ऋषींतुल्य व्यक्तिमत्व एम एन कोंढाळकर सर

ऋषींतुल्य व्यक्तिमत्व
एम.एन.कोंढाळकर सर
💐💐🌷🌷💐💐
********************
... नानाभाऊ माळी

जेथे गंगा नदी वाहते स्थानिकांना महत्व कळत नाही!जेथे जंगल संपत्ती जास्त असतें त्यांना त्याचं महत्व कळत नसतं!जेथे जे जास्त पिकतं त्याचं महत्व नसतं!तें जाऊद्या,आपल्या घरातील एखादी व्यक्ती मोठा डॉक्टर जरी झाला तरी त्यांच महत्व नाही!कारण तो समोर वाढलेला असतो!... प्रत्येक गोष्टीच, व्यक्तीचं महत्व बाहेरच्यांना कळत असतं!जेव्हा घरच्यांना हे कळत तेंव्हा आपण म्हणायला लागतो,'घरात सोनं असूनही पारख करता आली नाही हो!'... अशा थोर व्यक्तिमत्वाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरले आहें! योगायोगाने आम्हीं जेथे राहातो तेथील "शतायु जेष्ठ नागरिक संघांचे" ते अध्यक्ष आहेत!नाव आहे आदरणीय श्री एम.एन.कोंढाळकर सर!🌹

श्री.एम.एन कोंढाळकर सर!.. वय देखील अमृतमहोत्सवी वर्ष पार केलेले!संपूर्ण महाराष्ट्रभर सतत आपल्या ओघवत्या अमृत वाणीतून जीवंत प्रबोधन करीत,अनेक सामाजिक विषयांवर वास्तव समोर ठेवून मानव सेवेत व्यस्त असणाऱ्या ऋषींतुल्य व्यक्तिमत्वास नतमस्तक व्हावे एवढे विशाल कार्य त्यांच्या कृतिशील जीवन शैलीतून समोर ठेवलेलं आहें!अनेक सामाजिक संस्थात कार्य करणारे हे सरळमार्गी व्यक्तिमत्व!राज्य,राष्ट्रीयस्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत! कुठलेही भाव नाहीत!अगदी साधेपणा, कुठलाही बडेजावं नाही!अशी प्रतिमा जपणारं अन अंगी बाळगणारे अन सामाजिक परिवर्तन घडवीणारे मानवतेचें पुजारी म्हणजेच आदरणीय कोंढाळकर सर आहेत!माणसं जपणारं व्यक्तिमत्व सतत आपल्या कामात व्यस्त असतं!

अर्थ वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केल्यावर अनेक क्षेत्रात उमेवारी केली!अनेक कंपन्यात कामं केलीत!पण तेथे मन रमले नाही!स्वतःच्या गावात महमदवाडीमध्ये त्या काळी राजकारणात उतरले अन उपसरपंच पदी निवड झाली होती!पाच वर्षांतं अनेक अनुभव घेऊन राजकारण संन्यास घेतला होता!मुळात सामाजिक क्षेत्रात आवड होती म्हणून राजकारण आवडले नाही!पुढे समाजकारणात आले होते!
समाजकारणातून मानव कल्याणाचा ध्यास ठेवून जगणारे,मानव कल्याणासाठी त्याचं मार्गांवर चालत रहाणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहें!गेल्या ५०वर्षांचा दीर्घ अनुभव हाती आहें!

श्री एम.एन.कोंढाळकर सर वास्तव अनुभवातून समाजाची घडी बसविण्याचं महान कार्य करीत असतात!महाराष्ट्रभर पसरलेल्या अशा अनेक संस्थात कार्यरत कोंढाळकर सरांचं आकाशा एवढे कार्य समाजाला प्रकाशित करण्याचं, उजेड देण्याचं काम करीत आहेत!

 १९७१मध्ये हडपसर येथील समाज सेवक डॉ दादा गुजर यांच्या संपर्कात आल्यावर संपूर्ण जीवन सामाजिक कार्याला झोकून दिलं होत!नंतर १९७२चा दुष्काळ अंगावर झेलून अनेक सामाजिक संस्थांना मदत करतं राहिले!अमेरिकेवरून आलेला गहू आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे योग्य पद्धतीने वाटप करून गोरगरिबांना वाचविण्याचे महान कार्य त्यावेळेस केलें होते!श्री.एम.एन. कोंढाळकर सरांना आदराने "भाऊ" म्हणणारे सर्वचं त्यांच्या हृदयात जाऊन बसणारे असतात!🌷

"अफार्म संस्था" ही हजारो संस्था उभी करणारी मदर संस्था!संस्थांची संस्था!यांत प्रथमतः आदरणीय डॉ दादा गुजर यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव कोंढाळकर सरांना मिळाला होता!सन १९८५ दरम्यान डॉ दादा गुजर यांच्या सोबत विशाल अनुभव घेतला पुढे अध्यक्ष बदलले!डॉ मुकुंद घारे सर अफार्म संस्थेचें अध्यक्ष झाले होते!आदरणीय कोंढाळकर सरांनी अफार्म संस्थेसाठी जीवन अर्पण केल होत!कार्यरत होते! संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेलेतं!देश पातळीवर कामं होत राहिली!प्रत्येक कामात जातीने लक्ष देणारे "भाऊ"सर्वांच्या हृदयात जाऊन बसले!कोंढाळकर सरांनां सर्वजन आदराने भाऊ म्हणतात!असें हे भाऊ सर्वांचे मोठे भाऊ म्हणून कार्य करीत राहिले!🌷

शेतीविषयी,आरोग्याविषयी,सामाजिक बालसंगोपन, मानसिक आरोग्य अशा अनेक योजना राबवून समाजाचं आरोग्य सुदृढ करण्याचं महान कार्य अफार्मद्वारा होत राहिलं!
३०सप्टेंबर १९९३चा किल्लारी भूकंप सर्वांना ज्ञात आहें!भूकंपात त्यावेळेस दगावंल्यांच्या आकडेवारीतं वास्तव ताळमेळ बसत नव्हता इतकी माणसं त्यात दगावली होती!सरकारी अकड्यांप्रमाणे १३०००तें १४००० लोकांचा बळी घेणाऱ्या भूकंपानें मानवी जीवन उध्वस्त करून टाकले होते!२००००च्या वर जनावरं देखील दगावली होती!तेथील मातीची घरं संपूर्ण जमीनदोस्त झाली होती!माणसं गाडली गेली होती!इंग्लंडहून एका स्वयंसेवी संस्थेचा सकाळी सकाळीच "महाराष्ट्र आरोग्य मंडळाचें "प्रमुख दादासाहेब गुजर यांना फोन आला होता,"मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५२ गावात भूकंप झालेला आहें!अपरिमित हानी झालेली आहें!आपण तेथे जाऊन आढावा घ्या!आम्हीं ताबडतोब मदत पाठवीत आहोत!"🌷

आदरणीय एम.एन.कोंढाळकर भाऊंना सोबत घेऊन किल्लारीला जाऊन तेथील विदारक दृश्य पाहून त्यांना ताबडतोब कशा प्रकारची मदत करता येईल तें ठरवलं आणि तेथेच भूकंपग्रस्त भागात काही दिवस मुक्कामी राहून कार्यास सुरुवात केली!सरकारी अन अनेक स्वयंसेवी संस्था भूकंपग्रस्त भागात मदतकार्य करीतच होते!पण यांत एक महत्वाची बाजू लक्षात आली तीं म्हणजे प्रत्येकाच्या घरातील ५,१०माणसं भूकंपात दगावली होती!काही कुटुंबात तर एखादा दुसरा व्यक्ती जीवंत होता!बाकी दगावले होते!घरातील व्यक्ती दगावल्याने जीवंत असलेल्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडलं होतं!त्यांना मनसोपचाराची गरज होती!🌷

आदरणीय एम.एन.कोंढाळकर सरांनी आपली संस्था आणि प्रसिद्ध नट,मानसोपचार तज्ञ् डॉ.मोहन आगाशे सरांचीं संस्था अशा दोघांनी हे अतिशय अवघड कार्य हाती घेतलं होतं!रुग्णांवर उपचार करून त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी खूप मोठे कार्य हाती घेतले होते!त्यावेळेस स्थानिकांच्या अनेक समस्या होत्या!भूकंपामुळे
जनजीवन उध्वस्त झालं होतं!बारा बलुतेदारांचा व्यवसाय बंद पडला होता!कामं नव्हती!अशा समस्या लक्षात घेऊन अनेकांना व्यावसायिक वस्तूंचे वाटप केलें,शेतीची अवजारे वाटप केली,बी बियांनांचे वाटप केंले!जनावरं दगावल्याने दूध मिळतं नव्हतं!शेतीसाठी राबणारी बैल नव्हती!अशा शेतकरीची शेती संस्थेच्या ट्रॅक्टरनें नांगरून,मशागत करून देणे अशी कामे सुरु ठेवली होती!अशा अनेक समस्यांचें निराकरण सुरूचं होतं!भूकंपा नंतर देखील जवळपास १२ तें १३वर्ष आपल्या संस्थेमार्फत काम सुरूचं ठेवलं होतं!🌷

दुःख काय असतं!जन्म मरण काय असतं!कुटुंबातील व्यक्ती दगावल्यावर मानसिक संतुलन कसं बिघडत!भूकंपाने हे विदारक हाती दिलं होतं!हळूहळू त्यावर मात करून उभे राहण्याची उमेद निर्माण करणारे काही व्यक्तिमत्व असतात!स्वतःसं समाजासाठी अर्पण केलेले व्यक्तिमत्व असतात, "कोंढाळकर सर" हे अनुभूतीला वास्तव आकार देणारे कर्मयोगी आहेत!त्यागी व्यक्तिमत्व आहेत!जीवन जगण्याची रीत शिकविणारे जीवन शिक्षक आहेत!कुठलाही मोह नाही!हे कार्य ईश्वरानें दिलेली जबाबदारी आहें जणू असं समजून चालू होतं!

किल्लारी भूकंपाचा कार्यानुभव पाहता,गुजरात भुजच्या भूकंपावेळी  कोंढाळकर भाऊंना तेथे आग्रहाने बोलविले होते!आपल्या अनुभसंपन्न कार्यातून तेथेही बरेच दिवस थांबून भूकंप ग्रस्तानां जगण्याचीं उमेद देत राहिले!असें त्यागी माणसं समाजाचा ज्ञान डोळा होऊन कार्य करीत असतात!सन २००७ रोजी संस्थेतून निवृत्त झाले असले तरी कामाचा आवाका मोठाचं आहें!🌷

भाऊंनी "मराठवाडा लोक विकास मंचावर महान कार्य केलं होतं!पुढे त्याचं रूपांतर "महाराष्ट्र लोक विकास मंच" असं राष्ट्रीय पातळीवर कामं वाढवलं होतं!दिनांक ३० सप्टेंबर २०२३रोजी संस्थेत भाऊंची निवड राष्ट्रीय पातळीवरील काम करणाऱ्या या संस्थेत "उपाध्यक्षपदी" झालेली आहें!आम्हीं खरोखर भाग्यवान आहोत की ज्यांचं विशाल कार्य समजसमोर आहें!अनेक संस्था आपल्या कृतीतून उभ्या केल्या अशा महाराष्ट्र लोकसेवा विकास मंचच्यां राष्ट्रीय उपाध्यक्षपदी भाऊंची निवड झालेली आहें!भाऊंचा विशाल अनुभवाचा हा गौरव आहें!या वयात देखील सर्वाना लाजवतील असं काम करण्याची धम्मक त्यांच्यात आहें!
नेमक्या ३० सप्टेंबर १९९३साली किल्लारी भूकंपाची आठवण ताजी झाली!अन भाऊंची निवड देखील ३०सप्टेंबर२०२३ला झाली!गेल्या ५०वर्षातील गुणात्मक सामाजिक कार्याचा विशाल अनुभव पाहता भाऊंची झालेली निवड ही आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहें!
अशा ऋषींतुल्य व्यक्तिमत्वासं हार्दिक शुभेच्छा!अभिनंदन!नमन!
(श्री एम एन कोंढाळकर सरांचा मो.नं.९८२२०६८६५६)
💐💐💐🌷🌷💐💐💐
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१३ऑक्टोबर २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)