मेरॅथॅन देवदर्शन भाग -०२(ज्योतिबा दर्शन)
मेरॅथॅन देवदर्शन
भाग -०२
(ज्योतिबा दर्शन)
💐💐👏💐💐
****************
... नानाभाऊ माळी
......डोळे दर्शन घेत असतात!दर्शनातून श्रद्धा हृदयात गुपचूप येऊन बसत असतें!डोळे दुर्बीन बनून,वाईट गाळून चांगलं ते आत पाठवत असतात !डोळ्याचा कॅमेरा सकारात्मकतेचा फोटो काढून अंतरात्म्याला पाठवीत असतो!ते फोटो जीवन मार्गाचें मार्गदर्शक असतात!डोळे चैतन्य स्वरूप असतात!त्यासाठी खरे तर डोळे विश्वासू पाहिजेत!मन सच्चे असावे!आपली बुद्धी दिलदार पाहिजे मग आपल्या सभोवती सदाचाराचा सुगंध दरवळत राहतो!💐
अशा सतशीलतेचां कॅमेरा घेऊन आम्हीं देवदर्शनाला गेलो होतो!दिनांक ०४सप्टेंबर ते ०५सप्टेंबर २०२३ असें दोन दिवस "शतायु जेष्ठ नागरिक संघ"आयोजित देवदर्शनाला गेलो होतो!आधी पालच्या खंडोबाचं दर्शन घेतलं होतं!नंतर कोल्हापूरच्या अलीकडे पुणे-कोल्हापूर जाऊन
हायवेच्या उजव्या बाजूला २२ किलोमीटर दूर असलेल्या गडावर गेलो होतो!कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग अर्थात ज्योतिबाच्या गडावर दर्शनाला गेलो होतो!महादेवस्वरूप ज्योतिबास माथा टेकण्या गेलो होतो!💐
महादेवाच्या अनंत स्वरूपापैकी एक स्वरूपासं लीन होण्यासाठी आम्ही गेलो होतो!भारतातील प्रत्येक राज्यात,प्रत्येक जिल्ह्यात महादेवाची अतिप्राचीन मंदिरं आहेत!भरत भूमीचें आद्य शिवस्वरूप,अनंत असें महादेव आहेत!आम्हीं श्रद्धा स्वरुपाच्या दर्शनाला गेलो होतो!श्रावणातील हिरवाईच्या चादरी पांघरलेल्या अनेक टेकड्यांमधून, वेड्यावाकड्या रस्त्यावर आमची बस पळत होती!नागमोडी वळनांवर सापसिडीचां खेळ सुरु होता!टेकड्यांवर छोटी-मोठी पिवळी, गुलाबी,जांभळी फुलं हवेच्या झूळकीवर नाचतं होती!हात हलवून आमच्या सुखकर प्रवासाला शुभेच्छा देत होती!हिरवाईचा अखंड देखावा डोळे पिऊन घेतं होती!दमदमाने आमची बस ज्योतिबाच्या मंदिराकडे पळत होती!💐
त्या टेकडया सह्याद्री पर्वत रांगाच्या छोटया मोठया माळा आहेत!श्रावण फुललेला दिसतं होता!गवत,वेली अन झाडांनी पर्वताचं संपूर्ण अंग झाकलं होतं!हसरी नखरेल फुलं आमच्या बसला वेडावीत होती!आम्ही हिरावाईचां अजब नजारा डोळ्यातून टिपत,पर्वताच्या उंच शिखरावर जाऊन पोहचलो होतो!आम्हीं ज्योतिबाच्या डोंगरावर जाऊन पोहचलो होतो!💐
पर्वताच्या भुईसपाट पठारावर पोहचल्यावर अतिशय उंच अन प्राचीन बांधकाम असलेली कमान दिसली!कमानीतून प्रवेश करीत खाली अनेक पायऱ्या खाली उतरून ज्योतिर्लिंग महादेवाच्या मंदिरा जवळ पोहचलो होतो!घडीव,आखीव, रेखीव,कोरीव काळ्या पाषणातील ज्योतिबाचं मंदिर हजारो वर्ष प्राचीन असावं!आपण डोळ्यांनी पाहात राहावं!कलाशिल्प डोळ्यात साठवत राहावे!प्राचीन मंदिराच अवलोकन करीत राहावसं वाटत होतं!ज्योती स्वरूप अनादी अनंत महादेवाचं दर्शन घेतं होतो!ज्योतिबाच दर्शन घेतं होतो!काळ्या पाषाणातील कोरीव मंदिर कसं बांधलं असावं बरं?विस्मयी आश्चर्य डोळ्यांनी पाहात होतो!सुंदर!अविनाशी!सर्पधारी!नीलकंठ स्वरूप!व्याघ्रधारी!चंद्रधारी!गंगाधारी!भस्मधारी!त्री नेत्रधारी!स्मशानवासी!नंदीवर आरूढ!त्रिशूलधारी!ओंकार स्वरूप!डमरूधारी!शंकर!भोलेनाथ!महादेवाचं अविनाशी तेजोमय ज्योतिबाच दर्शन घेतं होतो!💐
"ज्योतिबाच्या नावानं चांग भलं!".. म्हणतं येणारे भक्तजन गुलाबी जांभळा गुलाल उधळत होती!याचं देही याचं डोळा भक्तीसागरात डुंबतांना सारे भक्तजन शिवतत्वात एकरूप झाली होती!आम्हीं देखील रांगेने दर्शन घेतं, "ज्योतिबाच्या नावानं चांग भलंचां" चां जयघोष करीत होतो!चिरंतनस्वरूप ज्योतिबाचं दर्शन घेतलं!प्राचीन कला शिल्पातील अनाकलनीय देवत्वाच्या चरणी लीन झालो होतो!आम्हीं
दक्खनच्या राजाचं दर्शन घेतलं होतं!
💐💐👏👏💐💐
****************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०७ सप्टेंबर २०२३
Comments
Post a Comment