कांद्याच्या शेतात गेलो होतो!वाड्या वस्तीतं तुरळक घर दिसत होती!शेती अनेक आडवे-उभ्या बांधानीं विभागली दिसत होती!रानातल्या घरासमोर शेणखताचें भले मोठे ढिग दिसत होते!सेंद्रिय खतांची हिरवी शेती पाहून हृदयातल्या खोल तळाशी आनंद एकवटलेला होता!मानकर माथा झाडा झूडपांनी वेढलेला होता!पापडवाडी गावाच्या डोंगर माथ्यावरील हिरवी पिकं ताठ मानेने उभी!कितीही संकटे येऊद्यातं निसर्गाशी एकरूप झालेला शेतकरी दुःख सहन करीत आनंदी दिसला होता!गहू,हरभरा,शाळू, तुरळक कुठेतरी ऊस उभा होता!काळीमाय दर्शनासाठी गेलो होतो!🇮🇳👏🏼
काल आदरणीय म.भा.चव्हाण यांच्या "फादर फाउंडेशन" द्वारा आयोजित प्रजासत्ताक दिनीं कवी संमेलनास गेलो होतो,निसर्ग सानिध्यातील अनमोल क्षण वेचायला गेलो होतो!हृदयाने, डोळ्यांनी वेचण्या गेलो होतो! शहरातील सिमेंट-डांबरी रस्त्यावर जुपंलेलो आम्ही काळ्या आईच्या कुशीत अणवानी पावलांनी हिंडत होतो!पायाच्या तळव्यानां मातीचा अनमोल स्पर्श होत असतांना काळ्या आईची क्षमा देखील मागत होतो!म. भांच्यां शेतातील भुरट-काळी माती कपाळी लावावीशी वाटत होती!मातीचा सुखद स्पर्शाने मन हर्षित झाल होतं!🇮🇳👏🏼
शेतात बांधलेल्या फादर फाउंडेशनच्या टूमदार इमारती समोर भारत मातेचां आन-बान-शान तिरंग्यास नतमस्तक होत सलामी दिली!७५ व्या प्रजासत्ताक दिनी उंचावर फडकणाऱ्या तिरंग्यासं वंदन केले!छाती गर्वाने फुलून आली होती!देशभक्तांच्या बलिदानाने भारत स्वातंत्र्य झाला होता!स्वतःची राज्यघटना लागू झाली होती!अशा गर्व आणि गौरव क्षणाची याद हृदयात जपून आहोत!आम्ही शेती मातीत भारत मातेलां वंदन करीत होतो!फडकणाऱ्या तिरंगा ध्वजास सलामी देत होतो!🇮🇳👏🏼
शेतीप्रधान देशाच्या भूमीत आम्ही जन्माला आलो!गाव खेड्यात जन्माला आलो!आपण दररोज सकाळी उठल्यापासून माय भूमीची क्षमा मागून सतत काळ्या आईच्या मांडीवर चालत-हिंडत असतो!शेती पिकवून आम्हाला जगवीत असतें!जागवीत असतें!अशा आईचे उपकार थोर आहेत!काल काळ्या आईनें फुलविलेल्या हिरवाईतं एकजीव झालो होतो!आखरवाडीच्या मानकर माथ्यानें हिरव्या पानांच्या हलत्या फांदयानीं सॅल्यूट ठोकतं २६ जानेवारी २०२४ साजरा केला होता!🇮🇳👏🏼
ज्या मातीत जन्मलो त्या मातीचे उपकार अनंत जन्मीचे आहेत!ही भूमी थोर संतांची आहे!महान क्रांतिकारंकांची आहे!रक्त सांडलेल्या सैनिकांची आहे!बलिदान दिलेल्या शाहिदांची आहे!राजगुरू-भगत सिंहाचीं आहे!अभिमान वाटावा अशा शास्रज्ञाचीं आहे!विज्ञान अन अध्यात्माचीं सांगड घालणाऱ्या थोरा मोठांची आहे!बळी होऊन अन्न पुरविणाऱ्या बळी राजाची आहे!माझ्या माय-बाप घाम गाळून शेती पीकविणाऱ्या शेतकऱ्यांची आहे!महान तपस्विंची आहे!🇮🇳👏🏼
माझी भूमी सत्यप्रकाश देणाऱ्या सूर्य देवाची आहे!माझी भूमी एक वेळ उपाशी झोपला तरी समाधान मानणाऱ्या गोरगरीबांची आहे!माझी भूमी तळ हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब,कष्टकरी,राब राब राबणाऱ्या मजूर भावंडांची आहे!ही विशाल भूमी अनेक लेखक कविंची आहे!गुणगान करणाऱ्या शायरांची आहे!गीतकारांची आहे!गायकांची आहे!माझी भूमी कर्मातून भक्तिमार्ग अनुसरणाऱ्या सावता माळी यांची आहे!माझी भूमी संत ज्ञानेश्वर,संतश्रेष्ठ तुकोबांचीं आहे!जेथे निर्मळ स्वच्छ पानी वहातं त्या कृष्णा, गोदावरी, भीमा, यमुना, गंगा, कोयनेच्या जल प्रवाहींची आहे!सह्याद्री-हिमालय-सातपुडा-विंद्यपर्वतां ची आहे!विशाल सागराची आहे!ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे!स्वामी विवेकानंदांची आहे!🇮🇳👏🏼
माझी भूमी गझलकार म.भा. चव्हाण यांची देखील आहे!हातात लेखनीची तलवार घेऊन उभ्या असलेल्या माणसातील देव माणूस म.भांची आहे!अंधःकार दूर करून सत्यसूर्य दाखविणाऱ्या पापडवाडीच्या भूमी पुत्राची ही भूमी आहे!वास्तव दाहकतेचा अनुभव घेतलेल्या या शायराची ही पवित्र भूमी आहे!
तिरंगा अभिमानाने फडकतो आहे!नतमस्तक आम्ही होत असतो!काल फादर फाउंडेशनच्या जागेवर फडकणाऱ्या तिरंगा ध्वजास वंदन करण्या मायभूमी सुपुत्र सलामी देण्यासं उभे होते!आपल्या रचलेल्या कवितांनी सलाम करण्या गझलकार म.भा. चव्हाण,कवी नामगुडे सर, ऍड.शितोळे सर, किशोर टिळेकर, विनोद अष्टुळ, जोगदंड ताई, उदयभान पाटील, प्रल्हाद शिंदे मामा, श्री डावरे,अन ग्रामस्थ हजर होते!🇮🇳
२६ जानेवारीचां फडकणारा तिरंगा ध्वज आखरवाडीतील हिरवाईतं एकरूप झाला होता!सोनं पिकवणाऱ्या मातीशी एकरूप झाला होता!आम्हास गौरवशाली भारत भूमीची नजर देत राहिला!आमचे हृदय अभिमानाने फुलतं राहिलं!मनोमनी भरतभूचीं पवित्र माती मस्तकी लावून पापडवाडीचा निरोप घेतला!
🇮🇳👏🏼🇮🇳👏🏼🇮🇳👏🏼🇮🇳👏🏼🇮🇳
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२७ जानेवारी २०२४
Comments
Post a Comment