सालदारनीं जिंदगी
सालदारनीं जिंदगी
👏💐👏💐👏
****************
... नानाभाऊ माळी
आंगम्हा वारं उनं का कोनी भी ऱ्हावो मंग...भगत ऱ्हावो!भक्तीन ऱ्हावो!!मानोस ऱ्हावो!बाई ऱ्हावो निस्ता घुमत ऱ्हातस!घुमता घुमता घुमानां घाम डोका फाईन तें तयपाय पावूत नितरतं ऱ्हास!वल्ला चिंब व्हयी, घामनं आंग धोयी,पुरा थंडा पडी जास!घुमाना नांदम्हा आंगम्हानां नसेनस रस चोखायी जास!आंग तऱ्हाटी जास!तठेंग आंग दुखाना खेय सुरु व्हयी जास!पन ज्यास्नी हावू खेय धाकल्पनं फाईन खेता खेता,घाम गायी-गुयी जिकी ल्हेयेलं ऱ्हास!हात पायलें पुरा घट्टा पडी जायेल ऱ्हातस!भरपुटे यी जायेल ऱ्हातंस!आपली सोतान्ही जिंदगी,आपलं इमान,पुरं मालकनां पायशी भांदेल ऱ्हास...यांलेचं सलदार म्हनो का मंग?🤔
सालेसाल मालकनां सबद झेली, सबद उचली!जित्ता देह मालकलें ताबे गहान ठी,रात-दिन घर-वावरम्हा राबतं ऱ्हावानं!ढोरे-ढाकरेंस्ना चारा-पानी करत वावरनी माटीवरं सोतानां जीव ववायेतं ऱ्हावानं!राबी-राबी घाम गायी,घामवरीचं आंग धोतं ऱ्हावानं!धोतरवरी पुसत
ऱ्हावानं!वावरनी माटीम्हाचं लॊयलाय करी,तिचं माटी आंगवर भूरभुरायी आंगन्हा घाम जिरावत ऱ्हावानं!जिरेलं घाम वावरनीं माटीम्हा कालायी-कुलायी जात ऱ्हास!
माटी घाम पी जास!मव्हरे वरसारदम्हा पह्येरनीं व्हस!घामनां खेतीनं पिकं जिमीनम्हायीन टरटरांतं वर येत ऱ्हास!वाढतं ऱ्हास!आभायनीं दोरी धरी हुभ ऱ्हास!पोघा धरी निय्येगार पीक हुभ ऱ्हास!भरायी-भुरायी,पिकी-पाकी मालकनां दारसे येतं ऱ्हास!पन हावू गडी मालकनां खुटालें सोतालें बांधी,त्याचं गव्हानम्हा बिनबोभाट हुभी हयाती काढत ऱ्हास!मालकनां बैल व्हयी,गव्हानम्हा निय्यगार चारा ऱ्हायीस्नी भी मुक्सा बांधी हुभा ऱ्हासं!मालकनां खुटानी दोरीले जिंदगी भांदी जागत ऱ्हास!जागता जागता जगत ऱ्हास...मंग यालेचं 'सालदार' म्हनो का?🤔
आक्सी दखा आयकामां सें!काय बर?घर गहान ठेवतंस!वावर गहान ठेवतस!भांडा गहान ठेवतस!सोनं गहान ठेवतस!पन मानोस भी गहान रीत सें!कामगुंता सोतालें वरीसभर गहान ठेवतस!हायी आखाजी तें पुल्ली आखाजी पावूत गहान ऱ्हान पडस!वावर,ढोरे-ढारे,शेणपुंजा, गाड-बैल,गाय-म्हैसनं धुद काढानं, पाह्येटे टाइमे-टाइम उठी,रात-दिन कायजीबन बठ्ठा कामे उरकी रातले उशिरा जपानं!आश्या कामेसंगुंता सालभर पैसा आनी धन-धान्यनां साफटा लिसनी साल ठरायीस्नी हावू 'सालदार' मालकलें सालभर बांधेल ऱ्हास!मांगली आखाजी फाईन तें येती आखाजी पाऊत पक्का बांधेल ऱ्हास!यालेचं सालदार म्हंतंस का मंग? 🤔
सालदारनां अवतार दखीस्नी वाटतं ऱ्हास,या जीवानघायी मांगला जनमम्हा काहीतरी बरं वाईट काम व्हयी जायेल व्हयी म्हनीसन आते कष्टानीं जिंदगी कठनी पडानी!दिनभर धोतर-कोपरीनां अवतार दखा सारखा व्हयी जास!सहीन्ना कपडास्ना,धोतर-कोपरीनां मयगटेल पटक रंगम्हा बट्टा शेन-मुतनां वास,दूधना वास,घामनां वास,सालदार संगे मांगे लयी फिरत ऱ्हास!तय हात-पायवर ते बार माही मयनां चर चढेल दिखत ऱ्हास!डोकांना बाले रुमालम्हा गुंढायेलं ऱ्हातस!काये-धव्य डोकांखाले बिनतेलनं डोकंचमकत ऱ्हास!तोंडवर खुरगेटल दाढी दिखत ऱ्हास!दिन उगा फाईन रातना जेवने व्हवा पावूत निस्त घर,वावर,मया,खया,गाय म्हैसलें दान-पानी,बैल खुटासले बांधानं,चारा टाकीस्नी आखेर मालकले भेटी.. रातले घरनागंम पयेत सुटानं!👏
रातले पोरें-सोरे जपी जायेल ऱ्हातस!घरनं खटलं भी दिनभर रोजे-टोजे, निंदा-टुपालें कामले जायी,रातले
जेवनंनी थाटी मव्हरे सरकायी ठेवस!दोन्ही कोल्ल-वल्ल खायी खाटलास्वर आंग टाकी पडतंस!बेसुध व्हयी पडतंस!दमी-थकी पडतंस!पडताज जप लागी जास!पाह्यटे उठी आखो नवा यांयसंगे गिरजदारीनां खे सुरु व्हयी जास!याले मंग सालदार म्हनो का? 🤔
सालदार-मालकनं सूत जमावर मंग सालदार गडी सालेसाल एकच ठिकाने साल भरत ऱ्हास!खांदवर, आंगवर मालकनीं दुसेरं ठी बैल व्हयी आक्खी हयाती इमानदारीथीन राबत ऱ्हास!मालक घोमालतं ऱ्हास,कव्हयं शेपटी मयडी तें कव्हयं आर टोची, तें कव्हय पाठवर कयेकनं टिपर बठस,मालकनं गाडं व्हडत ऱ्हास!काटा दखो नई,उन दखो नई,हिवाया दखो नई,पावसाया दखो नई, दिन-रात गाड व्हडी पयेत ऱ्हावो!एक दिन उक्खल्लाम्हा सोतालें ढकली सोतानी जिंदगीलें फेकी देवो!
हायी कोनगुंता करत ऱ्हास?पोरें-सोरेसले शिक्सन दि मोठं करतंस!पोरेंसले सोतानं राबेलं मव्हरे ठीस्नी हावू "बाप" चार सबद समजाडी सांगतंस,"आम्हनीं अख्खी हयाती सालदारकीम्हा खपी गयी, तुम्ही शिकी-सवरी मोठं व्हा!आम्हनी हयाती दुसरानां शेनपुंजा,डोकावर टोम्ह,टोपलं,डालकं,चारानां भारा, धरी धरी निंघी गयी!तुम्ही शिकीस्नी मोठं व्हा!सालदारनां आंडोर,आंडरी शिकी मव्हरे गयात आसं लोकेस्नी सांगालें जोईजे!आम्हना जिंदगीना पांग फेडा पोरेंस्वन!" डोया आनी हिरद गह्येरी येस!पन सालदारभोनां आनभवनां बोल डागी चटकानां ऱ्हातंस!राबी राबी आक्खी हयाती मालकनां गव्हानम्हा निंघी जास!एक दिन मसनखयीमां आंगवर गवऱ्या, लाकडे पडतंस!जिंदगी खपी जास!नां सुख,नां दुःखनां सबद काने पडतंस!गुच्चूप खाक व्हयी राख व्हयी जास!बठ्ठ बठ्ठ जागावर ऱ्हायी जास!मंग कान वर पडस, "आमुक टमुक मालकनां सालदार गमी ग्या हो!भलता इमानदार मानोस व्हता भो!मालकलें जिकता जिकता आक्खी हयाती खपी गयी बिचारानीं!बठ्ठ जागावर ऱ्हायी जास!पन नाव कमायी ग्या गडी!"मंग यालेचं सालदार म्हनो का?🤔
👏💐👏💐👏💐👏💐
**************************
... नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२४०७६५००
दिनांक-०४ऑगस्ट २०२३
Comments
Post a Comment