मन माझे शांतीच्या ठायी

मन माझे शांतीच्या ठायी
💐👏💐👏💐👏
  ******************
... नानाभाऊ माळी

         एकांत ठिकाणी जाऊन मनाला शांती मिळतं असतें का बरं?मनात असा विचार आला आणि त्याक्षणी निघालो देखील!संध्याकाळचीं वेळ असावी!दिनांक १३सप्टेंबर २०२३चां श्रावण समाप्तीकडे वाटचाल करणारा दिवस होता!पुणे जिल्ह्यातील सासवडगावी,कऱ्हा नदीच्या घाटावर जाऊन बसलो!खडकाच्यां अंगा खांद्यावरून झूळझूळ वाहणारं कऱ्हेचं पाणी पाहात बसलो होतो!एकचित्त होत त्या पाण्याकडे पाहात होतो!वाहणाऱ्या पाण्याचा मंजुळ खळखळ आवाज कानी पडतं होता!डोळे एकटक पाण्याच्या वाहत्या धारेकडे लागले होते!छोटेमोठे उंचवटे पार करीत कऱ्हा नदीचं पाणी वहात होतं!आपल्याच नादात वहात होतं!होती का त्यासं जगाची चिंता? 💐

मी घाटावरून उठलो!वाहत्या धारेजवळ,एका खडकावर जाऊन बसलो!पाय पाण्यात सोडले!वाहते पाणी आपल्याच नादात होतं!ऐतिहासिक कऱ्हा नदीच्या पात्रातील  गुळगुळीत निसरड्या खडकावरील पाणी पायांनां वाहत्या धारेकडे ढकलत होते!संध्याकाळ झाली होती!सूर्य अस्ताकडे निघाला होता!मी अशा ठिकाणी बसलो होतो जेथून संत सोपानदेवकाकांचं मंदिरही नजरेस पडत होतं!झूळझूळ वाहणाऱ्या पाण्याच्या मंजुळ स्वरात काही पक्षांच्या किलबिलाटाची साथ संगत ऐकायला येऊ लागली होती!पक्षांची घरट्याकडे जाण्याची लगबग सुरु होती!मावळत्या संध्याकाळी घरट्याकडे जाण्याची लगबग असावी!मी समोर पाहिले!मंदिरा समोरील चिंचेंच्या झाडावर छोटे-मोठे अनेक पक्षी चिवचिवाट करीत उडत उडत फांदयावर येऊन बसत होती!

मावळत्या सूर्यासोबत निसर्गाचा विलोभनीय खेळ सुरु होता!लोभस, विलोभनीय होता!तो खेळ वेळ संभाळून सुरु होता!मी हा खेळ एकटक पाहात होतो!ध्यानमग्न होऊन पाहात होतो!मी नदीतल्या खडकावरून उठलो!नदीतल्या पाण्यात पाय चुबुक-डुबुक करीत पायऱ्या चढून त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन उभा राहिलो!मनोहारी क्षणचं तें!मी थांबलो!पक्ष्याच्यां किलबिलाटानीं वर्तमानातील सुंदर क्षण हृदयी घेत होतो!मी सोपानदेव समाधी मंदिरासमोर उभा होतो!सूर्य पश्चिमेकडे अस्ताला जात राहिला! पक्षांचा कानी पडणारा आवाज, चिवचिवाट हळूहळू मंदावत गेला!शांत होत राहिला!चिंचेच्या झाडावरील फांदयावर पक्षी कुटुंब  झोपी गेलं होतं!💐👏

मी भानावर आलो!पश्चिमेकडे अंधाराची काळपट सावली गडद होतांना दिसतं होती!तसा सोपानदेवांच्या समाधी मंदिराच्या पायऱ्या चढू लागलो!मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून प्रवेशद्वारी उभा राहिलो!काही क्षण दोन्ही हात जोडून एकचित्त उभा होतो!डोळे मिटून उभा होतो!पहिल्या पायरीवर माथा टेकवला!ज्या दगडी पायरीवर माथा टेकवला होता तेथून जणू विशिष्ट संवेदना माझ्या डोक्यात जात असल्याचा अनुभव घेत होतो!अंतरीची श्रद्धा असेल तर हृदयातील देहात देव उतरतो!पायरीवर काही वेळ त्याचं ध्यानावस्थेत हात जोडून बसून राहिलो!डोळे बंद करून एक चित्त बसून होतो!डोळे उघडले तेंव्हा समोर नागेश्वर मंदिरातील पिंड नजरेस पडतं होती!मी भक्तीभाव ओढीने महादेवाच्या पिंडीवर डोकं ठेवलं!काही क्षण शांत,एकचित्त बसून होतो!निरव शांतता होती!चित्त पिंडीवर स्थिर झालं होतं!मी मनःशांतीच्या द्वारी पोहचलो होतो!

श्री.नागेश्वर महादेव,संतश्रेष्ठ सोपान देवांचे आराध्य दैवतं!हृदयात शांतीचा अनुभव देत होते!ममतेचीं अनुभूती येत होती!तेथे बाह्य घोंगाट नव्हता!नजरे समोर महादेव नागेश्वरांची पिंड होती!निरव शांततेचीं अनुभूती घेत,ईश्वर भक्तीत तल्लीन झाल्याचा सुखद अनुभव जणू आयुष्यभरात मिळाली नसेल इतकी मनःशांती मिळाली होती!शांत,प्रसन्न,सुखद अनुभव सर्वांनंदाकडे नेणारा होता!

नागेश्वर महादेवाच्या दर्शनानंतर संत श्रेष्ठ "सोपानदेव" समाधीपाशी जाऊन पोहचलो!आत गाभाऱ्यात गेलो!भक्तीभावाने समाधीवर डोकं ठेवलं!परकेपणा पूर्णतः नाहीसा झाला होता!मी जगद्गुरूंच्या समाधीवर माथा टेकवला होता!भान हरपले होते!जीवन धन्य झालाचा सोहळा होता जणू!मी परीघावरील शुल्लक जीव भक्ती केंद्राकडे ओढला जात होतो!सोपान देवांच्या समाधीवर चित्तशांत झालं होतं!मनीचं वादळ शांत झालं होतं!समाधीवर ठेवलेल्या डोक्यातनं सुखद क्षण अनुभवत होतो!माझ्यातील 'मीपण' गळून गेल्याचा क्षण अनुभवत होतो!माझ्यातला स्वार्थ स्वभाव गळून गेला होता!मी समाधीस्थळी मोक्षानंद अनुभवत होतो!येण्या जाण्याचीं फेरी थांबावी असं वाटतं होतं!💐

त्याचं मन मोहित अवस्थेत डोळ्यातल्या आनंदाश्रूनां वाट करून दिली होती!अश्रुंचा ओघळ गालांवरून घरंगळत मन शांत झाले होते!भक्तीच्या ठायी माझे चित्त हरपले होते!मन शांतीच्या ठायी हरपले होते!सर्वं काही माझे माझे, मी पणाचा स्वार्थी भाव गळून गेला होता!भक्तीभावाच्या ज्योतिजवळी नतमस्तक होत उठलो!सोपानदेव काकांच्या गाभाऱ्यातून बाहेर आलो!मंदिर प्रदक्षिणा करतें वेळी डाव्या बाजूला गुरुदेव दत्तांच्या मंदिरी दर्शन घेतलं!उजव्या बाजूला संत मुक्ताईच्या मंदिरी हात जोडले!प्रदक्षिणा पूर्ण होतांना चिंचेच्या झाडाजवळी आलो!सोपानदेवांच्या समाधी प्रवेश स्थळी एकचित्त होऊन हात जोडले!चिंचेच्या खोडाला नतमस्तक झालो!माझी एक प्रदक्षिणा पूर्ण झाली होती!देव हृदयात घेऊन काही वेळ समाधी मंदिरात बसून होतो!💐

ज्या चारही बहीण भावडांनी सर्वस्व त्यागुण ईश्वरी अवतार कार्य पूर्ण केलें...तें संत निवृत्तीनाथ,संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर,संत सोपानदेव अन संत मुक्ताई यांनी लोक कल्यानासाठी, परोपकारासाठी आपलं जीवन अर्पण करून वेगवेगळ्या ठिकाणी आपल जीवन अर्पित केलें, त्यातील सोपान देव समाधीस्थळ "सासवड" तीर्थस्थळी येऊन मनःशांतीच्या दिव्य ज्योतीचा अनुभव घेत होतो!💐

अंधारची चाहूल लागली तसा, सोपानदेव समाधी अन नागेश्वर मंदिरातून बाहेर आलो!पायऱ्या खाली उतरत शेवटच्या पायरीवर पून्हा डोकं ठेवलं!मन,चित्त स्तिरावले होते!प्रसन्नतेचा पवित्र प्रसाद हृदयी घेऊन निघालो होतो!मन देवाला अर्पण करून देह माघारी निघाला होता!झूळझूळ वाहणारी कऱ्हा नदी,शांत झोपी गेलेले पक्षी,संत सोपानदेव यांच्या समाधी मंदिरापासून लांब निघालो होतो!माझी पाऊले,माझा देह घेऊन माघारी हडपसरला निघाली होती!मन शांतीच्या ठायी लागले होते!💐👏
💐👏💐👏💐👏💐👏
**************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ सप्टेंबर २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)