चला जाऊ गडकिल्ल्यांवर(नारायणगड)
चला जाऊ गडकिल्ल्यांवर
(नारायणगड)
💐💐💐🙏🌷🌷🌷
*********************
... नानाभाऊ माळी
कधी कधी स्वप्न पहातं
मी उड्डाणं करुनी येतो
हिम्मत शक्ती स्फूर्तीला
...वरती गगनावरी नेतो!🌹
जंगल दऱ्या खोऱ्यात
उंच किल्यावरी जातो
तटबंदीच्या अफाट भिंती
मी पाहुनी हिम्मत घेतो!🌹
सुसाट वारा पाऊस वरती
कधी वादळ घेऊनी येतो
लोंढा वाहतो घेऊनी माती
सारा किल्ला हतबल होतो!🌷
तलवारीने ढाल फोडतो
शूर जिंकूनी किल्ला घेतो
घाव सोसती अखंड कातळ
राजा भगवा वरती नेतो..!🌷
लढाई लढती शूर मर्द
अखंड रक्तपात होतो
तोफ गरजतें किल्ल्यावर
राज्यांचा जय जयकार होतो!🌷
किल्ला होतो ढाल छातीचा
कधी रक्तभंबाळ होतो
प्राण घेऊनी शूरवीरांचें
विजयी जय जयकार होतो!🌷
रक्त सांडते कातळावरती
......शौर्य प्राण घेऊनी जातो
देव,देश अन धर्मापायी
आमुचा किल्ला छाती होतो!🌷
अफाट सेना समोर असतें!तुटपूंजे मावळे लढत असतात!रक्ताचा पाट वहात असतो!सैनिक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो!असें अनेक सैनिक धारार्तिथी पडलेले असतात!तोफांनी किल्ल्याची देखील चाळण झालेली असतें!किल्ला हाती येत असतो!त्यात मृत्यूचे तांडव समोर दिसतं असतं!जिंकणारें अन हरणारें अस्तित्व ठेवून जात असतातांत!किल्ला कधी रडत असतो!किल्ला कधी हसत असतो!किल्ला ताब्यात येत असतो!कानठळ्या बसविणाऱ्या तोफांच्या आवाज होत असतो!किल्ला विजयाचा जल्लोष होतं असतो!💐
किल्ला सत्ताकेंद्र असतं!किल्ला हुकुमाचा ताबेदार असतो!कधी किल्ला ढासळतो,तट,बुरुज,
महादरवाजा फुटतो,तुटतो किल्ला नेसतानाभूत होतो!किल्ला हुकुमाचा गुलाम असतो!तो ज्याच्या ताब्यात त्याची सत्ता सहन करीत उभा असलेला किल्ला राजसत्येचं केंद्र बनतं!सत्ता जाते!राजसत्ता जाते!इतिहासाची पाने पालटत असतात!किल्ला जागेवरचं असतो!असाचं एक किल्ला पाहण्यासाठी "चला जाऊया गडकिल्ल्यांवर" या मोहिमेंतर्गत ऐतिहासिक अस्तित्वाच्या पाऊलखुणा पहायला गेलो होतो!💐
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळ असलेला,"खोडद" सारख्या जागतिक प्रसिद्ध ठिकाणी अवकाश दुर्बीन बसविलेल्या
ठिकाणापासून जवळच
नारायणगड पहायला गेलो होतो!पुण्यापासून बसने साधारण तीन तासांच्या असलेला अन साधारण ८०-८५ किलोमीटर अंतरावर असलेला नारायणगड शौर्याची निशानी म्हणून प्राचीन काळापासून ताट उभा आहें!इंग्रजी अक्षर उलटा व्ही v आकाराचा हा किल्ला साधारण तीन किलोमीटर लांबीचा असावा!किल्ल्यावर सफाट पृष्ठभाग पठार कमीचं आहें!उलटा v
आकाराचा असल्याने उंच काळ्याशार कातळातं उभा आहें!समुद्र सपाटीपासून साधारण १०००तें ११०० मिटर उंच असावा!हा किल्ला चढायला जास्त नाही तरी थोडासा अवघड आहेंचं!काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत!तर काही ठिकाणी उभट काळ्याशार
पाषाणात पायऱ्या कोरलेल्या आहेत!या किल्ल्याचा मुख्य उद्धेश
टेहळणीसाठी केला गेला असावा!इतक्या उंचावरून पायथ्याशी चालेल्या सर्वं हालचाली टिपता येतं असाव्यात!
पायथ्याशी 'मुकाई माता मंदिर'असून तेथूनच किल्ल्यावर जाणासाठी पायऱ्या आहेत!आम्हीं मुकाई माता मंदिराचं दर्शन घेतलं आणि किल्ला चढायला सुरुवात केली!अरुंद पायऱ्या,उभट कडा!कडेने मध्येच झाडा-झूडपांची वाऱ्यासंगे होणारी मस्ती नजरेत भरत होती!कातळ काळ्या पाषाणातील उभ्या कडा त्यात कोरलेल्या अरुंद पायऱ्या चढून जाण्याचं आव्हान स्वीकारून आम्हीं आमचे टिम लीडर, आदरणीय बागूल साहेबांच्या नेतृत्वाखाली किल्ल्यावर चढाई करीत होतो!आम्हीं जसं जसे उंचावर चढत होतो किल्ल्याच्या पायथ्याला उभ्या असलेल्या आमच्या बस लहान काडीपेटी सारख्या वाटतं होत्या!🌷
किल्ल्यावर चढाई म्हणजे अति श्रम अन अंगाला घाम फुटनें आलेचं!उंचावर जात असूनही घाम येतं होता!हळूहळू मोहीम फत्ते झाली!कष्टाचा घाम उंचावरील थंडगार वाऱ्याने पळवून लावला होता!किल्ल्यावर चढल्याचा आनंद काही और होता!नारायणगड उंच आहें!उलटा v आकाराचा दोन अडीच किलोमीटर लांब असलेला हा किल्ला एक वेगळेच अस्तित्व टिकवून आहें! पठारावर अरुंद जागेत "हस्तामाता" मंदिर बांधलेलं आहें!मागील बाजूस उभा कडा असून मंदिर अगदी उभ्या कड्यावर उभे आहें!मंदिरातील मूर्ती सुबक अन सुंदर असून मनोभावे माथा टेकवून, घुडगे टेकवून हस्तामातेचं दर्शन घेतलं!
उंच शिखरावर झाडं,वेली एकमेकांच्या प्रेमात पडलेली दिसतं होती!नारायणगड किल्ल्याने श्रावणाची हिरवी चादर पांघरलेली दिसतं होती!उभ्या कातळातील नारायणगड चढण्यास थोडाफार अवघड असला तरी चढतांना आव्हानातील आनंद मनाला समाधान देऊन गेलं!उंचावर पाण्याचं टाके आहें!त्यात निळेशार पाणी दिसतं होतं!काही ठिकाणी घोड्याच्या टापांचे कातळ शिल्प दिसलें!मानवी पाऊल दिसलें!नैसर्गिक उभट किल्ला आहें!किल्ल्याच्या उजव्या बाजूस अनेक टाक्यांचा समूह आहें!आणि वरती देवदत्त गुहा देखील आहें!महानुभाव पंथातील संत महंतांनी येथे ध्यानधरणा केल्याची माहिती मिळाली!
अवघ्या एक तासात किल्ला सर केल्याचा आनंद काही और होता!आव्हान स्वीकारून मोहीम फत्ते केल्याचं समाधान जगावेगळचं होतं! काल दिनांक २७ ऑगस्ट रोजी घरून निघतांना श्रावण सरीची भूरभूर होती!किल्ला खाली उतरून आल्यावर देखील काही अंशी छत्री उघडण्यास भाग पडलेला श्रावणी खट्याळपणा आम्हाला जाणवला होता!किल्ला सर करून आलो होतो!आम्हाला वाटतं होतं, "किल्ला जिंकून आलो आहोत!" ही श्रमाची पोहोच पावती असावी!आमच्या मोहिमेचे संयोजक श्री बागूल साहेबांचे हृदयातून आभार मानले पाहिजेतं!केवळ त्यांच्यामुळेचं ही सुवर्ण संधी मिळाली होती!साहस, ऊर्जा,शक्तीचा प्रत्यय आला होता!किल्ला खूप काही देऊन गेला होता!तृप्त मनाने मोहिमेची सांगता झाली!💐💐💐💐🙏🌷🌷🌷🌷
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२८ ऑगस्ट २०२३
Comments
Post a Comment