झुंज आणि गोल्डमेडल

झुंज आणि गोल्ड मेडल!
💐💐💐💐💐💐💐
**********************
... नानाभाऊ माळी

कधी कधी शब्द भावनिक होतात!
 काय सांगावे?अश्रू डोळ्यात येतात 

थेंबांचें गरम स्पर्श दूर मागे नेतात 
आठवणींचें पुंजकें जाळ्यात येतात

घरंगळुनी जेव्हा तें दवबिंदू होतात
वाहात तें  सारे तळ्यात जातात 

तेचं पुन्हा वाफ्यात जीवंत होऊनि 
हिरव्यागार पानाफुलातल्या मळ्यात येतात

आठवणींच्यां पानांवरील हे जुने ठसे
कोरीव स्मृतितुन मग आपुलेच होतात 


.....घरात अठरा विश्वे दारिद्र्य नांदत असतांना उद्या अन्न शिजवायला पीठ,मिर्ची, तेल नाही!दररोज रात्री झोपण्या आधी उद्याची भ्रातं!सकाळी उठल्यापासून चुलीच्यां आगीत कोंबायला सरपण तरी हवे ना? पोटाच्या भुकेसाठी खांद्यावर कुऱ्हाड घेऊन लांब नदी कडेने भटकत कोरड्या काट्या कुट्यांची मोळी  चुलीची आग भडकायची!अन्नातं उतरायची!पोटाची आग विझायची!भरल्या पोटी मग शाळेत पळत सुटायचं!आग ओकणारा सूर्य रस्त्यावर उतरायचा!अनवानी जातांना फुफाट्यात तळपाय भाजले जायचे!चटके सहन करीत शाळेत पळत विद्याज्ञान भूक आणि तहान भागवायची!काखोटीला पिशवी अडकवून पळत घर गाठायचं! तप्त,काटेरी वाटचालीत यशाच सोनेरी मुकुट डोक्यावर घालतांना मिळणारा आनंद कसा असेल बरे?

वाट काट्याची चाललो
दुःख मायशी बोललो
....पिता शब्द झेललो
असं बाणेदार वागलो!🌷 

स्वयं समजून घेई उरा
पाऊले चालली हो घरा 
 वाहत होती अश्रू धारा
संगती होता गार वारा!🌷

आग पोटाची हो होती
आग ज्ञानाची ही होती
माय डोळे पुसायासाठी 
मनी श्वास भरत होती!🌷

स्वप्न पाहणारे राखेतून उंच भरारी घेत असतात!जिद्द आणि चिकाटीतून मग गरिबी जिंकत असतांत!अनेक फिनिक्स उंच भरारी घेत असतांत !आधार हतबल होत असतांना, चिकाटीच्या शिडीवरील जिद्द जिंकत असतें!असें अनेक जिद्दी तरुण असतात!खेडेगावात कुठल्याही सुविधा नसतांना!कष्टाने भरारी घेत असतात!स्वतःचा ठसा उमटवणारी व्यक्तिमत्व धडपडत असतात!त्यात... त्यात "हिरामण सोनवणे" नावाचा जिद्दी तरुणही असतो!🌹

आज पुण्यातल्या बहुराष्ट्रीय कंपनीत सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत असलेले,सुखासीन जीवनाच्या यशशिखरावर असलेले श्री.हिरामण सोनवणे बालपणी गरिबीचे चटके सहन करीत,शिक्षण घेत, शेतात काम करीत,मजुरी करीत!आई-वडिलांना सर्वस्व मानणारे! 'शिक्षण हेचं वाघीनीच दूध आहें!'यावर अतूट श्रद्धा अन विश्वास असणारे हे व्यक्तिमत्व बालपणी 'पोहरे'या जळगाव जिल्ह्यातील छोट्याशा गावात पहिली तें मॅट्रिक पर्यंत शिकले होतें!वीज नाही,रात्री रॉकेल चिमणीवर अभ्यास करणारें हिरामण सोनवणे सर,अकरावी पासून तें ग्रॅज्युटपर्यंत चाळीसगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी शिकले होतें!

वर्ष २००५चं असेल,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा निकाल जाहीर झाला होता!'बी.एससी'चां निकाल देखील जाहीर झाला होता!mathematics  B.Sc चा निकाल जाहीर झाला होता!विद्यापीठातून पहिला आलेल्या विद्यार्थ्यास "सुवर्णंपदक" दिलं जात असतं!संपूर्ण विद्यापीठातून "gold medal" चां लौकिक अन गौरव प्राप्त केला होता... हिरामण सोनवणे!..'गणितज्ञ' म्हणूयात!.. तेंव्हा चटक्यांच्या छाताडावर उभे आयुष्य  लावलेलें हे व्यक्तिमत्व होतं!

नाव हिरामण,हिऱ्यासारखं चमकणार हे अतुलनीय व्यक्तिमत्व, रत्न चॅलेंज स्वीकारून,कष्ट करण्याच्या सवयीमुळे घवघवीत यश साकार केलं होतं!यशाला गवसणी घातली होती!यश आव्हान स्वीकारण्यास सांगत असतं!आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ठिक अन्यथा फरफट सुरु होतं असते!फरफटीतून फिनिक्ससारखी उंच भरारी घेता येते!आशेचा उजेड दाखवणाऱ्या हिरामण सोनवणे यांची पुण्यातल्या फर्ग्यूसन कॉलेजमध्ये M.Tech साठी निवड झाली!तो दिवस जेवढा आनंदाचा होता तितकाच मनावर दडपणाचा होता!ऍडमिन झालं होतं!पुढील शैक्षणिक खर्च भागवायला आर्थिक परिस्थिती नव्हती!🌷

माणसाची पदोपदी परीक्षा असतें!कष्ट अन निष्ठा यशाची आशा असतें!आशेवर जीवननिष्ठा समर्पित केली तर यशाची सुंदर सकाळ स्वागतास तयार असतें!शैक्षणिक कर्जासाठी बँक नकार देत असतांना कुठूनतरी आशेचा किरण उजेड घेऊन समोरून येत होता!मोठया प्रयासाने कर्ज मंजूर झालं आणि M.Tech चं भव्य द्वार उघडलं होतं!महाराष्ट्रातील विशेष नामांकित कॉलेजपैकी फर्ग्यूसन कॉलेजमध्ये ऍडमिशन कन्फर्म झाली अन एक ओझे कमी झालं होतं!दोन वर्षे काढायची!आवक नव्हती!जेवणाचा,कॉलेजचा खर्च आई-वडील तरी किती मदत करणारं होतें?आर्थिक परिस्थिती नाजूक असतांना देखील मदत होतंच होती!तेथे शिकत असतांना अनेक खाजगी क्लासेसमध्ये पार्टटाईम टिचर म्हणून शिकवायला सुरुवात केली अन महिन्याचा चार पाचं हजार रुपयाचा खर्च पार पडता येत होता!

शिकणे आणि शिकण्याप्रति आस्था, तीव्र ओढ असेल तर अनेक दरवाजे उघडत असतात!दोन वर्षांच्या काळात अनुभवांचं प्रचंड मोठ भांडार हाती गवसलं होतं!M.Tech चा रिझल्ट लागला अन त्यात फर्ग्यूसन कॉलेजमध्ये "सिल्वर मेडल" नें मान उंचावली होती!कष्टाचं फळं अतिशय गोड असतं!कॉलेजमध्ये अनेक कंपन्या आल्या होत्या!कॅम्पस सिलेंकशन झालं आणि मगरपट्टा आय.टी.हबमध्ये नोकरी मिळाली!हा चढता आलेख आहें 'हिरा'मॅन सोनवणे यांचा!हिऱ्यासारखं चमकत राहावा म्हणून आई-वडिलांचा हा हिरा स्वतः परीस होऊन इतरांना स्पर्श करून सोनं बनविण्यासाठी धडपडत आहें!🌷

खराडी येथील IT क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत, पोटाचा प्रश्न सुटला आहे!मनाच्या आत दडलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी आदरणीय हिरामण सोनवणे सरांचं स्वप्न आहें!त्यांचा आवडीचा विषय गणितास सहज सोफ्या पद्धतीने विध्यार्थीप्रिय करायचं!खेडेगावातील विध्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं नाही, असं त्यांचं म्हणणं आहें!!गणित आवडता विषय होऊन जावा!गणित विध्यार्थीप्रिय व्हावा यासाठी इयत्ता आठवी तें १२वी सायन्स पर्यंतचा "गणित" विषयाची मांडणी अतिशय सोफ्या पद्धतीने करून u tube  चॅनेलवर उपलोड करतं आहेत!

गावागावात वेळ मिळेल तेव्हा गणित विषयांचे अनेक सेमिनार घेत आहेत!अनेक शाळां-कॉलेजमध्ये मार्गदर्शन करीत आहें!हे समाजाप्रती असलेलं ऋण फेड आहें!आई-वडिलांचे सुसंस्कार!लहानपणी स्वतःला कॅरियर गाईडन्स मिळालं नाही!इतरांसाठी आपण पुढे होऊन महान कार्य श्री. हिरामण सोनवणे सर करीत आहेत!बालपणी जे स्वत ला नाही मिळाल तें अनेकांना मिळण्यासाठी धडपणारें हे ४०वर्षांचं तरुण व्यक्तिमत्व "मोटिवेशनल कॅरियर गाईड" म्हणून कार्य करीत आहेत!!💐

जगणं सहज असतं
मरण सहज असतं
जगविणे कठीण असतं
 तें परीक्षा घेत असतं..!🌹

स्व:साठी जगणे असतें
इतरांना जगविणे असतें
जगता जगता जीवनात
कधी स्वप्न अंधारी दिसते!🌹

कधी डोळ्यात अश्रू आले
झेलूनी ओंजळीत नेले
ऋणानुबंधांच्या धाग्यानीं
....जगणे कृतकृत्य झाले!🌹

👏💐👏💐👏💐👏
**********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२३ऑगस्ट २०२३
हिरामण सोनवणे सरांचा संपर्क नं.८६०५००१६१७

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol