कविता उमलतांना
***************
कविता उमलतांना
🌹🌷🌹🌷🌹
****************
... नानाभाऊ माळी
......बालपणी 'क' कमळाचा!'क'कपाचा अशी अक्षर अन शब्द ओळख होत जाते!अक्षराच्या ओळखीने 'कमळ' शब्द वाचू लागतो!"शरद कमळ बघ" वाचू लागतो!वाचन करणे म्हणजे 'निरक्षर' नसल्याचा पुरावा हाती येतं असतो!पुढे पुस्तकं वाचून ज्ञान भांडार आत्मसात करण्याची संधी मिळतं जाते!'विद्ये विनयेन शोभते' हे वाचन संस्कृतीचं रोपटं लावलं जातं असतं!शब्दांच्या संगतीने 'क' कमळाचां कडून 'क' कवितेकडे व्यक्ती कधी ओढला जातो हे कळत देखील नाही!व्यक्तींची संवेदना जागृत होते!तेथे कविकल्पना जन्म घेते!वेडीवाकडी,वळणा वळाणावरची कविता हृदयाच्या खोल तळाशी विचार शोधू लागतें!कवी कवितेत एकरूप होतो!💐
शब्द श्रीमंती घेऊन हिंडणारी माणसं या जगात कफल्लक कशी म्हणता येतील बरं ? पोटाला एक वेळेस खायला नसलं तरी चालतं!पण बुद्धीच्या अन मनाच्या भुकेसाठी उठणारे वादळ शमविने अवघड असतं!समुद्राच्या अकराळ विक्राळ लाटा काठावर धडकत असतात!मनाच्या अथांग सागरात अशीच वादळे उठतं असतात!कवी मनाची तगमग होत असतें!मनात दबलेले विचार उफाळून वर येतात!अशीच गत झालेंली असतें!मनात दबलेले विचार शब्दरूप घेतं,समाज मन ढवळून काढु लागतांत!कविता अनंत विचारांचा लोंढा असतें!लोंढा वाहतो तेंव्हा सामाजिक,राजकीय, आर्थिक ऐतिहासिक सर्वचं अंगानां धडकते!तिची धडक हत्ती सारखी असतें!गेंड्यासारखी असतें!पाण्याच्या लोंढ्यासारखी असतें!कधी सुनामीसारखी असतें!तर कधी प्रेमळ होते!कधी जीव लावते!तर कधी दुःखावर फुंकर घालते!कविता आपलं खरं रूप दाखवून विजेसारखी आली तशी निघूनही जाते!💐
कवी प्रतिभेचा पुजारी असतो!आपल्या जिवलग अपत्याला घेऊन हिंडत असतो!पोटाशी घालून हिंडत असतो!वादळाला सामोरे जात असतो!कधी प्रवाह विरुद्ध दंड थोपटून उभा असतो!कविता हत्यार होते,शब्द धारेतून अन्यायाला चिरडत असतें!कवीच्या हृदयातली संवेदना सत्यस्वरूप मांडत असतें!कवी भोगलेलं,त्यागलेलं,सहलेलं आपल्या अपत्याला सांगत असतो!अपत्य सुखाची व्याप्ती वाढवत जातो !कविता रसिक मनावर प्रभाव टाकून निघूनही जाते!💐
.....मनातल्या जीवंत संवेदना
समाज रूपाचं दर्शन घडवीत कविता शिखरावर आरूढ होते!अशा कवितेशी एकरूप होण्यासाठी 'संत गाडगे महाराज विचारमंच' ओतूर, पुणे आणि 'ज्ञानज्योत फाउंडेशन' पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० सप्टेंबर २०२३रोजी आयोजित काव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मला बोलविले होते!मी कवितांच्या भिन्न रूपांतं एकरूप झालो होतो!कविता मृगजळ नसून दृष्टीदाता आहें असं कळलं!💐
कविता पूजा असतें!मोठ्या कष्टातून तिचा जन्म होत असतो!कवी एक एक ओळ उलगडत जातो!ओळ अर्थ घेतं जाते!कविता अनमोल होते!अशा अनेक कवितांचीं शब्द पेहरणी ऐकत होतो!अशा अनेक कविता रसिक जनांच्या हृदयात जागा करून गेल्या!मन हेलावूनी गेल्या!आयोजकांचं आयोजन उत्तम होतं!जेष्ठ कवयित्री कविता ताई काळे,कवियत्री कांचन ताई मून, कवी रणजित पवार, कवी गणेश पुंडे, कवयित्री शुभांगीताई शिंदे,आणि ज्यांचां मोलाचा हातभार लागला अशा सर्वं आयोजकांचं कौतुक केलें पाहिजे!पुस्तक प्रकाशन आणि काव्यसंमेल आयोजित करणे हे मोठं दिव्य असतं!दिव्य पार करतो त्याचा उजेड मोठा होतो!हृदयाचा उजेड घेऊन हिंडणारी अन शब्दावर प्रेम करणारी माणसं शब्द घोड्यावर स्वार होतात!💐
कवितेतून जीवन मांडणारी माणसं आपल्या जवळपासचं असतात!तें लहान होऊन इतरांना फोफावू देतांत!मोठी करतात!कविता ताई अन कांचन ताई आपण खरोखर शब्द पूजारी आहात!आपण दिव्याची वात पेटवून इतरांच्या हाती देत आहात!अंधारातील उजेड होऊन स्वतः जळणारी माणसं हृदयात येऊन बसलेली असतात!💐
कविता मधमाशी होते!अनंत फुलातून रस चाखून मध गोळा होतं!विचार गोळा होतात!शब्द फोडणी देत कविता स्वादिष्ट होते!अशा अनेक कविंनी आपल्या उत्तमो उत्तम रचना सादर करून प्रबोधन आणि रंजनाचं महान कार्य केलं आहें!कविता दुधारी तलवार असतें!कधी बंड करून उठते तर कधी बंड मोडून टाकत असतें!कविता कधी कोमल होते!हळुवार होते!कानवाळू होते!ममतामयी आई, बहीण अन पत्नी होते!कविता हृदयाची अभिव्यक्ती असतें!💐
संमेलनाध्यक्ष म्हणून कवितेच्या सेवेकरीस संधी दिलीतं!भाग्य माझ्या पदरी टाकलंत!लहान माणूस मोठा झाला!आकाश मोकळे झाले!पर्वतं विचारू लागलीतं, "अरे तू आमच्या उंचीला आलास?"..मी नतमस्तक होतं गेलो!माझी मान वाकत गेली!डोकं व्यासपीठावर ठेवून आयोजकांच्या ऋणातील झोळीत हळूच गेलो!स्वतःसं अर्पित करून धन्य झालो!💐
कारण... कारण मी डोळ्यांनी मोती सांडणारा हळुवार,हळवा मनाचां एक लहानसा उगवता कवी नानाभाऊ माळी आहें!शब्द माझी साधना आहें!माझी श्रद्धा आहें!माझी उपासना आहें!उपासनेला व्यासपीठावर जागा मिळाली,बस्स जगणं मोक्षपाशी आलं!
💐🌷🌹💐🌷🌹💐🌷🌹
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१२सप्टेंबर २०२३
Comments
Post a Comment