श्रावन माझा भिजचारतं यावा

श्रावण माझा भिजवतं यावा
🌧️💦☔💦🌧️☔💦
***********************
... नानाभाऊ माळी

.....श्रावण आणि पावसाचं नातं अतिशय घट्ट असतं!पाऊस श्रावणाला लपेटून, कवेत घेऊन हिंडत असतो!धरतीच्या रोमारोमात कुंद नाचतं असतो!पाऊसचं तो!हिरवाईची सुरेख, सुंदर, मनमोहक चादर पांघरलेल्या सृष्टीची गंमतचं वेगळी असतें!सरी वर सरी पडतं असतात!धरतीला तृप्त करीत असतात!पाणी खळाळत ओढ्या-नाल्यातून,खाचखळग्यातून, बेटाबेटातून वाहात असतं!सृष्टी उमलू लागते!फुलातून,झाडातून हसू लागते!हिरवाई ओसंडून वाहात असतें!🌧️💦

श्रावण मन फुलवीत असतो!मन झूलवीत असतो!वारा हलवीत असतो!डोळे भुलवीत असतो!श्रावणचं तो!...कडे कपारीतून उंच उंच उड्या घेत,झरा होऊन वाहात असतो!डोंगर कड्यावरून उडी घेत ओसंडून धबधबा वाहात होतो!फेसाळून खोल दरीत उडी घेत खाली खाली जात असतो!दरीतून नागमोडी वळणे घेत पुढे पूढे वाहात असतो!

श्रावणचं तो!...ढगांच्या आड लपून सूर्य खुशाल घोडे विकून घोरत असतो!पाऊस खट्याळ जोरात असतो!सरिंची मोठी वरात येतें!सृष्टी भरात येतें!आईआतल्या माजघरात असतें!बापपुढे दारात असतो!.. श्रावणचं तो!...निसरड्या मातीत मन निसरडं निसरडं होतं जातं!चिंब भिजलेल्या घसरड्या मातीवर नातं घट्ट होतं राहतं!🌧️💦

कधी कधी ढगाचा पडदा सारून सूर्य मिचकाऊनी पाहात असतो!अधीर होतें धरती तेंव्हा बिलगूनी किरणे ओढूनी घेते!सरसर सरिंच्यां विसाव्याने उन सावल्यांचा खेळ पाहते!प्रेमाराधनेचीं सळसळ होतें!तृप्तीचे ती गीत गाते!छत्री कधी फुलासम फुलते!उघडूनि ओठ एक नाते होतें!विलग करील कोण श्रावणी? सरसर करुनी आली पाव्हनीं!वेली लपेटूनी सरसर चढती!झाडालाही मिळते बढती!उन सावल्या खेळ खेळण्या,आला श्रावण फुले माळण्या!चोरूनी घेतो हृदय त्यांचे!श्रावण मना मनात नाचे!

विशाल पात्रात नितळ अस्सल पाणी,वेडीवाकडी नागीण बनूनी सळसळूनी नदी वाहते!खडकावरी आदळूनी नदी मंजुळ ती गाते!पावसाळ्यातील प्रेम मिलाफ हा श्रावणाला भरती येते!काचेहूनही  पारदर्शी तें नदीतूनी सागराला जाते!श्रावणाचा सुंदर ठेवा सागरासं अर्पण करते!सागराच्या विशाल पोटात नदी आपुली ताल धरती!🌹💦

श्रावणाचा खेळ सारा,मना तनालां भिजवूनी जातो!अखंड हिरवाईचा साज मनाला आपुल्या चढवूनी जातो!कालचक्र हे फिरत राहते,रोज नवीन घडवूनी जातो!श्रावण आहे सप्तरंगी,सृष्टीला हिरवा साज चढवूनी जातो!लाटा धडकती काटावरती किनारा किनारे करती,चिवचिवाट पक्षांचा गोड आवाज देणारे वरती!अंग झटकुणी पाणी गळते, श्रावणाला सारे कळते!असाच श्रावण  हिरवा होऊनि हरणा मागुणी हरण पळते!💦🌨️

रानावनातला श्रावण पाहावा,बेधुंद होऊनि पाऊस यावा!अवघा ऋतू चिंब भिजावा!नेत्रातं आनंद पिऊन घ्यावा!.. मग असाचं श्रावण सरसर येतो!क्षणाक्षणांनी भरभर जातो!ऊन सावल्यांमधुनी हसतो!नदीकिनारी जाऊंनी बसतो!श्रावणही शेतात येतो!घोंगडी-छत्री भिरकाऊनी देतो!पिकं नाचती वाऱ्यासंगे,सरसर येत्या सरीसंगे!हालत्या-खेळत्या वेलीसंगे!बाजरीच्या पिकासंगे!असा श्रावण खेळतं यावा!गुरें-ढोरं वाळतं न्यावा!हट्टी बाळ-मुलांगंतं यावा!खोड्या करुनी निघूनी जावा!🌧️💦

माझा श्रावण असाचं येतो,आनंदाश्रू ठेऊनि जातो!डोळयांतूनि झरतो श्रावण!हृदयातंरी मुरतो श्रावण!.. असाच श्रावण चिंब भिजवितो!ढोल अंतरी वाजवितो!.. स्वप्नी असावा असा श्रावण!सत्यात माझा असाच श्रावण!.. हिरवळीचे दान देऊनी, भेटूनी जावा माझा श्रावण!
🌧️⛈️💦💦☔☔💦💦
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
         ७५८८२२९५४६
दिनांक-२४जुलै २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)