मेरॅथॅन देव दर्शन(पालचा खंडोबा)
मेरॅथॅन देवदर्शन
(पालचां खंडोबा)
💐💐👏💐💐
****************
... नानाभाऊ माळी
देवळाच्या ओसरीत आम्हीं बसलो
होतो!त्याच्या सानिध्यातील मन प्रसन्न करणारं वातावरण एकचित्त करीत होतं!डोळे देवळाच्या मूर्तीत पापण्या लवून श्रद्धा अर्पित करीत होते!मूर्तीतील राऊंळी बसलेला जगनिर्माता जणू आमच्या हृदयी अवतरला होता!चंदन सुहासिक देवळाची ओसरी आमच्या मनातील भावभक्तीतं एकजीव झाली होती!भक्त आणि मूर्ती जणू वेगळी नव्हतीचं!अनेक पुष्प सुमनांचा सुहासिक सुगंध देव ओसरीला अंतरीची श्रद्धा अर्पित करीत होते!पावित्र्याचं भावबंधन जुळतं होते!पुष्पमालांच्या देव समर्पित त्यागवृत्तीला डोळे भरून पाहात होतो!ओसरीतला देव दृष्टी देत होता!प्रसंग असाचं होता!आम्हीं मेराथॅन देवदर्शनाला जाऊन ओसरीत देवाला येण्यास भाग पाडले होते!होय आम्हीं देवाचे आवडते,लाडके भक्त होतो नां!
हृदयात बसलेल्या ज्योतीस श्रद्धातेल मिळतं राहिलं तर ती ज्योती सतत भक्तीउजेड देत राहते!आम्हीं भक्ती उजेडाचे भुकेले होतो!भक्तीउजेड घेऊन श्रद्धामंदिरी समर्पित होण्यासाठी गेलो होतो!आम्हीं देवदारींच्या शांत,शितल,निरामय ओसरीचां देवभाव एकचित्त होऊन पाहात होतो!मन प्रसन्नतेच्या द्वारी गेलो होतो!अमुचा देह डोळ्यांनी देवपन हृदयी रीचवीत होता!देव आमुचा झाला होता!आम्हीं देवाचे अज्ञाकारी पण लाडके भक्त होतो!आम्हीं देवद्वारी गेलो होतो!आम्हीं मेराथॅन देवदर्शनाला गेलो होतो!
माणूस देव शोधित निघाला आहें!माणूस दूरदूर जाऊन मनःशांतीसाठी देव शोधित निघाला आहें!देवळातील सुंदर मूर्तीत आराध्य शोधित आपली श्रद्धा अर्पित करीत आहें!आम्हीं देखील पुण्यातल्या हडपसर येथून देव दर्शनाला गेलो होतो!देव श्रद्धेचां भुकेला असतो असं म्हणतात!आम्हीं याचक अंतरीची श्रद्धा घेऊन देव दर्शनाला गेलो होतो!०४ सप्टेंबर २०२३रोजी सकाळी आम्हीं हडपसरहून आमच्या भावरूपाला शोधण्या निघालो होतो!आमच्या श्रद्धाभावाला भेटण्या व्याकुळ झालो होतो!आमची बस पुण्याहून सातारा रोडला लागली होती!कित्येक किलोमीटर अंतर पार केल्यावर सर्वं प्रथम कराडच्या अलीकडे २०ते २२किलोमीटरवर आमची बस कोल्हापूर रस्त्याच्या उजव्या बाजूने वळली!पुणे कोल्हापूर हायवे पासून ०५किलोमीटर अंतरावर पाल गावाचा खंडोबाला आम्हीं पोहचलो!💐
देव ज्ञानाचा सखा असतो!देव आशीर्वादाचां प्रारंभ असतो!पाल गावाच्या खंडोबाचं दर्शन हृदयाला मोहित करणारे होतं!आम्हीं
भावभक्तीत तल्लीन झालो होतो!पिवळा भंडारा उधळून खंडोचां "येळकोट येळकोट जय मल्हार" करून देवाला शरण गेलो होतो!देव दृष्टीदाता असतो असं म्हणतात!चांगलं आणि मानव कल्याण वृत्ती प्रदान करणाऱ्या देव दर्शनाला आम्हीं गेलो होतो!अतिशय प्राचीन,पुरातन, कोरीव दगडाचं बांधकाम असलेलं हे मंदिर!प्राचीन कलाकृतीचा उत्तम नमुना आहें!उंच शिखराला पोहचणारे कळस आणि दिवट्या देवरूपाचं दर्शन करून देत होते!उत्तम कलाशिल्पातं बांधलेलं खंडोबाच मंदिर आणि त्यातील मूर्ती जीवन दर्शन देऊन गेलं होतं!भाव विभोर होतं देव रूपास श्रद्धेनें अंतरी ओढून घेतं होतो!💐
पालचां खंडोबा भक्तांना दर्शन देत जीवन जगण्याची, सतमार्ग अवलंबविण्याची दृष्टी देत होता!खंडोबाच्या मूर्तिकडे कित्येक वेळ पाहात होतो!डोळ्यातून मनोभावे अंतरी उतरवीत राहिलो!सगुण -निर्गुण रूपाचं विशाल दर्शन होतं राहिलं!खंडोबाची कृपादृष्टी होतं राहिली!मन तृप्त होतं राहिलं!तृप्तीचा आनंद डोळ्यात भिजत राहिला!आनंदाचा डोह गालावरी ओघळतं राहिला!पालचां खंडोबास अंतरी ठेवून आम्हीं पुढील दर्शनाला निघालो होतो!
(पुढील देवदर्शन क्रम:शा पुढील लेखात)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२४०७६५००
दिनांक-०६सप्टेंबर २०२३
Comments
Post a Comment