धोंडा!अधिकचा आनंद
धोंडा!अधिकचा आनंद
💐🌷🌹💐🌷🌹
******************
... नानाभाऊ माळी
धोंडा!चालतांना कुठेतरी अडखळतो,ठेचकाळतो,थांबतो!मध्येच अडथळा होऊन उभा राहतो! हा धोंडा असतो का मग ? समजा चार वस्तूंची मागणी केली,चुकून पाचवी वस्तू आपल्याकडे जास्तच आली तर?तीं वस्तू अधिक असतें!तसंच आपण एका वर्षाचे १२महिनें मोजतो!कधी ३० दिवसांचा महिना असतो तर कधी ३१दिवसांचा असतो!तीन वर्षांनी एक महिना अधिक भरतो!असा हा धोंडा!१२महिन्यांमध्ये एक वाढतो,१३वा होतो!एक महिना अधिक होतो!हाच तो धोंडा,हाच अधिक मास!हिंदू कालमाननुसार, कॅलेंडर प्रमाणे येणारा हा महिना विष्णू देवास समर्पित असतो!चैत्र महिन्या पासून फाल्गुण महिन्या पर्यंत मोजदात होतें!अधिक मासास, मग पुरुषोत्तम मास देखील संबोधित करतात!
२०२०साली धोंडा आला होता!या वर्षी धोंडा हा श्रावणाच्या अलीकडे आला!अधिक श्रावण म्हणून आला पावसाळ्यात चिंब भिजवणारा, निसर्गपिसारा फुलविणारा "धोंडा" मन अन तनासही आनंद देतं आहें!झिमझिम पावसामुळे शेतीतं उभे असलेलं पिकं डोळ्यांचं पारणें फेडीत आहेत!मन आणि डोळे सुखावून जात आहें!नद्या,नाले खळखळ वाहात असतात!पण अजून तरी पावसाने ओढ दिलेली आहें!पावसात हा आनंद सोहळा हिरवाईनें लेवून,खाणाखुणा करून बोलावीत असतो!सर्वांना बोलावीत असतो!श्री विष्णुसाठी व्रत वैकल्य मास म्हणून ही संबोधित केलं जातं!व्रतानें शरीर आणि मन शुद्धी होतें!उत्तम आरोग्यासाठी व्रत वैकल्य केल्याने मन आणि तनाची शुद्धी होतें, शरीराची निगा राखली जाते!असं मानतात!धोंड्याला धोंडे करतात!
"धोंडा" झिमझिम पावसाला,गार वाऱ्याला,खळाळत्या उत्साहाला बोलवीत असतो!नात्या-गोत्यातील स्नेहीजनांना बोलवीत असतो!सुखाने भिजवणाऱ्या क्षणांनां बोलवीत असतो!निखळ,हसऱ्या बाल गोपालांना बोलावीत असतो!"धोंडा" सासरी दूर गेलेल्या मुलीला बोलावीत असतो!जावयांना बोलावीत असतो!
मुलीचं सुखं सासरी असतंच!पण मुलगी आणि जावयांनां आदर सत्कारासाठी सन्मानाने आमंत्रित करून,त्यांच्यासाठी गोड-धोड पाहुणचार केला जात असतो!जावयाचा सत्कार,सन्मान आपल्या ऐपतीप्रमाणे "वाण"लावून केला जात असतो!दर तीन वर्षांनी येणारा धोंड्याचा महिना आनंदाची मेजवानी देतं असतो!💐
अनेकजन आपल्या मुली अन जावयांनां या अधिक मासात,या धोंड्याला बोलावून परंपरेला शोभेल असं 'वाण' देतं आहेत!पुण्य पदरी पडतं असं म्हणतात!हा मनाचा समाधान सोहळा आहें!या निमित्ताने दूर सासरी गेलेल्या मुलीला भेटण्यासाठी बोलावणे देखील होत!पण यावर्षी,या धोंड्यात तांब्या, पितळी भांड्यांना प्रचंड मागणी वाढली आहें!भांडी महाग आहेत!विकत घेणारा परंपरेच्या जोखंडात आहें!गरीब देखील इकडून,तिकडून उसणवारी घेऊन मुलगी-जावयांचं आदरातिथ्य करीत आहेत!💐
आनंद पैशातं मोजता येतं नसतो!आपली भावना शुद्ध असेल तर तिखट-मिर्ची, भाकरी अन थोडा गव्हाच्या पिठाचा शीरा आपल्या आलेल्या पाहुण्यांना,जावाई-मुलीला खाऊ घातले तरी श्री हरी विष्णू भगवान पर्यंत पोहचत असतं!मुलगी -जावाई देखील आनंदी राहतील!आपला "धोंडा" बत्ताशे,अनारसे, कपडे,साड्या,बच्चे कंपनीला ड्रेस, सोबत तांब्या पितळाची भांडी जावाई-मुलीला देऊन "धोंडा" साजरा करीत आहेत!💐
"धोंडा"आनंदी असावा!श्रीहरीला शुद्ध भावाने पूजावं!विष्णूरूपास अंतर्मनाने भजावे!खर्च आटोक्यात असावा!धोंडा साजरा करतांना,कर्ज काढून मुलगी-जावाई यांचा सन्मान केला तर आतला आनंद कोमेजून जाईल!वर वर आपण आनंदी दिसू पण महागडी तांब्या-पितळीची भांडी घरात फक्त शोभेच्या वस्तू म्हणून गणल्या जातात!आपण घेतलेली भांडी कितीदा वापरासाठी काढली असतील बरं?वर्षानुवर्षे वळचनीवर, पोटमाळ्यावर धूळ खात पडलेली असतात!तांबे तर काळ व्हायला लागतं!आई-वडील,मुली-जावाईसाठी मोठया हौसेनें घेतलेल्या वस्तू घरात नुसत्या अडगळ होऊन पडलेल्या असतात!पण हा आई-वडिलांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतं....पण मुलगी देखील मोठया अभिमानाने सांगत असतें,"अहो पाहिलं का त्या पोटमाळ्यावर पडलेली पितळी घागर, माझ्या माहेरहून धोंड्याच्या महिन्यात घेतली होती!"🌷
अधिक येणारा महिना!अधिक आनंद देऊन जाणारा असावा!निखळ आनंद देणारा असावा!व्यापारी नसावा!मन व्यापारानें व्यापलं तर आनंदाची व्याप्ती मर्यादित राहिलं!मुलगी जावयांचा आदर सन्मान त्यांचं लोभी मन जिंकण्यासाठी करू नका!त्यांच्यातील माणुसपणाची ओळख टिकविण्यासाठी करावा!लोभ परीघबाहेर जात नसतो!अमर्याद आनंदासाठी प्रेमाचे गोड शब्द हृदयात वसवून जावे!हा आनंद चिरकाळ टिकणारा असेल!असा हा धोंडा साजरा करूयात!अधिक मास साजरा करूयात!सुखं पेहरीत आई वडील आणि सासू-सासऱ्यांना देखील बेंबीच्या देठापासून आनंद होईल असा हा "धोंडा" विष्णू देवास अर्पित करू!शुद्ध मनाने वाणाचा महत्व जाणून घेऊ!हाच तो "धोंडा"असावा असं माझं मत आहें!दर तीन वर्षांनी आनंदाची उधळण करीत येणाऱ्या, जाणाऱ्या धोंड्या निम्मित अनेक हार्दिक शुभेच्छा!
🌷🌹🌹🌷🌷🌹🌹🌷🌹
***************************
.. नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-११ऑगस्ट २०२३
Comments
Post a Comment