मातीने लळा लावीला होता!
मातीने लळा लावीला होता
💐💐💐💐💐💐💐
*********************
... नानाभाऊ माळी
ज्या मातीवर श्वास घेतला
.....तो श्वास पहिला होता
श्वास दिला आईने मज
....तिनें जन्म वाहिला होता!🌹
पाऊले चालली दुडूदुडू
लाल मातीचा गोळा होता
चिकट राहिली तळपायाला
सोनं शेतीचा तोळा होता!
मी कितीदा लोळूनी घेई
मातीनें लळा लवीला होता
आई घरात ओढूनी घेई
मी गळा काढीला होता!🌹
अंगा घाम प्यायले आई
त्यावर जोंधळा उभा होता
कधी अश्रू भिजून जाई
लाडका वेंधळा उभा होता!
शेतं खळ्यात जन्म गेला
रात्रीचा चंद्र पहिला होता
भाजल्या शेंगा भुईमूगाच्या
खेळ अपुरा राहिला होता!🌹
👏👏👏👏👏👏👏
*********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१९ सप्टेंबर २०२३
(गणेश चतुर्थी)
Comments
Post a Comment