सौंदर्यवती मस्तानीच्या समाधीतून
सौंदर्यवती मस्तानीच्यां समाधीतून
💐💐💐💐💐💐💐💐
****************
... नानाभाऊ माळी
......काळ इतिहासाला घेऊन पळत असतो!इतिहास नोंद करीत,पानें उलटवीत काळासंगे पळत असतो!पुण्याहून नगरला जातांना साधारण ३५किलोमीटर अंतरावर शिक्रापूर आहें!पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील हे गाव!शिक्रापूरपासून एक रस्ता डाव्या बाजूने जातो!अन शिक्रापूर पासून साधारण ८-१०किलोमीटरवर "पाबळ"हे गाव आहें!पाबळ तसं शेती भातीचं गावं!काळी-लाल मातीचं उत्तम उपजावू शेतीचं गावं आहें!💐
पाबळ या गावाला इतिहासाने नोंद घ्यावी? हो तसंच आहें!मराठ्यांचा वीर,पराक्रमी शूर सरदार!पेशवा!पहिला बाजीराव!या शूर सरदराने मराठा राजवटीचा झेंडा अटकेपार लावला होता!पहिला बाजीराव इतका शूर होता असं म्हणतात की, मध्यप्रदेशातील छत्रसाल राजावर यवणाने आक्रमन केलं तेंव्हा मदतीसाठी बोलाविले होतें!बाजीराव पेशव्यानी आपल्या शूर,पराक्रमी सैन्यासह आक्रमणकारी यवनानां सळो की पळो करून सोडले होतें!त्यात छत्रसाल राजाचा विजय झाला होता!💐
बाजीराव पेशव्यांनी केलेल्या महापराक्रमावर छत्रसाल राजा अतिशय भारावून गेला होता!प्रभावित झाला होता!त्या आनंदात छत्रसाल राजाने बाजीराव पेशव्यांना त्यांच्या हिऱ्याच्या खानीपैकी एक त्रितांश खानी देऊन टाकल्या होत्या! त्यासोबतचं त्याच्या इराणी पत्नीच्या पोटी जन्मलेली मुलगी "मस्तानी"देखील पहिल्या बाजीराव पेशव्यांना दानात देऊन टाकली होती!🌹
मस्तानी हिंदू राजा अन इराणी आईच्या पोटी जन्माला आलेली मुलगी होती!दिसायला अतिशय सुंदर होती!तिच्या लावण्याची,सौंदर्याची अनेक लेखक,कवी,बखरकारानीं आपल्या लेखणीतून वर्णन केलं आहें!पण अभागी मुलगी!सौंदर्याच्या आड स्वतः दुःख,यातना,हिनता, अवमान,अपमानित,पराधीन जीवन वाट्याला आलेली स्त्री होती!💐
शूरवीर बाजीराव पेशव्यांनी आपल्या अचाट शौर्याने हिंदुस्थानच्या इतिहासात आपलं नाव उंच शिखरावर नेलं तोच महायोद्धा घरच्या भाऊबंधकीच्या राजकारणाचा बळी ठरला होता!त्यांची पत्नी,आई, नातलग पक्क्या कर्मठ संस्कारांनी बांधलेले होतें!त्यातं त्यांनी "मस्तानी"लां पचवन शक्यच नव्हतं!शनिवार वाड्यातल्या गृहयुद्धाची ठिणगी बाजीराव पेशवा आणि मस्तानीच्या प्रेमसंबंधाच्या आड चटके देत राहिली!अनेक युद्धात वीरश्री खेचून आणणारा योद्धा गृहयुद्धात हार मानत राहिला!
मस्तानीला शनिवारवाड्यापासून लांब अनेक ठिकाणी ठेवल!जागा बदलतं राहिल्या!सासवडला जातांना 'मस्तानी'तलाव प्रसिद्ध आहें!मस्तानीच्या भाग्यात मानहानी येत राहिली!बाजीराव पेशव्यानी शेवटी पाबळ या ठिकाणी वाडा बांधून मस्तानीला राहायला नेलं!मस्तानी अतिशय खचून गेली होती!कोणी लिहून ठेवले आहें की मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केली अशा अनेक काल्पनिक कथा असतीलही!पण सौंदर्याच्या आड दुःख सहन करीत राहिलेली छत्रसाल राजाची ही कन्या शनिवार वाड्याच्या गृहयुद्धाची बळी ठरलेली,पहिल्या बाजीराव पेशव्याची पत्नी होती!.....💐
.....तर 'पाबळला' जाण्याचा योग आला!गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेलाचं एक समाधी म्हणा!कबर म्हणा,मागील इतिसाची पाने उलटविण्यास भाग पडलेली !'पाबळ' या गावी पेशव्यांचा इतिहास रेंगाळतांना दिसतो!हा इतिहास पेशवाईच्या दाराजवळ पोहचलेला दिसतो!पहिले बाजीरावं पेशवा यांचा या गावाशी संबंध मस्तानीमुळे आला होता!मस्तानीची समाधी पाबळ गावाच्या बाहेर आहें!समाधी पाहिली आणि 'बाजीराव-मस्तानी' या प्रेम कहानीचा करुण शेवट पाबळला झाला हे कळलं!मस्तानीच्या सौंदर्याची वर्णन रसभरीत करणाऱ्या कवी,लेखक,बखरकारांनी तिच्या दुःख थोडं जरी उघडं केलं असतं तर तिच्या यातनानां,वेदनानां,मनाच्या जखमानां मलम लावल्या सारखे झाले असतें!💐
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२२०७६५००
दिनांक-३० ऑगस्ट २०२३
Comments
Post a Comment