ना. धो च्यां शेती मातीत

ना.धो.च्यां शेती मातीत
💐👏💐👏💐👏
******************
... नानाभाऊ माळी 

         माणूस निसर्गाचा अंश असतो!निसर्ग जीवन असतं!नैसर्गिक बाबी जीवनाचं अंग असतं!असा हा निसर्ग सतत मोहवीत असतो!माणूस आणि सर्वं जीवांना आकर्षित करीत असतो! त्याच्या विशाल रूपाचं दर्शन व्यक्तिपरत्व्य भिन्न असतं!निसर्ग दर्शन देत असतो!चोवीस तास,बारा महिने दर्शन देत असतो!त्यात माणूस एकजीव होऊन जात असतो!कवी मनाचा व्यक्ती निसर्गरूपाचं वर्णन आपल्या प्रतिभेतून करीत असतो!

अनेक कवी निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात!निसर्गाची ओढ कवीला मोहवीत असतें!कवी अनुभूतीच्या साध्यातून कविता रंगवीत असतो!चितारीत असतो!कवितेत शेती-मातीचा सुगंध दरवळत असतो!बालकवी निसर्ग कवी होतें!त्यांनी निसर्गाच्या विविध अंगाचं दर्शन आपल्या लेखणीतून करवून दिलें आहें!तसेंच निसर्गाशी एकरूप झालेल्या,फक्त १५०० लोकसंख्या असणाऱ्या पळसखेड या खेडेगावात संपूर्ण आयुष्य शेती मातीत राबणारे  रानकवी,माजी आमदार ना.धो. महानोर सर निसर्ग कवी होते!निसर्ग सानिध्यातील अनेक रंग छटा त्यांनी आपल्या कवितेतून सहजरित्या रेखाटल्या आहेत!चितारल्या आहेत!नुकतचं काही दिवसांपूर्वी त्यांचं रुद्धापकाळाने दुःखद निधन झालं!निधन शरीराचं होत असतं!शरीर मृत झाले होत असतं!निसर्गकवी, रानकवी त्यांच्या कवितेतून जीवंत त्रिकाळ जीवंत राहणार आहेत!त्यांची पाभर शब्दरूपी समृद्ध बियाणे पेहरत राहणार आहें!💐👏

ना.धो.महानोर सर गेलेतं!खूप खूप दूर निघून गेलेत!शरीराचा त्याग करून निघून गेलेत!या जन्माच शब्दरूपी पवित्र दान देऊन पैलतीरी निघून गेले आहेत!कधीही परतून येणारं नाहीत अशा तयारीनीशी निघून गेले आहेत!असं वाटतंय,ना. धो. सरांनी निसर्गही सोबत घेऊन गेलेतं की काय असं वाटतंय!त्यांच्या लेखणीतून हसरा,बुजरा,खेळकर,
खोडकर,मानवी मनाला मोहविणारा 
 निसर्ग सहज चित्रित होऊन शब्दरूप घेत असें!निसर्गालाच सोबतीला घेऊन गेलेत की काय असं वाटत आहें!ना. धो.महानोर सर गेलेत!हिरवं रान सोबत घेऊन गेलेत!मातीतील ओलावा घेऊन गेलेत असं वाटतंय!

शेतीवर!काळी मातीवर!खडकाळ, बरड रानावर,झिमझिम भिजवणाऱ्या पावसावर,उगवणाऱ्या तृन पात्यावर, पावसात शेतात मनसोक्त अंग टाकून पसरलेल्या चवळीच्या वेलींवर, जोंधळ्याच्या उभ्या पिकावर ना.धो. महानोर सरांनीं जीव ओवाळून टाकला होता!💐

अजिंठाच्यां डोंगराळ खुरट्या वनात पावसाळी हिरवळ मागे ठेवून रानकवी दूरच्या प्रवासाला निघून गेलेत!झाडं,शेतातील पिकं कोमेजलेली दिसत आहेत!बाजरीची उभी शेती हिरमुसलेली दिसते आहें!बांधा बांधावरील विविध रंगी फुललेली रानफुले ताजीतवानी वाटत नाहीयेत!फुलांची एक एक पाकळी वेलींवरून खाली गळते आहे!सतत जमिनीवर सडा टाकणारी फुलं, कोमेजून दुःखी झालेली दिसतं आहेत!झाडं निष्परण वाटू लागली आहेत!अधिक श्रावण,अधिक मास असूनही हिरवळ मोहवीत नाहीये!निसर्गाची किमया आपल्या लेखणीत बांधणारा किमयागार दूर दूरच्या प्रवासाला जाऊन विसवला आहें!

जीवनाच्या ८० व्या वर्षांपर्यंत शेती मातीत एकजीव झालेला हा महाकवी!रानावनात सौंदर्य शोधणारा रानकवी!शेतात राबणारा,मातीतून अस्सल सोन पिकवणारा महाकवी, अखंड शब्दांची पानं,फुलं वेचत फिरणारा निसर्ग कवी!निसर्गाला गुरुस्थानी मानणारा शब्दकर्मी!पानी, माती,शेती,पिकं,यांत रमणारा विशालहृदयी कवी...अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत!आदरणीय ना.धो.महानोर सर आपण आपल्या कवितातून शेतात राबायला शिकविले!आपण गवतात शब्द शोधत राहिले!त्यातून अनेक ओळींचा जन्म झाला!ओळी कविता झाली!कविता गीत झाले!असें सुमधुर गीतं रचून निसर्गाविष्कार प्रदान करीत राहिले!संपूर्ण खेडं आपल्या कवितेतून उभं राहिलं!आपल्या कविता अजरामर झाल्या!आपल्या कविता जगण्याचा श्वास झाल्या!आपल्या कविता हृदया हृदयात जाऊन पोहचल्या!रचना गीतं झाली!गीतं गाणं झालं!आपलं गाणं जनतेचं झालं!आपलं गाणं मराठी जनांचं हृदयात झालं!💐👏

आदरणीय ना.धो.महानोर सर!आपण शरीराने पवित्र मोक्ष प्रवासाला निघून गेलात!आपण अमर आहात!आपण आपल्या कवितेतून संजीवन झाला आहात!प्रवासाला निघण्या आधी शेत,बांध,उभी पिकं शब्दांच्या शिदोरीनें बांधून आम्हा रसिकानां देऊन गेलात!आपल्या कविता निसर्गाच्यां फांदयावर आलेली रसभरीत गोड फळं आहेत!त्यामुळे सृष्टीच्या अस्तित्वापर्यंत ही गोड फळं येणारी पिढी आनंदाने चाखत राहतील!आपल्या जीवंत रचना जगण्यासाठी उमेदीच्या आशा पल्लवीत ठेवणार आहेत!आदरणीय ना.धो...आपणास हिचं शब्दांजली विनम्रपणे वाहतो आहे!💐👏
💐👏💐👏💐👏💐👏
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४१२०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०८ ऑगस्ट २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)