रात्रीच्या गर्भातून सूर्य उगवतो आहे!

रात्रीच्या गर्भातून सूर्य उगवतो आहे
💐🙏💐🙏💐🙏💐🙏
**************************
... नानाभाऊ माळी 

     घन रात्र गर्भवती होती!भल्या पहाटे प्रसूती वेदना सुरु होत्या!रात्र तळमळत होती!वेदनेच्या गर्भातून  जन्म घेणारा ढुंश्या मारीत होता!कळा अनावर झाल्या होत्या!अंधार अनावर चित्कारली होती!अनावर कळ आली होती!घामेजली झाली होती!प्रसूत होऊन शांत झाली होती!अंधार गर्भातून लाल गोळा बाहेर येतं होता!अंधार गर्भाला मागे ढकलीत बाल सूर्य जन्म घेत होता!अंधार जन्म देऊन शांत पहुडली!वलंयांकित अनंत छटांसंगे प्रकाश किरणे अंधाराला दूर ढकलीत होते!धरती प्रकाशमान झाली होती!सूर्याची अनंत कोवळी किरणे जीव जीवांना जागवीत होती!जन्म घेता इतरांना उठवीत होते!🌹

सुंदर सकाळ मनमोहक होती!निसर्ग फुलला होता!पक्षांचा चिवचिवाट कानानां गोड ध्वनी पुरवीत होता!मांगलीक गीत गात होते!उगवणाऱ्या तांबूस बाळाच्या स्वागतासाठी अवघी सृष्टी उत्साहाने नाचतं होती!धरतीनें हिरवी साडी नेसली होती!नटून थटून  अनंत फुलांची माळ घेऊन उभी होती!सूर्यदेवाच्या गळ्यात पुष्पमाला टाकण्यासाठी उत्सुक होती!🌹

अवघी सृष्टी प्रसन्न होती!झळाळत्या झरण्यांचा ढोल कानी पडत होता!धबधबा खोल दरीत उडी घेत नगारा पिटवीत होता!दुग्धरुपात फेसाळला होता!सर्वदूर उत्साहाला उधाण आले होते!सृष्टीतील जीव जिवाणू काम क्रीडेत व्यस्त होती!निर्मितिच्या ध्यासात मशगुल होती!सकाळच्या कंबरेवर बसलेला सूर्यदेव हळूहळू वर चढत होता!प्रकाशमान झालेल्या क्षितिजावर मांगलीक ध्वनी कानी पडत होतें!🌹

सकाळ उत्साही असतें!बाल असतें!खेडकर असतें!खोडकर असतें!वात्रट असतें!प्रसन्न असतें!हवी हवीशी वाटते!सकाळ मांगलीक असतें!मोहवीत असतें!डोळे हिरव्यागार सृष्टीच मनमोहक रूप हळूहळू पीत असतात!अथांग सागर काटांवर आपल्या विशाल लाटा आदळीत असतो!जणू शिवशक्ती जटा आदळीत असावी!अथांग सागराच्या अंगावरून, दूरवरून एखादी नाव दिसावी, बोट दिसावी!आपल्या कडेच येतं असावी!आपण काटावर उभे असावं!अन उगवत्या सकाळी बोटीवर बसून आपण दूरच्या प्रवासाला निघून जावं!

प्रवास जन्माचा सुरु होतो!आनंद देत असतो!आनंद सर्वदूर पसरलेला असतो!अनंत फुल वेलींचा सुगंध दरवळत असतो!आपण धुंद व्हावं!नव्या सकाळी,सूर्यसाक्षीने स्वतःसं आनंदास अर्पित करावं!सकाळ शुद्ध असतें,तुळशी वृन्दावनातील पवित्र तुळस सारखी येथे दुःखाचा मागमूसही नसावा!धामणीतल्या श्वासांना सांगावं, "शुद्ध आहे तें उगवत्या प्रकाश साक्षीने,फुललेल्या सृष्टी साक्षीने ओढून घे! अखंड वनराईतून प्रवास करणाऱ्या नदीत पाय ठेवून बसू दे!फुल वेलींच्या सानिध्यात सुगंध घेत एकांती आनंद घेऊ दे!उगवतीच्या साक्षीने सौंदर्य न्याहाळू दे!आनंद दररोज हृदयी घेऊन हिंडू दे!"

आज भोगी आहे!मकर संक्रातीआधी सर्वचं एकजीव होऊ दे!निर्मळ, निरामय होऊ दे!सूर्यदेव आपल्या अनंत किरणांना सोबत घेऊन जन्मोजन्मी,दररोज गरोदर रात्रीच्या पोटी जन्म घेत असतो!आनंद देत असतो!आज तोचं आनंद तिळगुळ म्हणून वाटतं राहू!मकर राशीतं प्रवेश करू!🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
****************************
.... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक!१४ जानेवारी २०२४
      🌹🙏भोगी🙏 🌹
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol