ढिंडंरं खायी गधडं वायी या हो
ढिंडंरं खायी गधडं वायी या हो
💐😀🦄😀💐🙏
***********************
...नानाभाऊ माळी
राम राम हो!बठ्ठा खेसरना नाता- गोताना!आटा-साटानां!गन-गोतनां !मामा-फुयीनां!साला-सालीनां!सासू -सूनन्हा!व्हवू-फुयीनां बठ्ठा 🦄पयी-पावनास्वन...!कालदिन उतरान व्हती!संक्रांत व्हती!गोड-धोड खादं!अहो,पोटन्या दोन्ही कुखा तट व्हवा पाऊत खादं!चांगलं कुमचाडी खादं! काल्दीन रात गयी!बठ्ठ जिरी गये व्हयी नां!आज कर से बरका? लवकर उठा!उठा हो!का कावड आगय करी आडाधट पडेल सेतस?😀🦄
उठा हो!सक्काय व्हयनीं नां!!बय, हेट्या लालभुदुगं सूर्य नारायण उगी ऱ्हायना!घरमा मस्तगं मग मगात वास यी ऱ्हायना!तयेंल तेल फुलनां!बारीक कांदा कापेलं!मीठ-मिरची कालायेंलं! नेम्मन वलेलं!बेसनं पीठनीं राबडी
तावावर टाकेलं व्हयी!खालतीनं उब्यानीं धुग धुगीम्हा धिंडर-ढिंडंरं तयायी ऱ्हायनं व्हयी!तावावर हूलतनीं घायी उलटं-पालटं करी भू भारी
तयायंनं व्हयी!चांगलं सीजनं व्हयी!तोंडलें निस्त पानी उनं व्हयी!आंधारें-झापाटें खायी ल्या!आनी लवकर कावड हुगाडी नींघा बरं!बय तथा तुम्हनां वावरम्हा कायजुनं "गधडा" घुसी जायेलं सेतस त्या मातरं वायी या हो!!!!😀🦄
तश्या तुम्ही आयधी-आयशी सेतसचं!रोज,उगता सूर्यदेव तुम्हनां गांडवर लाथ मारी उठाडतं ऱ्हास!कमसे कम आज तें लवकर उठा!बय,तथा
मयाम्हा उलगवाडी व्हयी जायी!
थंडीम्हा खुशाल झावर-गोधडीनीं गरमायींम्हा पडेल सेतस!तथा गहू- हरभरा-दादर खायी,चेंदी-खुंदी गधडा बठ्ठ उगवाडी करी टाकतीनं शे का कायजी तुम्हलें?भलता निकायजी सेतस हो तुम्हीनं!!!😀🦄
बाहेर थंडी से!घरमा गरमायीं से!तुम्ही खेसरना सेतस!तोंडंवर आक्सी बारा वाजेल ऱ्हातसं!जल्दी उठा!का आंगवर पानी टाकू?थंडीम्हा जल्दी उठनार सेतस!गावम्हा मोक्या सोडेल गधडांस्ना मांगे पयनार सेतस!गधड मव्हरे पयी!तुम्ही मांगेतून पया!पयी- पयी पोटन्ह जिरी!घर येवावरं तयेलं ढिंडरं चांगला कुमचाडिं खावा नां!!
इचार करवा तव्हयं ध्यानमा येस,बय हासनं-हासाडांनं कितलं दूर निंघी जायी ऱ्हायनं भोस्वन!लोके हास्तसं नई!कंजूसी करतंसं!कायम बारमाही तोंडंवर सूत्तक ली फिरतसं!खेसर नई!आनंनं नई!पैसा सेतस!आनंनं इकत लेता येतं नई!नाता-गोतास्न आसं काय व्हयी जायेलं ऱ्हास बरं?आक्सी तोंडं फुगेलं नां गत वागतसं!तोंडं पाडी बसतंस!फुकटन्ह आजारपन घरमा लयी फिरतसं!माटीनं घर पाडी सिमेंटन्ह व्हयी ग्ये!सिमेंटन्हा घरमां सुख भेटी नई ऱ्हायनं!मन तीतूर ऱ्हासं!लाव्हरी ऱ्हास हारीन ऱ्हास!कव्हयं उडी-पयी जासं सांगता येतं नई!मन सुखे-समाधाने तें घर सुखे!मंग गल्ली गाव,बठ्ठा लोके आनंदी ऱ्हातसं!😀🦄
कव्हयं गधडं व्हयी जावो!एक
दुसरालें कटबन लाथा मारा लेवो!लाथा मारी थकावर एक दुसरालें
आमायीं-कोमायी लेवो!बय बठ्ठ निंघी जास हो!मनम्हा बठेल मय-माटी, संगयेलं गचपनं बठ्ठ निंघी जास!खेसर मनोसले जित्ती ठेवस!खेसर संगे गधडां लयी फिरो!बठ्ठ संगयेललें लाथा मारो परं करो!साला-साली, आत्या-सासू, सासरा-जवाई, माम्या-मामांना पोरेस्नी कुमचाडी
ढिंडरा खायी गधडां वायी येवो!काय सुख से!!!!!बस्स जिंदगीनं पांट
पलटतं ऱ्हास!आपला मुये जग सुखी व्हस!मंग आज कर से हो!लवकर उठा!ढिंडंरं खावा!गधडं वायी या हो!
🌹😀🦄😀🙏🌹
***********************
... नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
(ह मु हडपसर, पुणे-४११०२८)
दिनांक-१६ जानेवारी २०२४
Comments
Post a Comment