मॅरेथॅन देवदर्शन भाग -०३(श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई )
मॅरेथॉन देवदर्शन
भाग-०३
(श्री.करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई)
💐💐👏👏💐💐
******************
... नानाभाऊ माळी
माता विश्वरूप असतें!माता जगदमाता असतें!माता हृदयातून श्रीमंत असतें!माता त्याग जननी असतें!माता चंदन स्वरूप पवित्र असतें!माता अंबाबाई असतें!माता महालक्ष्मी असतें!श्री.करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी जगन्माता आहें!अंबाबाई माता कृपाभिलाषी स्वरूप आहें!माता वाईटांचा,दुष्टांचा नाश करण्यासाठीचं या भूमीवर अवतीर्ण झालेली आहें!🚩
कोल्हापूरची अंबाबाई माता भक्तवत्सल आहें!कृपासिंधू आहें!मंदिरात आलेल्या साऱ्या भक्तांचं कल्याण करणारी आहें!आम्हीं दिनांक ०४ तें ०५ सप्टेंबर २०२३,या दोन दिवसात पाच तीर्थक्षेत्री धावपळीत,घाईगर्दीत दर्शनाला गेलो होतो!आम्हास मॅरेथॉन देव दर्शन जीवन साध्याकडे घेऊन गेलं!मनाला समाधान देऊन गेलं!भक्तीआनंदात डुंबता आलं!धावपळ झाली खरी,नेत्रात देव घेऊन फिरता आलं!पालच्या खंडोबाचं, दक्खनचा राजा ज्योतिबाचं,श्री.करवीर निवासिनी, स्वामींनी महालक्ष्मी मातेचं, अदमापूरचें 'श्री.बाळू मामांचं' अन रत्नागिरी जिल्ह्यातल्या मारळ येथील श्री.मार्लेश्वर महादेवाचं दर्शन घेता आलं!मन भक्तीने तुडुंब भरले होते!प्रसन्नतेने भरलं होतं!तीर्थक्षेत्रास हृदयी बसवता आलं!देवदर्शन दृष्टी देणारे होत!🚩
श्री.जोतिबाचं दर्शन झालं होतं!
दक्खनच्या राजाचं घेतलं होतं!आसं लागली होती करवीर स्वामींनी महालक्ष्मी देवीच्या दर्शनाची!आपल्या आराध्याच्या दर्शनासाठी भक्त व्याकुळ होतं असतात!आम्हीं देखील व्याकुळ झालो होतो
चित्त हरपले होते!जगन्मातेस डोळयांतून,मंनचक्षुतून हृदयी घेण्या उतावीळ झालो होतो!आशिर्वादाकृपाभिलाषीच्यां चरणी माथा टेकण्याची हुरहूर लागली होती!
आम्हीं मंदिर परिसरात प्रवेश केला!अंबामातेच्या ध्वजाचं दर्शन घेतलं!भक्तजन रांगेतून मंदिर गाभाऱ्याकडे निघालें होतें!मंदिरातील भिंती आखीव,रेखीव काळ्याशार पाषणाच्या होत्या!त्यावरील कोरीव नक्षीकाम पावित्रतेच्या जवळी नेत होतं!हस्तस्पर्शाने पावन झाल्याचा भास होतं होता!साक्षात श्रीहरी बालाजी अन महालक्ष्मी देवी मंनचक्षुतं अरूढ झाल्याचा स्वर्गाणंद जाणवू लागला होता!वैकुंठ सुखाचा स्वर्णिम क्षण अनुभवत होतो!🚩
काळ्या कातळातील अतिभव्य मंदिराच्या बाह्य बाजूतून श्री. तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं!श्री.गणेशाचं दर्शन घेतलं!मंदिर प्रवेशा नंतर गुहेसारख्या गर्भगृहात डाव्या बाजूने आतल्या पायऱ्या वर चढून गेल्यावर महादेवाची पिंड होती! समोर नंदी बसले होते!काळ्याशार गुहेसमान पाषाणी गर्भगृहात एकचित्त होऊन महादेवाची पूजा केली!दर वर्षी फक्त श्रावण सोमवारी उघडणारे हे महादेव गर्भगृह उघडे असतं!०४ सप्टेंबरला देखील श्रावण सोमवारी होता!भक्तीभावाने दर्शन घेतलं अन अरुंद,चिंचोळ्या पायऱ्या खाली उतरून महालक्ष्मी मातेच्या मूर्तीजवळ जाऊन देवीच्या चरणी भक्तीभावाने माथा टेकवला!जगदंजननी आणि भक्त एकरूप झाले होते!भावविभोर होऊन मातेचं भव्य,करुणामयी,ममतामयी, कनवाळू रूपाचं दर्शन घेतलं!श्री.करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं!माता महालक्ष्मी देवीतं माझी "आई" दिसतं होती!मी लहान बाळ झालो होतो!मनोमनी तिच्या कुशीत जाऊन बसल्याचा वैकुंठी आनंद,जीवन मरणाच्या मोक्षमयी रेषा पुसल्या गेल्याची जाणीव झाली होती!🚩
जीवन तृप्तीचा स्वर्णिम क्षण हृदयी बांधून मंदिराबाहेर पडलो!मला माझी जन्म देती "आई" भेटली होती!तिन्ही जगताच्या जन्मदात्रीस माझ्या प्राण श्वासानी स्वतःस अर्पित केलं!माझी श्रद्धा,मोक्षाच्या वाटेवरील माझा बोट धरून चालणारी श्री.करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी होती!🚩
💐👏💐👏💐👏💐👏
**************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०८सप्टेंबर २०२३
Comments
Post a Comment