माझी आई अशीच आहें(भाग-२३)

💐👏💐👏💐👏💐
माझी आई अशीच आहें
        (भाग-२३)
💐👏💐👏💐👏💐
**********************
... नानाभाऊ माळी 

.....रोज सकाळी मी पाहात असतो!सुनबाई लहानशा 'श्री'ला,नातूलां गरम तेलाने चोळून छानपैकी मालिश करीत असतें!तेल अंगात चांगली भिजू देते!अंगात मुरू देते!नंतर त्याला आपल्या पायांवर झोपवते!नंतर काही वेळाने कोमट-गरम पाण्याने अंघोळ घालते!'श्री'ओरडत असतो!तोफांड करीत असतो!गरम पाण्याने अंघोळ घालून अंग शेकलं जातं असतं! काही वेळाने छानशी डुलकी येते!'श्री' झोपेच्या अधीन होतो!झोक्यात छान झोप घेत असतो!'आई' बाळासाठी सर्वं काही करत असतें!ममतेने,काळजाने, प्रेमाने करीत असतें!नंतर ही मुलांचं सर्वं काही करीत असतें!💐

मी लहान होतो!आईने माझ्यासाठी किती किती त्रास सहन केला असेल! वत्सल्यानें,प्रेम भावनेने,ममतेने मुलांची काळजी घेणारी,मुलांना सतत जपणारी आई जगात महान असतें!श्रेष्ठ असतें!आई आत्मविश्वास असतें!दुसरी आई आपल्या जन्मातं कधीच मिळणारी नसते!आई एकचं असतें!आपल्या सर्वस्वाची पूर्णरूपी माता असतें!आई त्यागाचं मूर्तिमंत उदाहरणं असतं!आईस आपल्या जन्म श्वासांपासून अंत श्वासांपर्यंत अतिशय काळजीने जपायचं असतं!आई आपली देहदात्री असतें!आईचे ऋण जन्मोजन्मीचं असतात!आपण मोठे होतो!पुढे तिच्यासाठी आपण थोडासा जरी उतरायी झालो तरी आई आनंदी,सुखी होतें!तिचे आभाळा एवढे उपकार असतात!तीं आभाळा सारखीचं माया करते!आशीर्वाद देत असतें!

बाप जेव्हा कठोर होतो,
तेंव्हा मृदू होतें आई!
पोटचा गोळा कुशीत,
घर रांधु लागते आई!🌷

बाळ जेव्हा मृगजळ होतं,
अश्रू शोधू लागते आई!
आईची हो ममता कोमल 
स्वप्न बांधू लागते आई!🌷

राबत असतं हळवे मन
 सक्ती लादू लागते आई!
हळव्या कोवळ्या भावनासं 
...मग भेदू लागते आई!🌷

आईचं मोल जाणणारं,जपणारं, आईचा विश्वास असणारं!आईला स्वर्गाहून पृथ्वीलोकी पाठवणारें!आईला देवाहून वरच स्थान देणाराही देवचं असतो!देव आईच्या कुशीत येऊन बसतो,सुखावतो!बाल हट्ट पुरवून घेतो!आई देखील देवाचीचं जन्मदात्री अन श्रेष्ठ असतें!संस्कारदात्री असतें!बाल कृष्ण देवाचे लाड पुरवते!आपलं जीवन अर्पुनि आपल्या बाळाला जगवीत असतें!वागवीत असतें!वाढवीत असतें!म्हणूनचं आई स्वर्गाच्या सिंहासनावर बसलेल्या देवाची श्रद्धामाता असतें!जगन्माता असतें!वेदनेंवर ममतेचं औषध लावून,हळुवार फुंकर घालणारी कैवल्य स्वामींनी आईचं असतें!भावभावनांची,संवेदनांची ममतामयी जन्मदात्री असतें!घराघरात अशीच आई असतें!माझी आई देखील अशीच आहें!💐

बाईतून आईपणाचं खेळणं
........होतं असतें आई
  स्वतः झिजूनी आयुष्य 
चाळण होत असतें आई!🌷

दुसऱ्यां हाती जातं देऊनी 
दळण होत असतें आई
दाण्यामधूनी पीठ होता 
चाळण होत असतें आई!🌷

इतरांहाती देऊनी सत्ता
हतबल होऊनी बसते आई 
राब राब राबूनी सरते 
आत्मबल हरत असतें आई!🌷 

घरासाठी आहुती देत,
आतुनी जळतं असतें आई!
मुलांसाठी सरपण होऊनि 
स्वप्ने तळत असतें आई..!🌷

आई ब्रम्हसकाळ असतें!तिला पाहून कमळही हसतो!आईचा हसरा, निर्मळ,मोहक मुखडा पाहात सूर्यदेव उगवत असतो!अशी कशी हो आई असतें?स्वर्गद्वार ही हसरे असतें!माथा ठेवून देव उठतो!तिच्यासम कुठले दैवत दुसरे?स्वर्गाचीही बाग हसरी असतें!पण 'आई सारखी' कनवाळू नसते!आईचे शब्द चिकटतात जेथे तेथे गोड वाणी हसत असतें!कधी डोळ्यात भरुनी घ्यावे आईस!चरणावरी तिच्या लीन व्हावे!आयुष्य आपुले आईसं दान द्यावे!अहो,आई असतें फुलांचां सुगंध!गंध गंधित करीत असंते!गंध असतो चंदनाचा!आई देव्हाऱ्यात दरवळत असतें!आई असतें घराची हिरवळ!पसरवीत जाते चंदणीफुलं वेल दरवळ!निर्मळ,स्वच्छ श्वास देतें घराला!कच्चे-पक्के येती बहराला!जगात आई अशीच असतें!दुःख स्वतः शोषित असतें!अमृतघडा घेऊन आई जागोजागी उभी दिसते!अमृत थेंबे थेंबे पीत जावे!आयुष्य आपुले वाढवूनी घ्यावे!आईलाही थोडे आपुले जीवन द्यावे!

माझी आई अशीच आहें!रोज क्षणोक्षणी खोल हृदयात आहें!अहो माझ्या जन्मावर ऋण आईचेच आहे! सकाळ उठूनी नतमस्तक व्हावे! आशीर्वाद घेत ऋणातचं राहावे!'आई' ऋणांचे चढलेतं मजले!थोडी सेवा करून उतरायी व्हावे!आश्रुतुनी आई तुझे पाय धुवावे!अशीच असतें आई घरात!माझी आई अशीच आहें!💐

म्हतारंपणाची काठी हाती
 अश्रू गाळीत असतें आई
नाती गोती असुनी सारे
कुठल्या पळीत दिसते आई?🌷

असा कसा रें जन्म मानवा
मागे पळत बसतात बाई
बेंबीची जी नाळ कापते
मुलं टाळत असतात आई!🌷

पुत्र असतो आधार काठी
आश्रय बाधित असतातं आई
पुत्रांसाठी जन्म ओवाळते
मुलं टाळत असतात आई!🌷

मी कोठून आलो मला माहीत नाही!पण आईने जन्म दिला हा माझा गौरव आहे,सन्मान आहें!माझ्या आईसाठी माझं जीवन गहाण आहें!मी खूप खूप लहान आहें!मला पूर्णतः भान आहें!... आई माझं जीवन आहें!माझी आई अशीच आहें!💐
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१६ऑगस्ट २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)