पप्प्पा मी यतोय

पप्पा मी येतोय
💐💐💐💐💐💐💐
**********************
... नानाभाऊ माळी 

हे दुःखा!तू डोंगर आहेस!तू अजस्र आहेस!तू कहर आहेस!तू आघात आहेस!तू रौद्र आहेस!तू डोळ्यातले अश्रू आहेस!तू वेदना आहेस!तू आहेस तरी कोण मग? तू सतत जिंकत असतो!तू जिंकण्यासाठीचं आव्हान देत असतोस!तुझा विस्तार आहेस तरी किती? तुझे आव्हान स्वीकारून माणूस तुझ्याशी दोन हात करीत असतो!तुझ्याशी झुंज देत असतो!तू टाकलेल्या अस्मानी खेळात,पासात माणसाला फसवतो!लोळवतो!💐

तू दिलेल्या यातनांनी घायाळ झालेला मनुष्य हतबल,असाह्य होऊन अश्रू गाळून मन हलके करून घेत असतो!दुःखा तुचं सांग कोणाचा दोष असतो यांत?दोषी म्हणून जाहीर करतोस आणि कायमच्या वेदना देऊन निघून जातोस!तू हसत असतोस!माणूस हतबल होऊन उभा असतो!tu माणसांच्या डोळ्यातून पाणी काढत असतोस!असा काय गुन्हा असेल बरं?तू दिलेल्या यातनांनी अश्रू गाळत बसने हाती येतं असतं!अरे दुःखा!! तुचं सांग?तुझी व्याख्या आहें तरी कशी?तू काळ आहेस का मग? माणसाच्या मांगूटीवर बसतो!फरफट करतोस!अन गुन्हा नसतांना देखील त्यासं गिळंकित करतोस!💐

किती किती गोंडस!किती गोड मुलगा होता रें!वय फक्त १२वर्षांचं!उमलते हसरे फुल होत!घरभर आपल्या आवाजाचं संगीत देत राहायचा!त्याचं निरागसपण!त्याचं निर्मळ मन!त्याचा हसरा चेहरा!त्याचं लाघवी बोलणं!सर्वं काही कृष्णरूप होतं!सर्वं हवहवसं वाटायचं!तो बगीच्याची शोभा होती जणू!माणसांच्या बगीच्यामधील अनंत फुलांगत एक फुल होतं रें तें !हे दुःखा!!!तू त्या नीरागस बाळावर आघात केलास!

काय गुन्हा होता त्याचा? काय शतृत्व होतं त्याच्याशी?किती जग पाहिलं होतं त्याने?१२वर्षात काय पाहिलं होतं त्याने?तू मर्द समजतोस ना? हे दुःखा तुचं सांग बरं त्या बाळाचा गुन्हा? तू निर्दयी आहेस!निमित्त डेंग्यूचं झालं!हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला!कितीतरी डेंग्यू पेशंट डेंग्यूमुक्त होऊन आपापल्या घरी गेली!मग यालाच तू ठेवून घेतलेस? हो 'स्वामीला' तू जवळ केलंस!नाव देखील स्वामी होतं रें त्याचं!तिन्ही जगाचा स्वामी भयाला घाबरला नसता!💐

डिस्चार्ज होण्याची वेळ होती!अन अचानक रक्ताची उलटी व्हावी? हे तू निमित्त शोधलं होतंसं का रें?स्वामीला ताबडतोब icuतं ऍडमिट केलं रें!ऐक निर्दयी दुःखा तुचं!केवळ उलटीचं निमित्त झालं!icu मध्ये ऍडमिट केलं!तेथून जिल्ह्याच्या ठिकाणी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले!तेथून नाशिकला नेलं अन रात्री हातात काय मिळालं?त्या हसऱ्या बाळाचा निस्तेज चेहरा!अचल शरीर!आमचा हसरा 'स्वामी' घेऊन तू विकट हास्य करीत उभा आहेस दुःखा!स्वामी माझा बोट धरून चालला आहें!कित्येक वेळा शिरपूरला यायचो!स्वामी १२वर्षांचा होता!पण माझ्याशी मित्रासारखा बोलायचा!त्याचा बोट धरून मी शिरपूरमध्ये फिरत राहायचो!त्याचं बोलणं गोड होतं!हसरं होतं!बोलकं होतं!अशा कृष्ण कान्हासं तू उचलून घेतलेस!💐

तू निर्दयी आहेस!वेदनेतून दुःख जन्माला घालतोस!स्वामी तू आवडता होतास रें!मी कित्येक दुःख पाहिलेतं!... रडलो नाही रें!... आजचं दुःख हृदय पिळवटून टाकणारे होतं!दुःखा विचार त्या मुलाच्या आई वडिलांना!विचार त्या मुलाच्या आजी-आजोबांना!विचार त्या बाळाच्या आत्यांना!त्यांच्या वेदना भळभळून वाहात आहेत!१२वर्षाच्या निरागस बाळास आज मातीत पुरतांना पाहिले रें!शाळेत ७वीत शिकणारं तें छोटस फुल हसऱ्या वेलीवरून खुडून घेतलेस!दुःखा तू दयाहीन आहेस!आज त्या मुलाच्या आई-वडिलांना दुःख देऊन पसार झाला आहेस!💐

मानवी जीवन शेवटी झोका आहें का?परवलंबी आहें का? पराधीन आहें का? हवेचा झोका आहें का!का श्वासाचां खेळ आहें?अधांतरी तरंगत राहायचं!कधी झोक्यावरून पडाल सांगता येतं नाही!खाली-वर जाणाऱ्या सुख दुःखासोबत जगतं राहायचं!निपुटपणे सहन करीत राहायचं!दुःखा तुचं सांग मग!तूझ्या पराधीनतेच्या खेळात माझा बोट धरून चालणारा माझा लाडका भाचा हिरावून घेतलास!!स्वामी बाळा तूला ठेवले!तूझ्या अंगावर प्रत्येकजन पाच मूठ माती टाकत होते!तू गेलास!सर्वांना चटका लावून गेलास!

आज मंगळवार होता!१७ ऑक्टोबर होता!मंगळवारच्या पाहटपूर्व दुसऱ्या रात्री २-०० फोन आला!आम्हीं सुन्न झालो होतो!बधीर झालो होतो!स्वामी तुझी आत्या ओक्सबोक्सी रडत होती!आम्हीं रात्रीचं ३-००वाजता निघालो!४५०किलोमीटर अंतर पार करून तुझं दर्शन झालं!तू झोपलेला होतास!निरागसता तूझ्या चेहऱ्यावर दिसतं होती!तू चिर निद्रेत होतास!.. स्वामी तू जातांना सांगून गेलास का? "पप्पा मी येतोय!" म्हणून.... बाळा तूला देवाजवळ चांगली जागा मिळावी म्हणून प्रार्थना करतो आहें!
💐💐💐💐💐💐💐💐
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ऑक्टोबर २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol