शाळेतलं कवी संमेलन
******************
शाळेतलं कवी संमेलन
******************
🌷🌹🌷🙏🌷🌹🌷
... नानाभाऊ माळी
शाळा ज्ञान मंदिर असतें!गुरुजन ज्ञान दाते असतात!ज्ञान संस्कारांनी विद्यार्थी घडत असतात!घडता घडता वाढत असतात!वाढतांना कला गुणांचाही स्वीकार करीत वाटचाल करीत असतात!शाळेत क्रमिक अभ्यासक्रम असतो!घरी गेल्यावर घरासमोरचं रात्रीचा चांदोमामा हसत बोलवीत असतो!चांदोमामा दुर दूर आकाशी असतो!मग मनात अनेक विचार येतात!मामाजवळ जाण्यासाठी सिडी लावावी का? हा विचार येणे म्हणजेचं बालपणी कवी जन्म घेत असल्याचां सुखद अनुभव असतो!डोक्यातले विचार
शब्दबद्ध करून समोर मांडणे म्हणजे चं कविता असतें!💐
"विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्य ही!"...हा सुविचार लहानपणापासून मनावर बिंबवीला गेला!शतकानुशतके सतत धन अन विद्येची तुलना होतं राहिली!खरे हे आहें की ज्ञानाशिवाय धन अपूर्ण आहें!विद्या ही संस्कारी आई असतें!आईचे संस्कार उत्तम असतील तर कमविलेले धन योग्य ठिकाणी कारणी लागतं असतं!विद्या पापनी आतील डोळा असतो!पापनी उघडते तसं ज्ञान अवलोकन सुरु होतं!विद्या आत्मसात केल्यावर ज्ञानिंद्रीय उघडतात!आपण नेहमीच म्हणतं असतो,"विद्या धनंम सर्वं धनंम प्रधानम!"..खरंच आहें,विद्येशिवाय माणूस अपूर्ण आहें!विद्या प्रदान करणारे गुरु महान असतात!गुरु-शिष्याचे आदर्श नातं निर्माण करणारे पवित्र ठिकाण शाळा असतें!विद्यालय असतें!अशा आदर्श विद्यालयात ज्ञानादात्री शाळेत!विद्यार्थी आणि गुरुजनांसमोर हिंदी दिनानिमित्त काव्य संमेलन झालं!
'क'अक्षरापासून कमळ शब्द तयार होतो!'क'अक्षरापासून 'कविता' देखील होते!गुरुजन विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजित असतात!विद्यार्थ्यांच्या मनात कलागुण रुजावे, त्यांनां वेगळ्या क्षेत्रात वाव मिळावा!त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेतं म्हणून अनेक शाळा कविसंमेलन आयोजित करीत असततांत!महादेवनगर,मांजरी,ता.हवेली,जि.पुणे येथील 'एस एम जोशी विद्यालयाच्या' मुख्याध्यापिका आदरणीय सौ.अडसूळ+ताईंनी विध्यार्थ्यांमधील कला गुणांचां विकासासाठी दिनांक १४ सप्टेंबर रोजी जेष्ठ कवींना आमंत्रित करून कविसंमेलन आयोजित केलं होतं!
शालेय अभ्यासक्रमाव्यतिरीक्त बौद्धिक,मानसिक विकास घडावा!विध्यार्थी देशाचे भावी नागरिक असतात!ज्ञानामृत पिवून आदर्श नागरिक घडणारे विध्यार्थी शाळेत शिकतांना अवांतर ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या,देशाच्या, समाजाच्या जडणघडणीसाठी वापरावेत म्हणून कविसंमेनांचे आयोजन केलें होते!
इयत्ता ८वी तें १०च्या विध्यार्थ्यांना बऱ्यापैकी समज आलेली असतें!शाळेतल्या क्रमिक मराठी पुस्तकातील कविता पाठ झालेल्या असतात!कविता आत्मसात करून अर्थ शोधू पाहतात!अर्थ उलगडू लागतात!कविता आवडू लागते!मनाला भावते!कविसंमेलनाचा उद्धेश हाच असतो!कवितेने रसिकाच्या हृदयातं जागा घेतली की कविता सार्वजनिक होते!कविता व्यक्तीला डोळस करते!प्रबोधन करते!घटित घटनांचं प्रतिबिंब कविता असतें!💐
कवी चंद्रकांत जोगदंड,हास्य कवी सूर्यकांत नामगुडे सर, कवी किशोरजी टिळेकर,कवी वाघमारे, कवी भोसले,कवी उदयभान पाटील आणि मी स्वतः नानाभाऊ माळी.. कवितेतून विध्यार्थ्यांनां हसवत, खेळवत,अनेक विषयांना स्पर्श करीत काव्य संमेलन रंगतदार केलें!विध्यार्थ्यांना सहज कळेल असें विषय घेऊन मानसशास्त्रीयं दृष्टी देणाऱ्या रचनानी विध्यार्थ्यांच्या टाळ्या घेत राहिल्या!💐
आताचे विध्यार्थी भावी पिढीतील कलाकार,कवी,शिल्पकार,लेखक किंवा विचारवंत घडणारे असतात! हलक्या,फुलक्या आशय असलेल्या कवितांनी शाळेतील काव्यसंमेलन म्हणजे भावी पिढीतीत नागरिकांच्या हाती दृष्टीज्योत दिल्याचं समाधान लाभलं!एस.एम.जोशी विद्यालयातील सर्वं शिक्षकवृंदांनी या बहारदार काव्यसंमेलनाला उत्तम प्रतिसाद आणि दाद दिली!💐
शाळेतले विध्यार्थी विचार करून लिहू लागले की तालबद्ध शब्द ओळ होते!अशा अनेक ओळीतून कविता उमलू लागते!हसऱ्या-दुखऱ्या,जन जागृतीच्या कवितांनी सूर्या पलीकडे जावसं वाटतं!तेथे अनुभूतीचा जन्म होतो!कवी कल्पनांची सिडी लावतो!सूर्याजवळ जातो!हनुमान होऊन माघारी येतो!अशा सुंदर कविता विध्यार्थी ऐकत राहिले!टाळ्यांचा कडकडाट होतं राहिला!कवितेच्या विमानावर बसून हवेत तरंगत राहिले!वेळेची घड्याळ विसरून एस. एम.जोशी विद्यालय कवितांच्या झूल्यावरती झोका घेत राहिले!कवी मुलांसोबत वय विसरून लहान होतं राहिले!मुलं मंत्रमुग्ध होतं राहिले!धन्य तें विध्यार्थी,गुरुजन अन रसिकजन देखील!💐
🌷🌹💐🌹🌷💐💐
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
दिनांक-९९२३०७६५००
दिनांक-१५सप्टेंबर २०२३
Comments
Post a Comment