भाग्य भाग्यास भेटू दे

भाग्य भाग्यास भेटू दे
💐👏🏼💐👏🏼💐👏🏼
*******************
... नानाभाऊ माळी 

     पृथ्वीवरती जन्म घेणे भाग्यात असतें काही!जन्मुनि जन्म सिद्ध करणे तो जन्म एकटा नाही!ज्यांच्या पोटी जन्म घेती दैवी देव असती काही!माता असो वा पिता कुणाचेही धावती दिशा दहाही!घामेजलेलं यश शिखर खरंचं सुखकर नाही!💐

कसं आहे बघा ना!वेळ,काळ कुणासाठी थांबत नसतें!वय देखील थांबत नसतं!कालचक्र पळत असतं!बालपण सोडून तारुण्य पळत असतं!तारुण्यातून उमेदीच्या घोड्यावर स्वार होत स्वप्न पूर्तीच्या आशेवर धावणे सुरु होतं!दिवसांच्या धावा मोजीत पुन्हा वय वाढीच्या दिशेने मार्गक्रमण सुरु होतो!बालपणी आईने अंगा खांद्यावर वाढवलेंलं असतं!मायेने पदराआड अंगावरचं दूध पाजलेंलं असतं!तिचं मुलं अतिशय कष्टातून यशस्वी होत स्वतःच्या पायावर उभे राहिलेले असतात!👏🏼

कष्ट-मेहनत सत्याचे साथीदार असतात!साक्षीदार असतात!डोक्यावरील सूर्य चटक्याचे वाटेकरू असतात!येणाऱ्या पिढीचे आदर्श असतात!उत्तम अनुभव गुरु असतात!वय वाढले,थकले तरी उत्साह तरुण असतो!मन जवान असतं!वयाला खेळवत खेळवत उमेदीला पळवत असतं!आशा खूप खोडकर असतें!आशा कधी हशा करते!त्यातून चरित्र उभे करीत,कलत्या सूर्य साक्षीनें कमविलेले संचित दान देत,आनंद घेत सुरकुतलेल्या देहाला पश्चिमेकडे नेत राहायचं!💐

वाट संपत नसते!आसं संगत असतें!श्वासांना जगणं मोजण्याची शास्वती देत पश्चिमेकडे वाटचाल सुरु होते!माया,प्रेम,ओढीला हाताशी घेत दिवस चालत असतो!उगवता सूर्य तजेला घेऊन वरती येत असतो!पश्चिमेंकडे कललेला सूर्य आयुष्य मोजीत
धिम्या गतीने थकवेला झालेला असतो!तरीही मोह आशेला पाणी पाजत उभी असतें!संध्याकाळच्या दारापाशी उभी असतें!👏🏼

आयुष्य कारणी लावून कलत्या सूर्यकिरणांची मोजदात करणारं आयुष्य म्हणजे मोह मायेचा अनाकलनीय प्रवास आहे जणू!बस्स देणारा तोचं असतो!घेणाराही तोचं असतो!या 'तो'ला पाहण्याची प्रबळ इच्छा असतें!श्रद्धा अपुरी पडते? का बुद्धी?खरचं शेवट पर्यंत अनभिज्ञ असतो आपण!मग कोणी ७४ वर्षाचं होतो!कोणी ७७ वर्षाचं होतं!तर कोणी १०० री पार करीत अनंत आशिर्वादाचें सुरकुतलेले हात डोक्यावर ठेवत असतो!तो हात मानसिक शक्ती प्रदान करीत असतो!श्वासात प्राणवायू ओतीत असतो!जगण्यासाठी जादूची कांडी देत असतो!असे हात सतत डोक्यावर राहावे म्हणून श्रद्धा दैवताजवळ प्रार्थना करीत असतो!

दोन्ही थोरले बंधू आणि आई!... दैवतं आहेत!या जन्मी भाग्याने मिळालीतं!भाग्य विधात्यास विनंती आहे की अनेक जन्म असतील तर जन्मोजन्मी देवाने पाठविलेले हेचं रक्ताचे नाते नेहमीच असू दे!💐
💐👏🏼💐👏🏼💐👏🏼💐👏🏼
**************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१२ जानेवारी २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol