चला जाऊया गड किल्ल्यांवर (महादजी शिंदे किल्ला)
चला जाऊया गड किल्ल्यांवर
(महादजी शिंदे किल्ला)
⚔️🚩🏹🏹🚩⚔️🏹🚩
************************
... नानाभाऊ माळी
दूर दूर उंच डोंगरावर!डोंगराच्या कुशीत!घनदाट जंगलाच्या सानिध्यात!निसर्गाच्या सानिध्यात!निसर्गाच्या कुशीत!मानव सानिध्यापासून दूर, मानव घुसखोरी पासून थोडं दूर असं ठिकाण गड किल्ल्यावर हमखास जाण्याचीं हिम्मत,धाडस दुर्गप्रेमी दाखवत आहेत!किल्ल्यांमुळे निसर्गाशी एकरूप होतो!प्राचीन अस्तित्वाची ओळख होतें!आनंद घेता घेता तेथील इतिहासाशी आपण बोलू लागतो! निसर्गाशी बोलू लागतो!निसर्ग आणि किल्ले बोध देतं असतात!आपण गड किल्ल्यातून इतिहासातील घटनां पर्यंत पोहचत असतो!⚔️🚩
गर्वाने जिथे छाती फुगतें!पदोपदी
स्वअस्तित्वाच्या लढाईसाठी रक्ताचे पाट वाहिले!शौर्याचीं गाथा जेथून लिहिली गेली!पाझरतं पुढील पिढीपर्यंत पोहचली!पराक्रमाची शायरी आणि पोवाडे जेथून गायिले गेलेतं!जिथून सळसळणाऱ्या रक्तातून इतिहास जन्माला आला!जेथून प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अस्तित्वासाठी बलिदान देणाऱ्या विरांची स्मृती स्थळ आहे!पराक्रम करीत असतांना देह ठेवणाऱ्या विरांची शौर्यगाथा जेथून सुरुवात झाली त्या ठिकाणाला किल्ला म्हणतात!गड म्हणतात!दुर्ग म्हणतात!🏹⚔️🚩
तलवारी,भाले,ढाली, तोफा,
तोफगोळ्यांनी लढाया लढल्या गेल्या!जिंकल्या गेल्या!जेथून राज्यकारभार हाकला जात होता!त्या भक्कम तटबंदी असलेल्या ठिकाणाला किल्ला म्हणतात!गड म्हणतात!दुर्ग म्हणतात, गढी देखील म्हणतात!काळ बदलला!राज्य करण्याची पद्धत बदलली!किल्ला तिथेच राहिला!त्याचं अस्तित्व टिकून कित्येक शतकं पडक्या अन डागडुजी च्या अवस्थेत उभी आहेत!कित्येकांची जीर्ण शिर्ण अवशेष अजूनही उभी आहेत!⚔️🏹🚩
माणसं आणि राज्यकर्ते काळासोबत गेलीत!त्यांचा इतिहास मागे ठेवून निघून गेलीत!काही राजे प्रजेचा आत्मा होतें तर काही शोषक म्हणून इतिहासाच्या पानावर ठळक दिसतं आहेत!राजेशाही कधी हुकूमशाही झाली तर काही राजे प्रजेसाठी विधायक कार्य करून सुवर्णजडीत पानावर नाव कोरून निघून गेलीत!काही राजांसाठी गर्वाने आपली छाती फुगू लागते तर काही राजांच्या शोषक वृत्तीचा काळा इतिहाचीं प्रचंड चीड आपल्या धमणीत सळसळू लागते अन जन्माला येतो तो जीवंत सुडाग्नी!तो साधा नव्हे!होरपडून काढणारा असा!जाज्वल्य राष्ट्रप्रेम, देशप्रेम,धर्मप्रेम त्यासाठी आपलं बलिदान झालं तरी देशासाठी अशी स्वप्न पाहणारी पिढी होती याचा अभिमान आणि गर्व आहे!🚩
किल्ला राज्याच्या अस्तित्वाचीं ठळक निशानी असतें!किल्ल्यातील राजकारण!शत्रूशी राजकारण!शत्रूशी वाटाघाटी!त्यातून ईर्षा,महत्वाकांक्षा, फंद-फितुरी!प्रचंड जाडीच्या अन प्रचंड उंचीच्या भिंतीच्या आतील हा चढ-उताराचा सत्ता संघर्ष म्हणजेचं अभ्यद्य तटबंदीच्या आतील लढाई होती!बुद्धीचातुर्य,शक्तीच्या या खेळात भिंतीचीं घुसमटणारीं दगडं देखील साक्षीदार होती!अनेक सत्ताधिशांच्या पिढ्या पाहिलेल्या किल्ल्याचीं पडकी अवशेष साक्षीदार आहेत!राजे गेले!अनेक पिढ्या गेल्या!पडझड झालेले किल्ले आता इतिहासाची ओळख म्हणून आपलं अस्तित्व टिकवून आहेत!असाच एक भुईकोट किल्ला पाहण्याचा योग आला!⚔️🚩
आज दिनांक ३०जुलै २०२३ रोजी "चला जाऊया गड किल्ल्यांवर" या मोहिमे अंतर्गत आयोजक आणि सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय वसंतराव बागूल सरांनी चंदन नगर, पुण्याहून महाराजा माधवराव शिंदे या भुईकोट किल्ल्यावर किल्ला सहन नेली होती!महाराजा महादजी शिंदे किल्ला हा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे!नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील जामगांवात हा भुईकोट किल्ला आहे!साधारण इ स १७७०मध्ये महाराजा महादजी शिंदे यांनी बांधला असावा!भक्कम तटबंदी असलेला अन जवळपास ८७ एकरात बांधलेला हा ऐतिहासिक किल्ला त्यावेळेस महाराष्ट्रात दुसरी राजधानी बनावी म्हणून महाराजा महादजी शिंदे यांनी पेशवाईच्या काळात बांधला असावा!⚔️🚩
भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्याची भिंत जवळपास तीन फूट रुंदीची आहे!दगडचून्यात बांधलेला हा किल्ला भुईकोट असला तरी संरक्षण दृष्ट्या अतिशय महत्वाचा होता!बाहेरून भक्कम भिंत असलेली आणि आतून देखील किल्ला पूर्णतः सुरक्षित आहे!भक्कम लाकडी दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर आतील वैभव लक्षात येतं!किल्ल्याच्या दरवाज्याबाहेर अतिशय खोल खुपचं रुंद आणि त्याकाळातील काळ्या पाषाणत बांधलेली विहीर आजही जशीच्या तशी आहे!विहीर म्हणजे पाण्याचा स्रोत किल्ल्यातील राजवड्याच्या सर्वं खोल्यात पोहचता आहे!🚩
४०० वर्षां नंतर देखील आतील राजवाडा सुस्थितीत आहे!आतील खोल्यांचं छत कदाचित सागवानी किंवा सिसम सारख्या टिकावू लाकडा पासून बनविलें असावं!४००वर्षांचा इतिहास लाभलेला हा किल्ला आतून सुद्धा चुना वापरून बांधलेला आहे!🚩🏹⚔️
सर्वं खोल्या अतिशय सुस्थित अवस्थेत आहेत!जामगांव पासून एक किलोमीटर लांब असलेला हा किल्ला!महाराष्ट्राचं वैभवी परंपरेतील एक आहे!किल्ल्याच्या बाहेरील(भिंती) तटबंदीच्या आत दोन प्राचीन मंदिरे आहेत!राम,लक्ष्मण, सीता या तिन्ही दैवतांच्या एकत्रित मूर्ती असलेलं हे प्राचीन मंदिर आहे!समोर हनुमानाची रामभक्ती प्रकट करणारी उभी मूर्ती आहे!दुसरं प्राचीन मंदिर विठ्ठल-रखुमाईचं!... पेशवेकालीन आराध्य दैवतं असणारी ही श्रद्धास्थाने भक्तीची ओढ निर्माण करणारी आहेत!🚩🏹⚔️
किल्ल्याच्याचा दरवाजा उघडल्यावर त्याच प्राचीन खोल्यांमध्ये आता रयत शिक्षण संस्थेचे जुनियर कॉलेज आणि डी एड कॉलेज आहे!कदाचित हा किल्ला आणि परिसर शिंदे घराण्याने रयत शिक्षण संस्थेला दान दिला असावा!राजशाहीच वैभव पाहिलेल्या किल्ल्यातून सध्या ज्ञान दानाच महान कार्य होतं आहे!
तटबंदीचीं तूटफूट झाली असेल, ढसाळली असेल तरी आतील किल्ला अजूनही सुस्थित आहे!
इतिहाच्या पानावरील ठळक नोंद असणारा,राजसत्तेचं प्रतीक असलेला!किल्ला पाहण्याचं भाग्य लाभलं!किल्ला स्फूर्तीचं प्रतिकं आहेत!आमच्या गर्वाची प्रतिबिंब आहेत!किल्ला आमची अस्मिता आहे!किल्ला आमच्या रक्तात उसळणारा इतिहास उगळतं असतो!आम्हीं किल्ल्याच्या इतिहासाची पाने उघडली तर कधी रक्तरंजित दिसतात तर कधी डावपेचानी,कुठनीतीने धोका देऊन राजसत्ता बळकावलेली दिसते!आम्हाला गर्व होतं असतो छत्रपती शिवरायांचा ज्यांच्यामुळे आमचा धर्म आणि देश शाबूत राहिला!🚩🏹⚔️
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसत्तेतील पेशवाईतील शूर योद्धा!पराक्रमी सरदार महाराजा महादजी शिंदे यांच्या किल्ल्याचं वैभव यांच डोळ्यांनी पाहता आलं! शौर्याची, पराक्रमाची पानं वाचत असतांना प्रत्यक्षात किल्ला पाहता आला हे आमचं भाग्य होतं!🚩🏹⚔️
किल्ला पाहून आम्हीं महाराष्ट्रातील आदर्श ग्रामपंचायत हिवरे बाजार येथे गेलो!अवघ्या १५०० लोकवस्तीच हे गाव,एकेकाळी अतिशय दुष्काळी,पाण्याचं दुर्भीक्ष असलेलं गाव आज तेथील विकास कामांची पाहणी केली असता सरपंच पोपटराव पवार यांचं महान योगदान असल्याच पदोपदी जाणवतं!त्यांना गावाच्या आदर्श विकास कामांसाठी पदमश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे!असं आदर्श गाव पाहण्याचंही भाग्य आम्हाला मिळालं!किल्ल्यांचा इतिहास जपतांना आदर्श गावाचं दर्शन करता आलं!🚩🏹⚔️
माणूस आनंद देणासाठीच जन्मावा!दुःखाची ओझी वाहात सुखाच्या शोधासाठी निसर्गाच्या सानिध्यातील अनादी अनंत सुख शोधत आम्हीं देखील आज सुखाच्या गावी जाऊन यशस्वी सहलीला जाऊन आलो!
🏹⚔️🏹⚔️🚩🚩🏹⚔️🏹
****************************
👏🚩👏🚩👏🚩👏🚩👏
.... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-३०जुलै २०२३
Comments
Post a Comment