चला जाऊया गड किल्ल्यांवर (वसंतगड)
चला जाऊया गडकिल्ल्यांवर
(वसंतगड )
💐💐💐👏💐💐💐
************************
... नानाभाऊ माळी
......जेथे समशेर उपसली जाते!जेथे तलवारी वार करतात!जेथे बिचवे, वाघ नखें शत्रूचा कोथळा बाहेर काढतात!सतत तोफगोळ्यांचा मारा होतं राहतो!जेथे छाती ढाली झाल्या होत्या!ढालींनी वार सहन केले होता!जेथे राजनिष्ठा पणाला लागली होती!जेथे मर्द लढले होते!जेथे रक्ताच्या नद्या वाहतं होत्या!जेथे छत्रपतीं शिवरायांच्या शब्दांसाठी शूर-वीर लढले होते!मावळे लढले होते!सोशिक प्रजा लढली होती अन शिवशाहीचा राज्याभिषेक झाला होता!प्राचीन भारतीय संस्कृतीचीं पुन्हा मुहूर्तमेड रोवली होती!हिंदवी स्वराज्य स्थापन झाले होते!अशा सर्वं ऐतिहासिक घडामोडींचें साक्षीदार असलेले किल्ले जीवंत होतात!आमच्या रक्तात उसळू लागतात!इतिहाचीं पाने उलगडू लागतात!राजनिष्ठा,देशभक्ती हृदयात उतरू लागते!अशा सह्याद्रीच्या रांगेतील उंच उंच पर्वतावरील एका किल्ल्यावर गेलो होतो!नाव आहें "वसंतगड"!💐
शूर विरांचा आत्मा लढला
या भयान कातळावरती
लढाई लढूनी वीर जिंकले
आमुच्या मराठी मातीवरती
स्मृती अजुनी बोलक्या त्या
या पडक्या किल्ल्यांवरती
.... लढले होते वीर मराठे
येथील उभ्या कातळावरती
मर्दानीं घाम रक्त सांडले
साऱ्या कातळ किल्ल्यांवरती
लढले तेव्हा शूर सरसेनापती
'हंबीरराव' याचं जागेवरती
सह्याद्रीचीं अभ्यद्य छाती
हर हर महादेव गर्जती
तोफा बरसल्या शत्रूवरती
मराठे लढूनी राज करती
सह्याद्रीचीं छाती शुरांची आहें!उंच उंच किल्ल्यांची आहें!घनदाट जंगलांची आहें!विशाल उदारतेची आहें!दानवृतीची आहें!ऋषीं-मुनींची आहें!पाच हजार वर्षांची प्राचीन संस्कृती आहें!💐
......प्राचीन संस्कृतीचा नाश करण्यासाठी आक्रमक येत राहीलेत!लुटत राहिलेत!नासधूस करीत राहिलेतं!प्राचीन किल्ले नासधूस करीत राहिलेत!किल्ले ढसाळत राहिलेत!अति प्राचीन भारतीय शिल्पकलेला नष्ट करायचा प्रयत्न झाला!आज तेच किल्ले ढासळलेल्या स्थितीत आहेत!काळ्या पाषाणातील अखंड मंदिरे,शिल्पकला तोडायचा प्रयत्न झाला!नासधूस अन विद्रुप करण्याचा असफल प्रयत्न मोडून पडला!आम्हीं असेच ताट मानेने उभे राहून आमची श्रद्धास्थाने पूजत राहिलो!बांधलेले किल्ले आणि मंदिरं नासधूस करून परकीय संस्कृती बळजबरी लादण्याचा प्रयत्न होत राहिला!राज्य करीत राहिले!पण मन मात्र कधीच जिंकू शकले नाहीतं!🌹
भिन्न संस्कृतीचं अवजड ओझं भारतीय सभ्यतेने कधीच स्वीकारलं नाही!म्हणून त्याचं ताकदीने, उभारीने,जोमाने भारतीय संस्कृती उभी राहात होती!टिकून होती अन आहें!याचं प्राचीन संस्कृतीचं संरक्षण करणारी ठिकाणं म्हणजेचं गडकिल्ले आहेत!आम्हीं 'चला जाऊया गडकिल्ल्यांवर' या मोहिमेअंतर्गत रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३रोजी सातारा जिल्ह्यातल्या कऱ्हाड तालुक्यातील कोल्हापूर हायवेपासून जवळचं 'तळबीड' गावात असलेला 'वसंतगड' किल्ला पाहायला गेलो होतो!
तळबीड गाव छोटस!टूमदार!माजी सैनिकांचं!शूर-विराचं!आणि छत्रपती शिवाजीराजे यांचे शुर वीर सरसेनापती 'हंबीरराव बाजी मोहिते' यांचं गाव!छत्रपतीं शिवरायांचीं सासुरवाड देखील आहें!...गावात सरसेनापतीं हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी आहें!इतिहासातील क्षणाकडे वळता येत!डोकावून पाहता येतं!येथे मोहिते घराण्याची साधारण १७ वी पिढी आहें!आम्हीं समाधीचं दर्शन घेतलं आणि पराक्रमाचा इतिहास जणू आमच्या डोळ्यसमोरून तरळून गेला!इतिहास आमच्या शरीरात सळसळत राहिला!
पाठीमागील बाजूस 'तळबीड' ग्रामपंचायत,त्यासमोरचं श्रीराम मंदिरं आहें!आम्हीं श्रीराम,सीतामाता, श्रीलक्ष्मण यांचं दर्शन घेतलं!श्री विठ्ठल रुख्मिणीचं दर्शन घेतलं!शेजारीचं संगमरवरीतं तीनमुखी गुरुदत्ताचीं सुंदरी,सुरेख मूर्तीचंही मनोभावे दर्शन घेतलं!मंदिरं आवारातील श्री.गणपती मंदिरं,श्री.साईमंदिरात भक्तीभावाने दर्शन घेतलं!नंतर आमच्या दोन्ही बसेस वसंतगडाच्या पायथ्याकडे निघाल्या!पायथ्याशी ncc कॅडेट आणि महाराणी ताराराणी विद्यालय आहें!आमचे गुरुवर्य कॅप्टन वसंतराव बागुल यांच्या आदेशानुसार आम्हीं गड चढायला सुरुवात केली!पहिल्या पाच पायऱ्यावर गेलो!तेथून काही अंतरा पर्यंत दगडी पायऱ्या दिसल्या!आम्हीं ८५ जन होतो!किल्ल्याच्या....पायथ्यापासून काही अंतरापर्यंत दगडी पायऱ्या होत्या अन पुढे कच्चा खडकाळ अरुंद, वेडीवाकडी पायवाट होती!💐
पाऊस नव्हता!गणपती उत्सवाचीं धामधूम सुरु होती!ढगाळ अन दमट वातावरण होतं!किल्ला चढायला सुरुवात केली!मोहीम सुरु झाली!किल्ला उंच होता!उभट होता!चढ अंगावर घेत अवघड पायवाटेने चढणं सुरु होतं!आजूबाजूला झाडं झूडपं होती!चढतं असतांना अंगाला घाम येत होता!दमछाक होतं होती!जिद्द जिथे असतें तिथेचं मोहीम फत्ते होते!अंगावर येणारा चढ होता!वेडीवाकडी वळणे होती!हाताला आधार म्हणून मोठ मोठे खडक होते!दगड होते!उभट कडे होते!कातळ पायऱ्या होत्या!झाडाच्या फांदया होत्या!घाम गाळत किल्ला चढत होतो!💐
वसंतगड किल्ला आमचा दम पाहात होता!सहनशक्ती पाहात होता!श्वास पाहात होता!आमचा घाम पाहात होता!आम्हीं अंगावर येणारां भीतीदायक उभट कडा पाहात होतो!आम्हीं जर गड चढतांना एवढा घाम गाळत होतो!त्याकाळी शूर मावळे किल्ला कसे चढत असतील!एका हातात तलवार,दुसऱ्या हातात शिदोरी अन घोड्याची लगाम देखील असायची!अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शत्रूशी लढाई लढत असतील!काटक असलेला मर्द मराठ्यांचा मावळा सह्याद्रीच्या कडे कपारितून लीलया चढून लढत असतील!आता आम्हाला स्वतःचं वजन देखील पेलवत नव्हतं!चढतांनाचं दम लागत होता!तरीही 'जिद कें सामने आसमान झुकता हैं!जीत होती हैं!'.. आम्हाला अनुभूती होतं होती!💐
वेडीवाकडी अवघड,अरुंद,उभट वळणे पार करीत उंचावर असलेल्या वसंतगड किल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहचलो!प्रवेशद्वाराजवळचं डाव्या बाजूला गणपती मंदिरात श्री.गणेशाचे दर्शन घेतलं मुख्य प्रवेशद्वार भूल भु्लैय्यासारखचं होत!समोर भिंत दिसत होती!उजव्या बाजूला पुन्हा दुसरं प्रवेशद्वार दिसलं! दगडी पडक्या भिंती उभ्या दिसल्या!चार तें पाच वाड्यांचे अवशेष दिसतं होत्या!१००० तें १२०० वर्षांपूर्वी यादवकालीन बांधलेले किल्ले अजून तरी शाबूत आहेत!इतिहासातील घडामोडीचें साक्षीदार आहेत!वसंतगडाच्या सफाट भूभागावर झाड झूडपांनीं वाढलेलं जंगल दिसतं होते!जवळपास १६तें १७एकरात असणारा वसंतगड किल्ला पडक्या भिंतीचा आधार घेतं उभा होता!साक्षीला उभा होता!किल्ल्यावर अनेक तटबंदी,बुरुज पडक्या अवस्थेत उभे दिसलें!मोठया पायऱ्या होत्या!वर गेल्यावर एक विहीर दिसली!छोटासा तलाव दिसला,आत एक मारुतीचं मंदिरं होतं!एक छोटंसं वसंतगड हॉटेल दिसलं!पुढे गेल्यावर महादेव मंदिरं होतं!दर्शन करून पुढे विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात गेलो!शेजारीचं दुसरें महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं!
पुढे अरुंद प्रवेशद्वार दिसलं!त्यातून प्रवेश करीत पुढे गेलो!तेथे मोठया दोन दीपमाळा दिसल्या!मोठा दगडी चौथरा दिसला!खाली शेजारी विरगळ दिसलें!शेजारीच दोन नंदी उभे दिसलें!अन मुख्य मंदिरात वाकून प्रवेश करून आतील चंद्रसेन महाराजांचीं मूर्ती दिसली!दर्शन घेतलं!चंद्रसेन महाराज रावणाचें भाचें होतं!सुपर्णखाचा मुलगा आहें!मंदिरं प्राचीन असून चंद्रसेन महाराजांसं प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होता!असं म्हणतात की १६०० मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला होता!
किल्ल्यावर कृष्णा तलाव दिसतो!तेथेच पाच समाधी दिसल्या!पश्चिम दिशेला हनुमानाची दगडात कोरलेली मूर्ती दिसली!पठारावरचं वरती चुण्याचा घाना दिसला!पुढे गेल्यावर टेकडी पलीकडे एक चोर वाट अर्थात गुहा होती!त्याच्या पलीकडे मोठा बुरुज दिसला!वसंतगड किल्ला प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना आहें असं जाणवलं!💐
किल्ला हस्तगत करण्यासाठी प्राचीन काळापासून अनेक लढाया लढल्या गेल्या असतील!दुरुस्ती करतं पुन्हा वसंतगड उभा राहिला असेल! आक्रमक पुन्हा आले असतील!उभी तटबंदी,बुरुज परकीय आक्रमण सहन करीत राहिली असेल!किल्ला जागेवरचं राहिला असेल!राजे येत जात राहिले!पिढ्या येतं जात राहिल्या!एक एक अवशेष इतिहास रूपात साक्ष म्हणून दिसतो आहें!💐
इ स १६५९साली,वसंतपंचमीच्या दिवशी, छत्रपती शिवाजी महाराजांनी वसंतगड किल्ला जिंकला होता!म्हणूनचं या किल्ल्याच नाव वसंतगड ठेवले होते!पुढे औरंगजेबाकडे गेला!पुन्हा मराठ्यांकडे आला!नंतर इंग्रज आलेतं!त्यांनी हा किल्ला उध्वस्त करून टाकला होता!किल्ला अजूनही उंचावर उभा आहें!पडक्या अवस्थेत पण ताठ मानेने उभा आहें!सह्याद्रीच्या अनेक उंच पर्वतांच्यां रांगा वसंतगडाशी सुसंवाद साधित साधून उभे आहेतं!माणसं येतं राहतील!आम्हीं येत राहू!जात राहू!येणाऱ्या पिढ्या येतील!पुढे मातीत विलीन होऊन जातील!'वसंतगड' असाच ताठ मानेने उभाचं राहिलं!....गडावरून खाली उतरतांना मन व्याकुळ झाले होते!कदाचित कधीही भेट होणार नाही असें वाटून गेले!जड अंतकरणाने एक एक पावलं उचलत,अरुंद पायवटेने खाली उतरत राहिलो!वसंतगडाच्या पायथ्याशी येऊन गडाला नतमस्तक झालो!जड अंतःकरणाने परतीच्या प्रवासाला लागलो!💐
💐💐💐💐👏💐💐💐💐
****************************
.... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२७ सप्टेंबर २०२३
Comments
Post a Comment