शिक्षक
शिक्षक
🌹🌹🙏🌹🌹
*************
... नानाभाऊ माळी
गुरुजन डोळ्यासमोर आले की आपोआपच आपली मान झुकते!आपले हात अन डोकं गुरुजनांच्या पायांवर टेकले जातात!ज्ञानश्वास भरणाऱ्या गुरुजनांच्या प्रति ऋणभाव अन आदरभाव व्यक्त होत असतात!शिक्षकांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ नये असं वाटतं असतं!जीवनदर्शक शिक्षक लाभणे मोठं भाग्यचं समजावं!शिक्षक ज्ञानसागर असतात!विचारसिंधु असतात!भाग्यविधाते असतात!आदर्श असतात!ज्ञानडोळा असतात!विचारविश्व असतात!विद्यादाता असतात!ज्ञानश्रद्धा असतात!🌹
शिक्षकांच्या समर्पित ज्ञान प्रकाशाने आपण उजळून निघत असतो!आपल्या सारख्या मातीच्या गोळयास आकार देण्याचे उपकार महान असतात!श्रद्धागुरु हृदयात जाऊन बसत असतात!गुरुजनांचं ज्ञानबोट धरून आपण मार्गक्रमण करीत असतो!आपल्या समोरील अंधार पडदा दूर सारला जात असतो!ज्ञान
उजेडाने आपण डोळस होत असतो!शिक्षक नावाच्या ज्ञानपरीसाला स्पर्श करून,घासून आपण सोनें होत असतो!!🌹
विध्यार्थी घडविणारे शिक्षक ज्ञान रचिता असतात!विध्यार्थी एक एक ज्ञान पायरी चढत,ज्ञान उजेड प्राप्त करीत असतो!परमेश्वर, आई-वडीलांनंतर गुरुवर्य परमपूज्य असतात!पूजनीय व्यक्तिमत्व जीवनदृष्टी देत असतात!ज्ञानरस्ता दाखवीत असतात!शिक्षक गावात, शहरात,नेहमीच पूजनीय असतात!विध्यार्थी शाळा,कॉलेजमधून शिकून बाहेर पडल्यावर आदर्श नागरीक बनत असतात!वयाने,ज्ञानाने समृद्धीकडे वाटचाल करणारे विध्यार्थी आदर्श शिक्षकांचे आवडते विद्यार्थी असतात!विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी आपल्या शिक्षकांप्रती असलेली
ऋण निष्ठा कायम असते!शिक्षक कुठेही भेटुद्यात विद्यार्थी आदराने नतमस्तक झाल्याशिवाय राहात नसतात!🌹
मला आदर्श शिक्षकांचा नेहमीच हेवा वाटत असतो!ते कुठेही गेलेत तर त्यांना मिळणारा सन्मान कधीही पैशात मोजदाद होत नसते!ज्यांच्यामुळे ज्ञानवंत,प्रज्ञावंत होऊन नावलौकिक मिळविलेला विद्यार्थी जेव्हा गुरुजनांच्या पायावर डोकं ठेवतो तो क्षण कशात मोजता येणार आहे बरं?मी गुरुजनांचा आयुष्यभर ऋणी राहील!ज्यांनी ज्ञानामृत पाजून मला उभे केले!डोळस केले!ज्ञान दिले!जीवनाचा उजेड दिला!उजेड घेऊन हिंडतांना अंधार बाजूला सारतो आहे!म्हणूनच विद्येलां वाघीनीचे दुध म्हणतात!मी जर शिकलो नसतो तर आयुष्यभर शेतमजूर राहिलो असतो!दोन वेळचं जेवण देखील महाग झालं असतं!पोटा पाण्याचा प्रश्न सोडवणारे, ज्ञानश्वास भरणारे शिक्षक, ज्ञानाउजेड देऊन मोकळे झाले!पण जन्मभराचे हृदयी जाऊन बसलेतं!🌹
माझंही स्वप्न होत,शिकून शिक्षक व्हावं!ज्ञान दानाचं पवित्र कार्य करावं,कदाचित असलं भाग्य माझ्या कपाळाच्या पाटीवर लिहिले नसावे!कित्येक वेळा मी स्वप्नात शिक्षक होत असतो!विद्यार्थ्यांसमोर उभा असतो!जीवनमूल्य शिकवीत असतो!आदर्श विद्यार्थी घडवीत असतो!.... पण स्वप्नचं तें!शिक्षक नावाचा ज्ञान गाभारा माझ्या हृदयात बसवीत असतो!मनाचं समाधान करून घेत असतो!शिक्षक नावाच्या ज्ञानियास नतमस्तक होत असतो!शिक्षक विद्यार्थी अन समाजाचा ज्ञानसूर्य असतो!उगवत्या समाजासं ज्ञानप्रकाश प्रदान करीत असतो!🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐
**************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२४ नोव्हेंबर २०२३
Comments
Post a Comment