बाप मन्हा सालदार
बाप मन्हा सालदार
💐👏💐👏💐
***************
... नानाभाऊ माळी
बाप घाम गायेंतं ऱ्हायना
आज्ञाकारी व्हतं पयना
रात-दिन शिकी सवरी
मव्हरे पोऱ्या मोठा व्हयना!
बाप राबे दिन-रात !
उन फफुटांम्हा पये
घाम थेंब आक्सी गाये
जखम वल्ली लाल व्हाये!
तोंड लपाडी आंसू गाये
नई व्हतातं त्याले वैरी?
सालदारन्हा शिक्का मारी
कयी कामसंगे दोस्ती गैरी!
बाप व्हता घरनी ढाल
डोया गालें पानी व्हाये
बाप व्हता धरतन घरना
आंसू येतंसं धाये धाये..!
मूक्ला दिन आखो ऱ्हाता
सुख पोरेंस्न दखी जाता
राबी राबी महाल बांधा
आटी गया झिरा व्हाता!
मी सालदारनां पोऱ्या सें!बापना रंगत नं पानी व्हायें,डोयाघायी दखेल सें! तय हातलें राबी राबी खवडा पडी जायेल व्हतात!मूक्ला घट्टा पडेल व्हतातं!सालदारनां आंडोरं सें मी!बापना अभिमान सें माले!सालदारनां पोऱ्या सें मी!माले उज्जी गर्व सें! माय-बापनां गर्व सें!घट्टा पडेल हात राबेत!त्यासना घट्टास्मा मन्ह जीवन दख!बाप मन्हा अभिमान सें!मी सालदारनां पोऱ्या सें!!तय पायन्या खोल भेगा थंडी-पानीमां फाटेत!सालभरनं कस्ट उरके!परका ठिकाने राबतं ऱ्हाये!👏
राम पाह्येरामां पाह्येटे उठी घरतीन कामले निंघी जाये!मालकनां वाडघाम्हा आड वरतीन पानी व्हा्ये!दरोजना नेमेल कामें,राबत राबत मव्हरे पये!आपोरा सपोरा कामेसं गुंता,मालक मांगे ऱ्हाये!सालदारनां पोऱ्या मी बापना अभिमान सें माले!गाय,म्हैस,बैलेंस्न हागेल,शेनन्या पवट्या पवट्या भरे!उचली उचली बाप मन्हा,हेंगडा वाकडा पये!शेन डालकाम्हा भरतं जाये!चोमय बांधी डोकावर टोपलं,उक्खल्लावर फेकतं ऱ्हाये!सालदारनां पोऱ्या मी,अभिमान सें माले!👏
बाप मन्हा खमक्या व्हता
येय दखी घाले लाथा
कस्ट करी सालदार बाप
सुखना दिन दखाले ऱ्हाता!
सालेसाल साल भरी
सालदार मन्हा बाप
माणुसकीनीं गोडी लायी
वडन्ह लायी ग्या रें रोप!
गुईनीं रें ढेप बाप
चौमेर भनभनेत माख्या
मानूसकीनीं शिरीमंती
व्हता दुन्यानां रें लाख्या!
जीव धाये खेतीवर
बाप व्हयी ग्या वावर
टिक्कम कुदायी पावडी
संगे काम करांनं हावरं!
बठ्ठ वाडगं,खयें,वाडा,ढोरघर झाडी झूडी,खट्टावर शेन-मुत नितरतं ऱ्हाये!झाडेलं झूडेलं शेनन्हा भुगला डालकाभरी फेकत ऱ्हाये!बाप मन्हा सालदार व्हता माले त्यांना गर्व सें माले!घाम त्यांना नितरत ऱ्हाये!जिमीनवर पानी व्हाये!बापनी खुरगेटल दाडी कव्हयं गाले मन्हा फिरे!बाले टोचायेत उज्जी जीव लाये मन्हा बाप!सालदारनां पोऱ्या मी, गर्व मन्हा बापना!माले अभिमान सें बापना!👏
उक्खल्लावर फेकीसन पुंजा बाप वाडगे पयेत ऱ्हाये!पल्लाम्हा कुटार-भिमुंगनां पाला भरीसनी गव्हान जाये!बैल गव्हानम्हा मुसड घाली पाला-कुटार चरत ऱ्हायेत!मव्हरे जनेल गाय-म्हैशीस्न दान-ढेप वलाले पये!वलेलं दान गाय-म्हैसीस्ना तोंडं-गये उतरत ऱ्हाये!हातमा
बादली.. गूढगे बसी,खाले थाना चुरू चुरू करेत!दूध काढीस्नी वासरू-पाल्लू तोंडं घोमाली पोट भरेत!खप्पड पडेल वासरू पोटे बापना बये!ताबेदार मालकना बाप,दूध बादली भरी जाये!बाप हुकूमनां गुलाम,कुडची-कोपरीम्हा मये!सालदारनी गुलामीम्हा दखी नई नां बाहेर दुन्या!बाप हेर,मोट,मोट, नाडा,जुवाडी,सोता धाववर पये!घामना गुलाम बाप,माले अभिमान बापना!सालदारनां पोऱ्या मी,गर्व बापना!👏
व्हातं पानी लांगीनं
पायलें बिलगेत मासा
बारं भरी फुगे फुटे
पिके वाजेत तासा!
बाप जिंदगीनीं साय
कशी जिंदगीले उनी गती
टोमं टोमं मानसे भरी
चालनी गयी मनन्ही भीती!
पावसायानी घोंगडीम्हा
वल्ला व्हये आंगेआंग
कव्हयं थरक भराये
पयेतं ऱ्हाये ढागेंढागं!
सक्कायम्हा धीरेस्करी पिव्वेधमक उजाये हेट्या वर चढत ऱ्हाये!दखता दखता हेट्यानां यांय वर वर डोकं काढत पयें!भरेलं दूधन्या बादल्या धरी,वाडावर बाप पये!वाडावर दूध
ठीसनी आखो वाडगागंम पयेत
ऱ्हाये!ढोरेसले पानी दखाडा गुंता खुटानं दावन सोडी पये!बैल जुपीस्नी गाडालें, बाप मयांरस्ते धाये!
मांगेथीन टोपलीम्हा शाक भाकरनं गासोड यी ऱ्हाये!बाप नाडे वक्खर, भरन दगडन्हा ठेयें,मूठ हातमा वक्खर बांधे बांध पये!कव्हयं नांगर घुसे,जिमीन खालेवर उसये!बाप जागलक्या मयानां,मया निय्यागार कया!बाप सालदार मन्हा,न्यामी गर्व सें माले!बाप दुन्यान्हा रें दानी,व्हती साधी भोई ऱ्हानीं!बाप झूये झूये पानी!👏
दिनभर राबी राबी कव्हयं यांय बुडावर घर यें!कव्हयं रातले टाइम बे टाइम यें!घर वावरेस्ना गोमडा आवरी बाप उशिरा घर यें!थकेल बाप पिची जाये!थकी जाये!दोन तुकडा खायें!आंग धरनीवर टाके!घोरांना आवाज यें नाके!बाप बेसूद पडे!तें राम
पाह्येरें उठी पयेत वाडावर पये!सालभर,वरीसभर बाप राबतं ऱ्हाये!सुट्टी नई!आराम नई!बिमारी नई!बाप मशीन व्हता मन्हा!मशीन चालतं ऱ्हाये!घामेघाम व्हयें, बाप मव्हरे मव्हरे पये!माय मोलमजुरीलें जाये!दोन पैसा कमाये!आम्हना शिक्षणनां गुंता दोन्ही हेला व्हयी जाये!👏
घर दार नही व्हतं, कोठे घालूत डोकं?वावर नही व्हत कोठे लियुत पिकं!पडेल वाडाम्हा लाकडी दांड्या हुभ्या करी घालूत डोकं!आंग झाकाले फाटेल फाटेल लुगड-धोतर!आम्हले नई व्हतं घर!सालदार बाप उज्जी गर्व सें माले!आज सोनानां दिन दखाडात माले!नई व्हतात कपडा,बापले आंग झाकालें!डोये येतंस आंसू!फोटो दखत बसू? तुन्हा कस्टानां आंबा चोखत ऱ्हासू!बाप पोटे यावा, रूपे दरसनं देवा!तुन्हा उपकार आभाय, बाप धाडी दे रें देवा!👏😥
सालदार बाप व्हता
देवनां पहिले टेकु माथा
जिंदगी आकशी गयी
बाप तुकारामनीं गाथा!
हिरा माणिकन्हा मढेलं
सच्चा बाप मन्हा व्हता
राबी राबी सोनं काढे
.... आटनां झिर व्हाता!
बाप राबी राबत गया
सोता दुःख भोगत गया
सुख वाटी-उटी आम्हले
पहिली गाडीवर निंघी गयां!
आंगे येवावर आखाजी
जीव काल्यावाल्या व्हसं
ऱ्हाये साल सुटानीं भीती
आज बाप हिरदमा ऱ्हास!
लोकेस्नी दुन्यानीं खेती व्हती!ज्यास्ना पले घर-वावर नही ऱ्हास!त्या साल धरी लेयेत!मन्हा बाप सालेसाल सालदार व्हयी राबत ऱ्हायना!सुखनं जीवन पह्येरत ग्या!बाप मन्हा सालदार व्हता!सावलीनं झाडं लायी बाप पहिली गाडीवर निंघी ग्या! हिरदथून अभिमान सें माले!👏
👏💐👏💐👏💐👏👏
*************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर, पूणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-०६ऑगस्ट २०२३
Comments
Post a Comment