चासकमांनचां श्रावण
चासकमानचां श्रावण
🌧️💦🌧️💦🌧️💦
*******************
(भाग-०१)
... नानाभाऊ माळी
चिंब चिंब भिजवूनी धरती
खट्याळ श्रावण हळूच येतो
सरी वर सरी बरसती धारा
पाणी नदीवर वाहूनी नेतो!☔
अंघोळीला बसली धरणी
लंपट श्रावण चुंबन घेतो
अंतरंगी ही चिंब भिजली
पाऊस अंग धुवूनी देतो!☔
असा लागतो मागे चावट
पाऊस जंगली होऊनि येतो
प्रेमजाळ्यात ओढतो श्रावण
सृष्टीचं काळीज घेऊनी जातो!☔
बरसुनी धारा चिंब भिजतें
सरसर खळखळ कानी येतो
डोंगर दऱ्यातला मंजुळ नाद
अवघा श्रावण मानी होतो!☔
पक्षांचा होतोय मंजुळ नाद
सृष्टीस वारा कवेत घेतो
रोम रोमात मोहरली धरती
दूर वल्हवीत नावेत नेतो!☔
२३जुलै२०२३चां दिवस उजाडला होता!सूर्य दर्शन न होताच चौफेर उजेड पडलं होतं!श्रावण छत्री बाहेर टपटपतं होता!ढग दाटीवाटीने आकाशातल्या वर्गात बसली होती!एखादा दुसरा ढगाचा तुकडा हळूच वर्गाबाहेर पडून लघुशंका करीत होतें!आकाशाचा वर्ग पूर्ण पटसहित उपस्थित होता!वर्ग शिक्षक श्रावण सर होतें!शिक्षक कडक शिस्तीचे असल्याने,वर्गात ढग दाटीवाटीने बसले होतें!आकाश कोंदट झाले होतें!दाटीवाटीमुळे अंधारून आलं होतं!श्रावण सरांच्या भीतीने,छडीने वर्गातील घाबरलेलें ढग हळू हळू धरतीवर भुरभूरत होती!छत्रीलाही न जुमानता!ढग गळत होतें!🌧️
आम्ही श्रावण सहलीसाठी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चासकमान धरणावर निघालो होतो!३८सिटांची बस होती!सर्वचं कवी, कवयत्री होतें!शब्दांचे भोई होतें!स्वतःच्या कवितापत्य घेऊन श्रावण सहलीसाठी निघालो होतो!सकाळीच ०७-००वाजता हडपसरहून निघालो होतो!पुढे केशव नगर,खराडी, येरवडा,दिघी,विश्रांतवाडीहून एक एक शब्दहिरे बसमध्ये बसतं राहिले!बुद्धीतं सरस्वती ठेवून शब्दांकर बसत राहिले!सर्वांनी शब्दापत्य सोबती घेतले होतें!एकदाची विश्रांतवाडी ओलांडली आणि बस खेड-राजगुरूच्या दिशेने निघाली!प्रत्येक सारस्वताने शब्दओवीचं सुंदर फुलं आपल्या हृदयातंरी ठेवले होतें!बस पळत होती!कविचं तरल मन देखील बसच्या चाकांसोबत पळत होतं!काचेबाहेर श्रावण देखील धडशा मारत होता!🌧️☔
श्रावणाच्यां अंधार ढगानीं बसवर बरसण्यास सुरुवात केली होती!बसच्या पारदर्शक काचांतून बरसणारा पाऊस खरं म्हणजे सखा होता!त्याच्या सोबत मनसोक्त नाचवेसे वाटतं होतं!पण पारदर्शक काचा मध्येचं आडव्या आल्या होत्या!त्यात बस ड्रायवर बस थांबवत नव्हता!श्रावण सखासोबत चिंब भिजावंस वाटतं होतं!बाहेर माणसं, गाड्या,मोटरी,घरं,रस्ते अन कडेने झाडं दिसतं होती!☔🌧️
जातांना बस आळंदीतून गेली!बसमधूनचं ज्ञानराजाचं दर्शन घेतलं!अध्यात्माचा पाया रचनाऱ्या
भक्तकवी संतश्रेष्ठ ज्ञानमाऊलीचं दर्शन घेतलं!जगासाठी 'पसायदान' मागणाऱ्या वैष्णवभक्त ज्ञानेश्वर महाराजांच्यां अमृत इंद्रायणी सरीतेवरून जातांना मनोमनी पवित्र अंघोळ केली होती!मनोमनी एकचित्त होत ज्ञानियाच्या संजीवन समाधीवर माथा टेकवला होता!☔🌧️
बस आळंदीमार्गे चाकणच्या छोट्याशा घाटाला वळसा घालत वळणा वळणावरून पुढे सरकत होती!केळगावच्या घाटात कडेकडेने जंगली फुलांचा ताटवा फुलला होता!हिरवीगार झाडं वाऱ्याने अंग झटकून घेत होती!सौंदर्याचीं अनुभूती डोळे प्राशून घेत होतें!घाटाचा इंच इंच भू भाग हिरवाईनें फुलला होता!बसचं इंजिन दमदामाने श्वास घेत चाकांना पळवीत होतें!नागमोडी वळणं घेत घाट संपला अन काही मिनिटांनी पुणे नाशिकच्या महामार्गाला गाडी लागली!रस्त्यावरील प्रचंड गर्दीत आमची छोटीशी बस एकजीव झाली होती!साहित्यसम्राट कविंच्या ज्ञानपिपासू बुद्धीला नव खाद्य मिळालं होतं!बस पुढे खेड राजगुरूनगरच्या दिशेने पळत होती!महामार्गावरील गाड्यांच्या गर्दीत एकजीव झाली होती!🌷
(क्रमशः भाग०२मध्ये पुढील भाग पाहू)
💦🌧️☔💦🌧️☔💦🌧️
**********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनाक-२६जुलै२०२३
Comments
Post a Comment