चला जाऊ गड -किल्यांवर (भोरगिरी किल्ला भाग-०२)
चला जाऊ गड-किल्ल्यांवर
(भोरगिरी किल्ला भाग-०१)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**********************
.... नानाभाऊ माळी
माणूस साहसाचां भुकेला असतो!अचाट अन वेगळं काही आपल्या हिमतीवर करण्यासाठी तडफड असतो!सुवर्णयोग येण्यासाठी वाट पाहात असतो!आलेल्या संधीच सोनं करण्यासाठी जान पणाला देखील लावत असतो!आपलं अस्तित्व शोधत असतो!अशाचं मोहिमेविषयी....🌹
घनदाट अरण्य म्हणजे झाडांची दाटीवाटी!किर्रर्र वनराई!जिकडे पाहावे तिकडे हिरवाईचं आच्छादन!लहान-मोठी,गगनाशी स्पर्धा करणारी हर तऱ्हेची झाडं!झाडांच्या दाटीवाटीतून वर पाहिल्यावर पानापानातून डोळे मिचकावणारा सूर्य दिसत असतो!एखादा सूर्य किरण जमिनीच्या तळाशी उजेड शोधत असतो!कुठेतरी झाडाझुडपातं कृमी कीटक अन्न शोधत असतात!घनदाट अरण्यात उंच डोंगर दिसतात!झुळझूळ वाहणाऱ्या नद्या असतात!खोल उभट दरी असतें!उभट कडे दिसतात!उभट कडयांच्या आत सफाट भू भाग असतो!त्याला मानव निर्मित उंच भक्कम तटबंदी बांधलेली दिसतें!कदाचित यालाचं किल्ला म्हणत असावे!🌹
किल्ला मानवरुपी शत्रू अन हिंस्र प्राण्यांपासून रक्षण करीत असतो!कब्जा मिळविणे,वर्चस्व गाजविणे, हिंसेतून सत्ता गाजविणे!ही प्राचीन काळापासून चालत आलेली सत्ता लोलूप लालसा आहे!मानव मानवाचाच शत्रू असतो!शत्रूवर विजय मिळवून,आक्रमण करून स्वतःची राज सत्ता निर्माण करणारा माणूस डोंगराच्या उंच सफाट भू भागावर सुरक्षित किल्ला बांधून सत्ता गाजवीत आला आहे!किल्ला मानवी शक्तीचं, ताकदीचं राजसत्तेची मुख्य केंद्र होती!
किल्ल्यावर स्वतःची विशिष्ट राजसत्ता प्रस्थापित करून मानवी मनावर,सैन्य बळावर सत्ता गाजवत सत्ता केंद्र निर्माण झालेली होती!इतिहासातील पाने कधी रक्ताने माखली आहेत!तर कधी शौर्यानें गाजलेंली आहेत!मग कधी रयतेचां कल्याणकारी राजा जन्माला आला!रयतेच्या सुखासाठी!हिंदवी स्वराज्यासाठी आपला देह चंदन करून झिजवला असे छत्रपती शिवाजी राजे देखील होऊन गेलेत!
किल्ला शक्ती केंद्र होती!ऊर्जा केंद्र होती!सत्ता केंद्र होती!भारतातील किल्ले अन महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ले आज अर्धवट पडक्या अन जीर्ण अवस्थेत असले तरी किल्यांवरील तत्कालीन भक्कम बांधकाम पाहून गत इतिहास डोळ्यासमोर आल्यासाशिवाय राहात नाही!किल्ले शक्तीच्या बळावर बळकावली गेली अन ११व्या १२ व्या शतकानंतर भारतीय प्राचीन संस्कृतीची अधोगती बखरकारांनी इतिहासातील पानापानावर नमूद केलेली आहे!विलंय आणि निर्मिती सतत घडत असतें!सत्याचा सूर्य कित्येक अंधंकारी रात्रींना सुरुंग लावून उगवत असतो!छत्रपती शिवराय तेजस्वी सूर्य होते!नंतर पेशवाईनें संस्कृती रक्षणासाठी लढा दिला होता!त्यात किल्ला,गढी,वाडा अन दुर्ग अशा अनेक ठिकाणाहून सत्ता हाकली जात होती!
इतिहासातील तग धरून असलेल्या सत्तावास्तूं डोळ्यांनी पाहून राष्ट्राभिमान आपल्या नसानसातून सळसळू लागतो!जाज्वल्य देशभक्ती आपल्या छातीतील धमणीतून जीवंत होऊ पाहते!राष्ट्र रक्षणासाठी इतिहासातील तलवारी, ढाली, भाले, तोफा खणखनू लागतात!आपले पाय पुन्हा गत इतिहासातील किल्ल्यांकडे वळू लागतात!अंगात 'जोश' संचारतो!श्वास अभिमानाने फुलतो!'जय शिवाजी'!'जय भवानीची कानठळी बसवणारी गर्जना प्रत्येकाच्या मुखी खणखनू लागतें!मुखातील एक सूरी गर्जना तलवार होते!शूर योध्या सारखेच आपण किल्ल्यावर चढू लागतो!आपण किल्ला रक्षक मावळे बनून वीरश्री मिळविण्या किल्ल्यांवर चढू लागतो!🌹
होय!होय!आम्ही अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला भोरगिरी किल्ल्यावर गेलो होतो!आमचे सेनापती आदरणीय वसंतराव बागूल सर यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातल्या खेड तालूक्यातील भीमाशंकर वनराई अभयारण्यात डोंगर दऱ्यांच्या कुशीत!!सापसूळी भीमा नदीच्या तटावर प्राचीन काळापासून आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेल्या 'भोरगिरी' किल्ल्यावर गेलो होतो!काल रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३रोजी गेलो होतो!साहस,शक्ती,युक्ती,ऊर्जा,कुवत याचां प्रत्ययं येण्यासाठी गेलो होतो!स्वतःस अजमाविन्या गेलो!भोरगिरी किल्ला मोहिमेवर गेलो होतो!
(भोरगिरी किल्ला मोहीम पुढील भाग-०२ मध्ये पूर्ण करू)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२५ डिसेंबर २०२३
Comments
Post a Comment