मन्हा एसटीनां परवास

मन्हा एसटीनां परवास
💐💐💐💐💐💐
******************
... नानाभाऊ माळी 

बिनकामनां ऱ्हातस त्या आपला मव्हरे ऱ्हातस!कामवाला बठ्ठा आपला नांदम्हा ऱ्हातस!कामवाला तसा कमीचं दिखतसं!मी भी बिनकामना सें!बीनकामनांसंगे बिनकामनाचं ऱ्हायी!आशी गनित तें नई नां?का मन्ही नजर बिनकामनी तें नई? काय भी म्हना पन माले आज तश्या आनभव उना!

कालदिन मी शिरपूरथून शिनखडं (शिंदखेडा) एसटीम्हा उभा परवास करी उनू!एसटी चोपडा-नवापूर व्हती!गाडीनां अवतार दखी बिचारा ड्रायवर दादालें माननं पडी!एसटी बट्ठी ढक ढक व्हयेलं दिखनी!आथी-तथी तिन्ह्या आतड्या-रोदड्या लमकी ऱ्हायंतत्यात!खिडक्या निस्त्या हाडूक-पासुयी मोक्या व्हयेलं सारख्या घसी घसी नाची ऱ्हायंत्यातं!काचं खिडकीम्हा घासायी 'कूच कूच'करी आवाज करी ऱ्हायंत्यात! शिरपूर-शिंखडंरस्ते खड्डा तें एस्टीना जीव लेवा मांगे व्हतात!खड्ड उन का टायर धडक्क!धड्डक!असा आवाज करी गाडी आनी बठेल परवासीस्ना हाडके मोक्या करांमांगे लागेल व्हतात!🤔

लिखता लिखता मी इसरी गवू!बिनकामनालें बिनकामना डोयालें दिखतसं!मी एसटीम्हा हुभा परवास करी ऱ्हायंतू!शिरपूरथून शिंनंखडं एसटी खड्डा टाईटूई पयी ऱ्हायंतीं!एसटी टायरना जीव लीं पयी ऱ्हायंती!टायर भी उचकेलचं दिखनातं!खड्डाम्हा आंग टाकी खुशाल एसटीलें दणकाडी
ऱ्हायंतातं!एखादा धल्ला काठी टेकीटेकी,डुलत डुलत चालो तशी गाडी मव्हरे सरकी ऱ्हायंती!गाडीमां बठेल बाया तें निस्त्या गाया दि ऱ्हायंत्यात,"रानम्या डायवर आम्हना हाडके मोडी टाकी काय कोनजानें!गाडी निस्ती नाचाडी ऱ्हायनां!"

डायवर कसेल व्हता!पन खड्डा आढावू व्हतात!बिचारा एसटीनीं सेवा करी ऱ्हायंता!धक्कला खेडा उनात पन लाल पाटीनी एसटी कोठेच थांबनी नई!मी खिडकीगंमं हेंगडा वाकडा व्हयी बाहेर दखी ऱ्हायंतु!बाहेर निय्यगार वावरे दिखी
ऱ्हायंतातं!कामोळे,बाजरी वार्गीवर नाची ऱ्हायंतातं!पानीनां शीतडा दिखी नई ऱ्हायंता!आंगे पांगे बिनकामनं तनपट दिखी ऱ्हायतं!आगल्ला, बिचवा रस्तानां आंगे नाची ऱ्हायंतात!रुचकीन,येड्या बाभूई,येरंडेलं या झाडे दिखी ऱ्हायंतात!बिनकामनां त्या नजरे पडी ऱ्हायंतात!🌹

मी भी खिडकीगंमं आथी तथी मान मयडी-मयडी दखी ऱ्हायंतु!मन्हा धक्का एक धल्लीलें लाग्ना!तीं किद्रीस्नी बोलपन्नी,"कारे भो आठे एसटीमां हुब ऱ्हावालें जागा नई!तु काब्र बीन कामना आंग हालायी ऱ्हायना!नाची कुदी ढुकी ऱ्हायना!आंगलें चिटकी ऱ्हायना!पऱ्हा व्हये तथा!डोक धव्यबरफ पिकी गें नां! चाया ग्यात नई का आजून?वय गयी, सोय येल दिखत नई आजून!"

धल्ली डोया तानी दखी ऱ्हायंतीं!
धल्लीनां सबद आयकी बठ्ठा एसटीम्हानां लोके मनगंम दखी ऱ्हायंतात!मी तें कोल्लाखटक सकत लागी गयतु!सोतानां तोंडले झोडी लेवो आसं वाटी ऱ्हायतं!एसटी टायर घसी पयी ऱ्हायंती!वावरेंस्ना तरोटा, इचवा,रुचकीन,येड्या बाभुई,आगल्ला माले दखी चिडायी ऱ्हायंतात!बिनकामनां,बिनकामनाले उचकायी ऱ्हायंतातं!शिंनंखडांनं स्टॅन्ड उन तसा दरवाजा हुगडी!मन खट्ट व्हयी घरगंमं पयेत ऱ्हायनु!
🙏🌷🙏🌷🙏🙏🌷🙏🌷
**************************
... नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०९ऑगस्ट २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)