खान्देश माळी मंडळाची ओळख!💐
खान्देश माळी मंडळाची ओळख!
💐💐💐💐💐💐💐💐
*************************
... नानाभाऊ माळी
जन्म काय असतो बरं?सृष्टी निर्मिती प्रक्रियेतील प्रारंभ म्हणजेच "जन्म" म्हणावं? दृष्टीस पडणारे निर्मिती उत्तर म्हणजेच जन्म म्हणावा?खरंय!प्रत्येकाचीं ओळख जन्मातून निर्माण होत असतें!व्यक्ती जन्माने नाव चिकटवून नावारूपाला येत असतो!त्या नावाची ओळख काही विशिष्ठ छाप सोडून जात असतें!
एखाद्या संस्थेच्या जन्माचही असचं असतं!अनेक कष्टाळू, मेहनती व्यक्ती एकत्र येऊन संस्था स्थापन करतात!नावारूपाला आणतात!तिची विशिष्ठ ओळख निर्माण करतात!त्या ओळखीतून संस्थेचा "ब्रँड"तयार होतो!ओळख निर्माण होते!अशीच एक संस्था महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्र,गुजरात अन मध्यप्रदेशात देखील विशिष्ठ ओळख घेऊन उभी आहें!नाव आहे "खान्देश माळी मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड-पुणेपरिसर!"
खान्देशातून अर्थात धुळे,जळगाव, नंदुरबार,नाशिक या जिल्ह्यातून नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात राहायला असणाऱ्या माळी समाजबांधवांनी सन १९९९साली एकमेकांच्या अडिअडचणी सोडविण्यासाठी "खान्देश माळी मंडळ"या नोंदणीकृत संस्थेची स्थापना पुण्यात भोसरी येथे केली!केली होती!उद्धेश...फक्त एकच...एकमेकांना अडी अडचनींना मदत करणे, संतश्रेष्ठ सावता माळी महाराज,क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, संतांच्या आणि महामानवांच्या जयंत्या, पूण्यतिथी साजरा करणे या महामानवांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालत राहून वाटचाल करीत रहाणे!आपल्या पाल्ल्यांचा गुणगौरव करणे, राज्यव्यापी वधु-वर मेळावा आयोजित करणे आदि उपक्रम राबववून महाराष्ट्रात विशिष्ट ओळख निर्माण केली होती!
सध्या मंडळाचं कार्यक्षेत्र पुणे जिल्हा असून,अतिशय त्यागी व्यक्तींनी मंडळ स्थापन केलं!उभं केलं!नावारूपाला आणलं!नवीन पिढीला कार्यक्षेत्रात संधी दिली!वाव दिला!आता खान्देश माळी मंडळानें २५व्या वर्षात पदार्पण केलेलं आहें!या वर्षी त्यानिमित्ताने स्मरणीका प्रकाशन आणि विध्यार्थी गुणगौरव समारंभ देखील आयोजित केला आहें!
आज रोजी जवळपास १९०० सभासद संख्या असणारं हे मंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करीत आहें!ही खरी उपलब्धी आहें!ही खरी प्राप्ती आहें!माणसं वयोमानाने जेष्ठ होतात!अनुभवांनी जेष्ठ होतात!ज्यांनी हे मंडळ स्थापन केलं त्यांचं भरीव योगदान, त्यांचं कार्य, त्यांचां त्याग अजूनही स्मरतो आहें!निःस्वार्थ सेवा करणारे खिशातून पैसे खर्च करून मंडळ लौकिकासाठी समाजिक राजकीय व्यक्तींजवळ, उद्योजकांजवळ खान्देश माळी मंडळाचं नाव आहें!अखंड कार्य सर्वांना गौरवास्पद आहें उत्तम समन्वय साधून मंडळाचं नाव राज्यव्यापीचं नव्हे तर इतर राज्यात पोहचल आहें!याचं कारण प्रत्येक कार्यकर्ता समर्पित भावनेने कार्य करून मंडळाच्या कार्यास हातभार लावीत आहें!म्हणूनच मंडळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या हृदयापर्यंत पोहचल आहें!
चांगल्या बोलण्यातून संवाद साधला जात असतो!संवादातून समन्वय साधून सामाजिक कार्य चालू असतांना २५व्या वर्षात पदार्पनाचा आनंद काही वेगळाचं आहें!येत्या काही दिवसात मंडळाचं रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करीत आहोत!त्यासाठी राज्यातील अनेक नामांकित व्यक्तिमत्वाना आमंत्रण देणं सुरु आहें!कोणी दुखावतो, कोणी दुखवतो पण कार्य हे थांबणारं नसतं!सर्वं सहन करून चांगलं तें पुढे नेत राजकीय, सामाजिक आणि अनेक दानशूर व्यक्तिमत्वाच्यां आशिर्वादामुळे नवलौकीक मिळविलेल्या या मंडळासाठी नेहमीच झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी,त्यागी व्यक्तींसाठी,आजी माजी पदाधिकाऱ्यांसाठी,कार्यकारणी सदस्यांसाठी,घाम गाळणाऱ्या सर्वं पदाधिकार्यांसाठी हात जोडले जातात!त्यांचं ऋण कधी फेडलं जाणार नाही एवढा त्याग त्यांनी केलेला आहें!अशा त्यागी कार्यकर्त्यांसाठी,मंडळाचं नाव उज्वल करणाऱ्या समाजातील सर्वं बांधवांसाठी दोन्ही हात जोडून वंदन करतो!आणि मंडळाच्या वतीने ऋण ही व्यक्त करतो!
💐💐💐💐💐💐💐
***********************
(खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरच्या वतीने ऋणानुबंधातून आभार!
... नानाभाऊ माळी,पुणे
मो. नं -९९२३०७६५००
दिनांक-०३ऑक्टोबर २०२३
Comments
Post a Comment