कौटुंबिक मेळावा अन खान्देश माळी मंडळ 🌹

🌷 कौटुंबिक मेळावा🌷
     अन खान्देश माळी मंडळ
💐💐💐💐💐💐💐💐💐
****************************
... नानाभाऊ माळी 

घरात आई-वडील,मुलं,भाऊ-बहिणी  एकत्र राहात असलें की त्याला आपण कुटुंब म्हणतो!कुटुंबाचीं संख्या कमी जास्त राहू शकते!कुटुंबातील माणसं नात्यांचे धागे जोडत असतात!संपर्क,सहयोग, जिव्हाळा,त्यागातून कुटुंबातील माणसं एकजीव झालेले असतात!त्यामुळेचं एकत्र राहात असतात!असं कुटुंब आदर्श असतं!🌷

अनेक कुटुंब एकत्र येऊन एखादा कार्यभार पार पाडीत असतील तर त्याला आपण कौटुंबिक कार्यक्रम म्हणत असतो!अशा अनेक कुटुंबांचा समाज बनत असतो!समाजात वावरतांना कर्तृत्व,कष्ट,त्याग भावनेचा अंश सतत एकसंघ भावनेला जोडत असतो!समाज अनेक कुटुंबाना जोडत असतो!त्या समाजाच्या परंपरा,चाली-रीती,रीती -भाती एकसामान असतात!असाच एक कौटुंबिक मेळावा काल रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्यातल्या भोसरी येथील "लांडगे नाट्य गृहात पार पडला!"खान्देशातून पुणे जिल्ह्यात येऊन राहात असलेल्या,स्थायिक झालेल्या माळी समाजाचा कौटुंबिक मेळावा होता!गुणवंत पाल्यांचा  गुण गौरव समारंभ होता!🌷

जन्म भूमीतून पुण्यासारख्या ज्ञान भूमीत,कर्मभूमीत आलेल्या अन संसार थाटलेल्या कष्टाळू, होतकरू माळी समाजाचा हा कौटुंबिक मेळावा होता!कौटुंबिक मेळाव्याचं हे २५ वे वर्ष होतं!रौप्यमहोत्सवी होतं!हा मेळावा काल रविवार दिनांक २२ऑक्टोबर २०२३रोजी मोठ्या दिमाखात पार पडला!२५व्या वर्धापन दिनानिमित्त अतिशय, सुबक, सुरेख, सुंदर अशी खान्देश माळी मंडळाची स्मरनिका प्रकाशित करण्यात आली!स्मरनिका डीरेक्टरी आहें पुण्यातल्या समाज बांधवांची!४००तें ५००किलोमीटर दूर असलेल्या खान्देशातून येऊन पुण्यातील विविध भागात स्थायिक होऊन संसार थाटलेल्या अतिशय कष्टाळू समाजाचा हा कौटुंबिक मेळावा म्हणजेच आदर्श मेळावा होता!

पूर्वी ३०-४०वर्षांपूर्वी पुणे परके वाटत असें!आज पुण्यात खान्देश वसलेलं पाहून अभिमान वाटत असतो!पुण्यात खान्देशांतील पारंपरिक सन साजरे करून खान्देशाचं वेगळेपण अधोरेखित करणारा हा मेळावा म्हणजे पुण्यातल्या मातीत एकजीव झाले असल्याचं उत्तम उदाहरण आहें!🌷

खान्देशातून येऊन पिंपरी,चिंचवड, भोसरी, आकुर्डी, सांगवी, चिखली, कोथरूड, वारजे, हडपसर वाघोली, कात्रज, सिंहगडरोड नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात राहात असलेल्या माळी समाजातील काही जिद्दी बांधवांनी जून १९९९साली मंडळाची स्थापना केली!नाव ठेवलं "खान्देश माळी मित्र मंडळ!" मंडळ रजिस्टर केलें आणि या जिद्दी,कष्टाळू माळी समाजातील बांधवांना संतूश्रेष्ठ सावता महाराजांनी दाखवून दिलेल्या संत परंपरेतील मार्गांवर चालायची नामी संधी मिळू लागली!संताचा कर्म सिद्धांतावर चालत राहून पुढे जायचं होतं!🌷

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या आदर्श शिक्षण आणि डोळस मार्गांवर चालण्याची शिकवण अंगी बाळगत असतांना माळी समाजातील थोर कामगार नेते रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांचाही आदर्श
चालविण्यासाठी कठोर परिश्रमांची गरज आहें असें खान्देश माळी मंडळाच्या सदस्यांनां वाटू लागली!पुण्यात समाज एकत्र आला पाहिजे, कौटुंबिक समस्यांचे निराकारण झाले पाहिजे, त्यामुळे कौटुंबिक मेळावे घेणे, विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करणे आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजेच पुण्यात लहानाची मोठे झालेली तरुण पिढीसाठी विवाह योग जुळून आणण्यासाठी वधू-वर मेळावे आयोजित करणे असें अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून पार पडू लागले!🌷

प्रथम अध्यक्ष श्री एस के माळी साहेब यांच्या कृतिशील विचारांनी त्यांच्या कार्यकारणीने पाया रचला!तदनंतर आलेले अध्यक्ष श्री पी के महाजन साहेबांच्या कारकिर्दीत खान्देश माळी मंडळाने आळंदी सारख्या संतांच्या भूमीत ११गुंठे जागा विकत घेतली!खान्देश माळी मंडळ पुण्यातल्या
 नावलौकीक असलेल्या आदर्श मंडळात गणले जात आहें!खान्देश माळी मंडळाचीं स्वतःची वास्तू उभी राहण्यासाठी!खान्देशातून येणाऱ्या समाजातील गरजू,गरीब विद्यार्थ्यांना स्वस्तात या हॉस्टेलमध्ये तात्पुरती राहण्याची सोय होईल!खान्देश माळी मंडळातील सर्वं पदाधिकारी, सदस्य एक दिलाने कार्य करून मंडळाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योगदान देत आहेत!आज पर्यंत २४ राज्यव्यापी वधुवर मेळावे व २५व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या कौटुंबिक मेळाव्याचं आयोजन करून एक आदर्श ठेवला आहें!येत्या १७डिसेंबर २०२३रोजी वल्लभ नगर येथील अत्रे सभागृहात माळी समाजाचा भव्य राज्यव्यापी वधू वर मेळावा आयोजित होणार आहें!🌷

मनुष्य जन्म घेत असतो!मरण ठरलेलं आहेचं!पण मरणा आधी जर आपण कोणाच्या कामी आलो तर मरणा आधीच समाधान काही वेगळेच असतं!माणूस स्वतः पुरता न जगता समाजासाठी देखील आपलं जीवन अर्पित केलं तर जीवन सिद्ध झाल्याचं समाधान वेगळं असतं!मारणाआधी माणुसपण पेहरीत मरण यावे!जगणं आपलं सिद्ध करून जावे!काल भोसरीतील समाज बांधवांनी कौटुंबिक मेळाव्याचं भव्य दिव्य आयोजन करून मनाचं,तनाच, हृदयाच, समाजाचं पारणं पदरात टाकून घेतलं!समाजाच्या आळंदी येथील भव्य वास्तुसाठी देखील समाजातील व्यक्तींनी पुढाकार घेतला, आर्थिक मदत केली तर स्वप्न लवकच साकार होईल!आळंदी सारख्या ठिकाणी "खान्देश माळी मंडळाची वास्तू " दिमाखातं डोळ्यात भरेलं असं स्वप्न मनी बाळगून कालच्या कौटुंबिक मेळाव्याचं आयोजन करणाऱ्या भोसरीतील सर्वं बांधवांचं अभिनंदन करतो!अन थांबतो!
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक २३ऑक्टोबर २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)