मावळतीच्या गडद रेषा भाग -०२(उमेदीच्या रथावर)

मावळतीच्या गडद रेषा
💐💐💐💐💐💐
        भाग -०२
(उमेदीच्या रथावर)
***************
... नानाभाऊ माळी
सूर्य उगवतो!सकाळ होते!सूर्य वर वर येत राहतो!आधी उघड्या डोळ्यांनी दिसणारा!नंतर वास्तवातील त्याच्या विशाल,भव्य दिव्य तेजपुंजाने, दर्शनानें डोळे दिपतात!अनंत किरणांनी तेजाळलेला सूर्यदेव सृष्टीचं नियमन करीत जीवनांणंद पुरवीत राहतो!जीवसृष्टीला आपल्या तेजाने उजळून टाकणारा सूर्य,सृष्टीचा उजेड होतो!ऊर्जा होतो!निर्मिती अन लयाचा साक्षीदार होतो!💐

सूर्य रथाचें घोडे वेगाने धावत असतात!उंच उंच चढावर धावत असतांत!चढावर दमछाक होते!तरीही तारुण्याचा जोश चढत्या मार्गांवर आत्मबल पुरवीत राहातात!घोड्यांची लगाम पकडून सूर्य रथावर बसलेले असतात!सूर्य सृष्टी निर्मितीचा किमयागार असतो!खेळातील प्रधानसेवक असतो!गोचर-अगोचर सर्वं दृष्यमान होतं राहात!जिवसृष्टीला जिवंतपणा देवून,गतिमान ठेवण्याचं महान कार्य करीत असतो!स्वतःचं सूत्रसंचालन करीत असल्याने 'जीव जीवस्य जीवनम'चं नेतृत्व होतो!उगवल्या पासून कार्यास सुरुवात करतो!स्वतः तापून इतरांना तापवत असतो!

सूर्य चिरतरुण आहेचं!अखंड सृष्टीलाही कामाला जुपुंन सृष्टीचेहरा  बदलत असतो!विविध रंग भरीत असतो!अंगी विसीतील जोशपूर्ण तारुण्य कार्य करीत असतं!पूर्वेकडून क्षणाक्षणांनी आकाशाच्या सीडीवर चढत असतो!तेजाने दिपवून टाकतं असतो!निसर्गसृष्टीला बलशाली बनवितं असतो!स्वतःची ऊर्जा प्रदान करीत असतो!उमेदीच्या रथावर बसून महान कार्य करणारा सूर्य लढणे अन जोश शिकवीत असतो!

मानवी जीवनाचं देखील असंच असतं नाही का?आईच्या कुशीतील बाळ शाळेत जायला निघतं!कुशीतून शाळेत रमतं!पुढे वडलांच्या पावलांवर पाऊल ठेवतं!कळीतून फुल उमलू लागतं!रसरशीत तारुण्य शरीरातून वाहू लागतं!ओसंडून वाहू लागतं!मन उड्या मारू लागतं!स्वप्नांची पुरचुंडी घेऊन पळत सुटावसं वाटतं!मन उधाण वारा होतं!उनाड होतं!काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात जन्माला येऊ लागते!बलदंड शरीरात बुद्धीचं घोडं उभं राहातं!मनात वादळांची निर्मिती होऊ लागते!मन अस्थर्या कडून स्थर्या हेलकावे घेऊ लागतं!तारुण्याची अन बुद्धीत कोंबलेल्या सदगुणांची झोबांझोबिं सुरु होते!सूर्य चढत्या वाटेने माथ्याकडे सरकू लागतो!घर, आई -वडील,शेती,नोकरी,लग्न या काळजाच्या गोष्टींनी मन हेलकावे खाऊ लागतं!रस्ता खाच खळग्याचा असतो!मन चंचल असतं!मनात स्वप्नांची उमेद असतें!मनाचं घोडं दामटत पुढे पळत असतो!या वयात जोश आणि शक्तीचा मिलाफ होतो!तारुण्य तरुणांना घेऊन पळत असतं!

चढत्या सूर्यासारखा मानवी जीवनाचा आलेख चढता असतो!आलेख उंचावू लागतो!वाटचालीतून पुढील प्रवास वेगाने सुरु होतो!भाव भावनांचा खेळ सुरु होतो!जबाबदारीचं ओझं अंगा खांद्यावर येवून पडतं!धडपड सुरु होते!स्वप्न साकारासाठी प्रयत्नांची पराकष्टा सुरु होते!कुठे कमविता होतं नाही तोवर लग्नाची माळ गळ्यात पडते!सूर्य वेळेप्रमाणे प्रवास करीत राहतो!चटके द्यायंला लागतो!अंगा खांद्याना भाजायला लागतो!तळपायानां चटके बसायला लागतात!तरुण तारुण्यांच्या ताकदीवर,संसाराच्या ओढीने पळत असतो!सकाळचा सूर्य शांत हवाहवासा वाटतो!सकाळी दहा वाजेपासून सूर्याची तीव्रता जाणवू लागतो!💐

तरुण संसाराच्या ओढीने स्वतःसं विसरतो!'कर्तव्य' नावाच्या गोंडस शब्दाचा दास होतो!कर्तव्यपरायणता अंगी बाळगून सूर्यासारखा तापू लागतो!झिजू लागतो!इतरांसाठी झिजू लागतो!मन मारून झिजू लागतो!संसाराच्या ओढीने झिजू लागतो!समाजाच्या भीतीने कर्तव्याला जागू लागतो!स्वतःच्या अस्तित्वासाठी जगू लागतो!गोतावळ्यांच्या परिघात आपले वेगळेपण घेऊन जगू लागतो!

हळूहळू सूर्य माथ्यावर येऊ लागतो!चटक्यांची तीव्रता वाढलेली असतें!सुखाच्या शोधात असणारा माणूस!छोटसं सुख शोधता शोधता दुःखाच्या डोंगरावर चढू लागतो!हव्यास, तिरस्कार,मोह,ईर्षा यांना सोबती घेऊन स्वतःस फसवू लागतो!जीवनाची दुपार होते!कमविलेलं आहें!आत्मसूख नाही!दुपारचा सूर्य चटका बसतो आहें!धन आणि
दोलायमान मनाच्या कैचीत दुपार असतें!संसार कैचीत सापडलेला वीर अभिमन्यू आहें!कधी कळतो!कधी कळत नाही!उमगला तर वळत नाही!सर्वं आभासी आहें!माणूस मोठया गोलावर आहें!कळला तर गोल नाहीतर गोलाच्या आत आहें!उमेदीच्या रथावर सूर्य निघाला आहें!
💐💐💐🙏💐💐💐
**********************
.. नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२३ सप्टेंबर २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)