चला जाऊया गड किल्ल्यांवर 🚩रायगड किल्ला 🚩भाग-०३)

चला जाऊया गड किल्ल्यांवर
      🚩 रायगड किल्ला🚩
              (भाग-०३)
   💐💐🚩🚩🚩💐💐
*************************
... नानाभाऊ माळी

दूध घालुनी गडाला
.....राहिले ना भान 
कंठाशी आला प्राण
माय हिंडली रानोरान!🚩

दिवस मावळतीला
महाद्वार मिटती डोळे
अंधार किल्ल्यावरतीं
बुरुजास भेटती गोळे!🚩

विशाल कातळाला 
सामोरे जाईल कोण
शूर हिरकणी माता
   उतरली बुरुजाहून!🚩

कातळ कडे घोरपड
आई झाली सैरभैर
छोटूला रें उपाशी 
होते न कुणाशी वैर!🚩

गौरव करिती राजे
नाव 'हिरकणी बुरुज'
असें अपूर्ण रायगड
भक्कम होणे गरज!🚩

     किल्ला पोलादासारखा टणक असतो!भक्कम असतो!राज्य सुरक्षित असतं!सुरक्षित किल्ला रयतेचा आधार असतो!स्वातंत्र्य अबाधित असतं!स्वातंत्र्यामुळे रयत सुरक्षित असतें!रयत राजाच्या हृदयात असतें!राज्याची अस्मिता राजा असतो!असा राजा शूर असतो!पराक्रमी असतो!किल्ला साक्षीदार असतो!अनेक घटनांचा मुख साक्षीदार असतो!किल्ला अनेक आयुद्धे अंगावर झेलूनही ताठपणे उभा असतो!कधी फुटतो, तुटतो, ढासळतो!तरीही राजाशी एकनिष्ठ असतो!असा किल्ला रायगडासारखा असतो!आम्हीं किल्ल्यांचा राजा 'रायगड' पाहायला गेलो होतो!महापराक्रमी राजाच्या किल्ल्यावर गेलो होतो!🚩

आम्हीं रायगड किल्ला खालून पाहिला!अजस्र,अतिविशाल, आकाशाला भिडणारा, हिमालयासारखी उंची असणारा!अन समुद्रसपाटीपासून जवळपास ८४०मिटर उंच असणारा,धीप्पाड कातळगड पाहायला गेलो होतो!किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग होते!एक....चित्तद्वार पायरी मार्गाने तर दुसरा....मार्ग होता रोपवेचा!रोपवेनें अवघ्या ०३ ते ०४ मिनिटात किल्ल्यावर पोहचता येतं!चित्तद्वार पायरी मार्गांवरून चढायला ०१-०० ते १-३० तास लागतो!पायऱ्या देखील अवघड नाहीत!सहज चढून जाऊ शकतो!एकूण १५०० ते १६०० पायऱ्या असतील!पुढे मीना दरवाजा अन महाद्वार लागतं!आम्हीं जेष्ठ नागरिक ग्रूप असल्याने,रोपवेनें वरती गेलो होतो!🚩

रोपवेचां प्रवासही चित्तथरारक होता!किल्ल्यावरील उंचउंच,अति उंच, जवळपास एक किलोमीटर उंचावरून खाली पाहातांना गरगरायला होतं!इतक्या उंचावर होतो!गडावरून खालचं दृश्य काही और होतं!जंगलात अदृश्य झालेली खोल दरी भयावह वाटत होती!तरीही याचं देही हे अविस्मरणीय दृश्य पाहात रहावसं वाटतं होतं!नजरेचं पारणं फेडून घेत होतो!रोपवेच्या एका ट्रॉलीत सहा जन बसतात!अशा एकाचवेळेस तीन ट्रॉलीतून १८व्यक्ती रायगडावर ये जा करीत होते!रोपवे सतत सुरूचं होता!गडावर पायरी मार्गावरून अन रोपवेनें माणसं ये जा करीत होते!सतत 'जय शिवाजी!जय भवांनीचा' जयघोष कानी पडत होता!ऐतिहासिक क्षण डोळ्यातून टिपून घेत हृदयात रीचवीत होतो!डोळ्यांनी वेचलेलें दृश्य मनात साठवीत होतो!श्री.छत्रपती शिवराय ३५० किल्ल्यांचे अधीपती होते!रायगडचीं निवड राज्याभिषेकांसाठी सर्वोत्तम किल्ला होता!राजांनी तसा हिरोजी इंदलकरच्यां देखरेखी खाली बांधून घेतला होता!संपूर्ण ३५० इमारतींचा रायगड त्यावेळेस कसा दिसतं असेल बरं? आपण संपूर्ण स्वर्गीय वैभव डोळ्यसमोर आणावं!अन शिवरायांचे रूप आठवत बसावं! एवढेच आपल्या हाती आहें!रायगड खरंच किल्ल्यांचा राजा होता!येथेच छत्रपतींचां राजमुकुट घालून राज्याभिषेक पार पडला होता!अनंत सोनेरी क्षणांचा साक्षीदार हाता रायगड!

रायगड पावसाळ्यात अन हिवाळ्यात पृथ्वीवरील स्वर्गीय सुखाने लद लदलेला वाटतो!निसर्गाने कितीतरी एकरात हे उंचावरील सुंदर बेट राखून ठेवलं आसवं!छत्रपतींनां देण्यासाठी राखून ठेवलं असावं!राजांच्या जगपारखी नजरेत हे ठिकाण भरलं आसवं!भक्कम ढाल तटबंदी, अतिशय भक्कम बांधकाम सुरु झालं आसवं!जोवर पृथ्वी आहें तोवर या स्वर्गीय वैभवाचं अस्तित्व राहिलं इतकं अवर्णनीय आहें किल्ला आहें!किल्ल्यावर एकूण ११ दरवाजे आहेत!सर्वचं आखीव रेखीव घडीव दगडांच्या कलाकूसरींनें बांधलेलं!आपण डोळ्यांनी पाहात राहावं!!साठवत राहावं!आपल्या जन्माचं सार्थक येथेच करून घ्यावं!किल्ल्यावर जवळपास ८ तलाव आहेत!त्यात गंगासागर तलाव अन हत्ती तलाव देखील खुपचं मोठा असावा!त्याकाळी हत्तीनां अंघोळ आणि पाणी पिण्यासाठी हत्ती तलाव तलाव बांधून घेतला असावा!🚩

किल्ला पाहातांना सर्वंचं आश्चर्यचकित वाटावं असचं होतं!इतक्या उंचींवर बांधकामं कशी झाली असतील?सर्वंचं अवघड वस्तू किल्ल्यावर कशा आणल्या असतील?असो...!आश्चर्य हृदयात रीचवीत आम्हीं किल्ल्यावर फिरत होतो!पुढे चालत चालत शिरकाई मातेचं अतिशय सुंदर,आखीव रेखीव कलाशिल्पातं बांधलेलं मंदिरं दिसलं!मातेचं मनोभावे दर्शन घेतलं!आशीर्वाद घेतलेतं!किल्ल्याच्या पठारी भागावर डोळ्यात मावत नव्हती एवढी मोठी शिवकालीन बाजारपेठ दिसली!बाजारपेठ खुपचं मोठी होतीएक छोटंसं खेडेगाव  बसेल एवढी मोठी बाजारपेठ होती!आपल्या खांद्यालां पोहचतील इतके उंच चौथरें होते!लोकं घोड्यावर बसून बाजाराला  करायला येतं असावीत!तेथे पायऱ्या देखील होत्या!जे पायी चालत येतं असतील ते पायऱ्या चढून बाजारहाट करतं असतील!पुढील भविष्याचा वेध घेऊन त्याकाळी एवढी मोठी बाजार पेठ बांधली असावी!ऐसपैस रस्ता!जवसळपास ३०० ते ४००मिटर लांबीची ही बाजारपेठ नजरेत भरत होती!🚩

आम्हीं  बाजारपेठ पाहून गतकाळाच्या स्वर्णिम इतिहासाच्या पानात एकचित्त झालो होतो!किल्ला फक्त राज्य करण्याचं ठिकाण नसतं!सुख सुविधानींयुक्त राज्यकारभार करण्याचं अप्रतिम स्थळ असतं!स्थळ मनात बसतं!जनात वसतं!ताकदीला, पोलादाला मुलायमता यावी!कित्येक वर्षे वय वाढवून घेण्याचं नैसर्गिक ठिकाण असतं!निसर्ग किल्याचा मित्र असतो!भरभरून देत असतो!किल्ला सुरक्षित राहण्यासाठी मानवाच्या बुद्धीला चालना देणारा साथी असतो!निसर्गाने हे मुक्तहसते दिलेलं होतं!निसर्ग दानप्राप्त रायगड किल्ला कोकणात ताठ मानेने उभा होता!गतकाळातील वैभव सांगण्यासाठी उभा होता!आमचे टिम लीडर आदरणीय बागूल सर देखील ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रेमात पडले 
होते!ढासळलेल्या अवशेषाची उजळणी करीत होते!हिरकणीचा बुरुज डोळ्यांनी पाहात शूर
विरांगनेला देखील याद करीत होते!ऑक्टोबर हिटचा चटका घेत पुन्हा रायगडासं जागवत होते!गत इतिहासाला डोळ्यांनी पाहात होते!किल्ला शौर्याच प्रतीक असतो!

(बंधू-भगिनींनो!पुन्हा भेटूया,पुढील ०४थ्या भागात रायगडावरून)
🚩👏🚩👏🪷🚩👏🚩
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१६ ऑक्टोबर २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol