माझी आई अशीच आहें!(भाग-२४)
💐👏💐👏💐👏
माझी आई अशीच आहें
(भाग-२४)
💐👏💐👏💐👏
********************
... नानाभाऊ माळी
आई विठ्ठलाचा हात
आई पुंडलिक वीट
आई ममतेचं नातं
आई जन्मोजन्मी साथ!🌷
आई दिव्यातील वात
जळूनी जोडतेय नातं
आई जनाईच जातं
दळीत सुख दुःखे गातं!🌷
आई नात्यांचाचं धागा
हृदयी विनतसे जगा
शुद्ध वाहतें चंद्रभागा
आई विठ्ठलाची जागा!🌷
श्रद्धाज्ञच्या अधीन राहून मातृ-पितृ सेवेचा लाभ उठवणाऱ्या पुत्रास श्रावण बाळ म्हणतात,भक्त पुंडलिक म्हणतात!त्यांची सेवा हृदय अर्पित होती!जीवन अर्पित होती! सर्वस्व समर्पित होती!साक्षात साक्षात्कारी ईश्वराला देखील ताटकळत राहावं लागले होतें!असें सुपुत्र युगायुगातील पानांवर आदर्श पुत्र म्हणून आपलं नाव कोरून आहेत!आई-वडिलांच्या आशिर्वादामुळे ईश्वर कृपाभिलाषी दानपात्र ठरले आहेत!आई-वडिलांची सेवा हृदयातून,काळजातून झाली असेल तर जगनिर्माता ईश्वर देखील जगन्मातेला शरण जात असतो!अशी जगन्माता घराघरात असतें!आपण तिची ओळख करून घेत असतो!आई ईश्वरी रूपाची जाणीव पदोपदी होत असतें!संकेत मिळत असतांत! जन्मदात्री आईच्या ऋणात आपण जन्मोजन्मी राहात असतो!प्रत्येक सुपुत्रास दररोज आई नावाच्या ईश्वरी रूपाचं दर्शन होत असतं!माझी आई अशीच ईश्वरीरूप आहे!💐
आई मुखातील घास असतें!आई टोपलीतील गोड भाकर असतें!आई घरातील हाक असतें!आई डोक्याच्या केसातील चमचमणारे तेल असतें!आई अंघोळीची मोरी असतें!बादलीतील पाणी असतें!आई क्षणोक्षणी पळणारी सावली असतें!
आई साडीचं पदर टोक असतं!आई चालतं बोलतं विश्व असतें!आई हक्काचं खेळणं असतें!आई लुटूपूट भांडायचं ठिकाण असतें!आई धागे जोडत जाणारी ममतामयी कैवल्यमूर्ती असतें!आई नारळातील गोड गोड पाणी असतें!सर्वांची आई अशीच असतें!माझी आई अशीच आहें!💐
आपण कामानिमित्त कुठेही बाहेर असलो तर आईचें डोळे सतत आपल्या मागावर असतात!आपल्या पाठीशी असतांत!डोळे सतत पाठलाग करीत असतात!आपल्याला सतत जाणीव होत असतें!आपण अनेक प्रसंगी संकटात सापडल्यावर आई नावाचं संकेतस्थळ ईश्वराकडे जोडलं जातं असतं!ती मुलांच्या सुरक्षेसाठी ईश्वराकडे दान मागत असतें!मुलांसाठी देवाला साकडे घालीत असतें!आपल्यासाठीचं दिवस-रात्र पाहणारी!चंद्र-सूर्य मोजणारी आई!जगात सर्वात श्रेष्ठ असतें!💐
आई ईश्वर नावाच्या पित्याकडे मुलांचं जीवनदान मागत असतें!तिच्याचं पुण्याईने कित्येक अतिप्रसंगातून आपण बाहेर पडत असतो!हा ईश्वरी संकेत असतो!आईच्या सेवेत आपले काही क्षण थोडेसे खर्च केलें तर तिचे लाखमोलाचे आशीर्वाद आपलं जगणं सुकर करीत असतात!मुलांच्या जन्मापासून आई आपलं आयुष्य पणाला लावीत असतें!आईने केलेल्या उपकारास आपण जागलें पाहिजे!जन्मदात्रीच्या उपकाराची थोडेफार ऋण फेडता आलं पाहिजे!आईला कधीही न दुखविणे!तिला आनंदात ठेवणे!तिच्या वृद्धापकाळी आपणचं 'आई' अन सेवेकरी दाई झालो तर आई नावाच्या दैवताचें ऋण थोडेफार फेडता येत असतात!प्रत्येक व्यक्ती जन्मानंतर वृद्ध होणारचं असतो!आपण बाळ असतांना आईने कापसा पेक्षाही अधिक जपलेलं असतं!ती फक्त "आईचं " असतें!त्याचं आईची सेवा आपण तिच्या वृद्धापकाळी "आई" बनून केली तर आपल्याला पुण्याचा लाभ कित्येक पटीने मिळतं असतो!प्रत्येक सुपत्रांची आई अशीच असतें!माझी आई आज रोजी १०० वर्षांची आहें!आई आहें तशीच आहें!आईचे ईश्वरी आशीर्वाद सतत मिळतं राहावे हेचं मागणे मागत असतो!माझी आई अशीच आहें!💐
आई-वडील त्यांच्या अपार कष्टातून मुलांना स्वतःच्या पायांवर उभे करीत असतात!त्यातील काही मुलं विदेशात जाऊन आपलं आयुष्य सुखकर करीत असतात!येथे हे अभागी आई-वडील मुलांच्यां प्रेमासाठी तडफडत असतात!प्रेम पैशातून मिळतं नसतं!काळजाचे बोल अन नात्यांचा ओलावा कामास येत असतो!आयुष्याची संध्याकाळ ज्यांच्या सोबतीने घालवायची तें दूर गेलेले असतात!आईची सहन शक्ती खूपचं अधिक असतें!पण वडिलांना ही घुसमट सहन होत नसतें!तें कोलमडून पडतात!अन जगाचा निरोपही घेत असतात!आई सहनशक्तीची मूर्ती असतें!💐
जेव्हा अभागी आई एकटीच अंधार खोदीत,उजेड शोधू लागते!सर्वं करूनही वृद्धापकाळी दुःख सहन करीत जगत राहते!अशी आई सहन शक्तीचं मूर्तिमंत उदाहरण असतें!कधी ऐसपैस घरात एकटीच जगत असतें!कधी वृद्धाश्रमात जीवन कंठीत असतें!उतार वयात, रुद्धापकाळी आईला भोजना ऐवजी मायेचा ओलावा अधिक हवा असतो!अशा मातेस प्रेम देत जगण्याची शक्ती निर्माण करणारी अनेक माणसं या जगात आहेत!ऊर्जास्रोत असणाऱ्या या व्यक्ती जेष्ठानां भेटून त्यांच्या समस्येचं निराकारण करीत असतात!कित्येक घरात एकटीच राहणारी 'आई' आयुष्याची संध्याकाळ पाहात जगत असतें!अशा सर्वं माझ्या मातांना वंदन करतो!आम्हीं भाग्यवान आहोत,आम्हाला आई जवळ असलेल्या विशाल अनुभवाचं भांडार खुले असतें!आई तो साठा संपवत असतें,वाटतं असतें!आपण ही आईजवळ असलेल्या अशा सोनेरी क्षणांचा लाभ घेत असतो!मी देखील आईच्या जुन्या अनुभवांची शिदोरी उघडून आनंद घेत असतो!माझी १०० री पार केलेली आई,दात नसले तरी प्रसन्नपणे हसत असतें!पुढील अनेक वर्षांसाठी अशीच हसत राहावी अशी माझी आई आहें!💐
बीडला एका मातेचं निधन झालं होतं!मी ही वर्तमान पत्रात ही बातमी वाचली!आईचं अल्पशा आजाराने निधन झालं होतं!अति दुःखात संपूर्ण कुटुंब बुडालं होत!आई-वडील घराच्या रथाची दोन चाके असतात!त्यातील एक चाकं निखळलं होत!आई सतत तिच्या मूळ स्वरूपात समोर राहावी म्हणून त्या माऊलीच्या मुलांनी सिमेंट, लोखंड, आई विशिष्ठ साच्यात आईची पाचं फुटाची सुबक अशी मूर्ती बनवून घेतली!अन आईचं मंदिर बनवून मूर्ती स्थापित केली!आईचं मंदिर बांधणारी ही भाग्यवान मुलं म्हणजे श्रावण बाळाच्या मार्गांवर चालणारी आदर्श मुलंचं आहेत!घराघरात अशी मुलं असतील तरी आईला निराधार व्हावे लागणार नाही!मुलांसाठी झिजता झिजता देह ठेवणारी माता देवीस्वरूप असतें!सतत आत्मास्वरूपी आपल्या हृदयात वसलेली असतें!आईची पूजा नित्य होत राहावी!संस्कारी शाळेच्या कुशीत राहण्याची संधी मुलांना मिळतं राहिलं!सर्वांची आई अशीच असतें!माझी आई देवाने पाठविलेलं महान दैवतं आहें!तिच्या पायांवर डोकं ठेवायला मिळतं आहें हेचं भाग्य आहें!💐
आई चंद्राचा उजेड
देई शितल प्रकाश
आई आभाळाची उंची
होई ठेंगणे आकाश.!🌷
वाहातं निर्मळ पाणी
आई पाण्याहून दानी
गुंजे देव्हाऱ्यात सूर
आई मंजुळ ती वाणी!🌹
कधी ओलवितें कडा
आई डोळ्याचेंही घर
पापनी लावतेय दार
...दुःख सोसती भार!🌹
आई जन्माचेही मूळ
आई श्वासाचा उगम
धमणी खाली वर होई
..आई प्राणाचा संगम!🌷
👏🌹🎂🌹👏🌹👏🌹
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२१ऑगस्ट २०२३
Comments
Post a Comment