यंग्रटस्जारम्हा
यंग्रटंस्ना बजारम्हा
***************
🌹🌷🌹🌷🌹
.... नानाभाऊ माळी
.........माले रिटायर व्हयीस्नी एक वरीस व्हयी जायेल सें!कामले जाऊ तव्हय नेम्मन ठायबन गाडी पयेत ऱ्हाये!कामले लाग्नू तव्हयं तेंमी सायकलवर जातं ऱ्हावू!जितला पायडल मारु तितली सायकल पयेत ऱ्हाये!हॅण्डल धरीस्नी सायकल तंगाडतं ऱ्हावू!चाके पयेत ऱ्हायेत!चढ-उतारलें ब्रेकनां खेय व्हये!मांगे-मव्हरे लोकेस्न्या सायकली ऱ्हायेत!गाड्या मोट्रा ऱ्हायेत!ब्रेक लाग्ना तें ठिक नई तें मंग मव्हरनाले धडक मारी निंघी जावानं व्हतं!मांगे दखी-दखी तो भी उलट्या-सिद्या गाया टिकाडी मव्हरे निंघी जाये!चोरनां मायेक चोट्टा व्हयी आयकी लेवू!ड्युटीवर उशीर नको म्हनीस्नी आखो जोरबन पायडल मारतं ऱ्हावू!येयवर कामन्हा ठिकाने भिडी जाऊ!माले तें लंगडी चालायीस्नी सायकलवर बठता उनचं नई,जमनं भी नई!घोडावर बठो तशी टांग मारी बठीस्नी एक पाय जमीनवर, दुसरा पायघायी पायडलंवर जोर दिसनी सायकल मव्हरे चालतं ऱ्हाये!🌷
सायकल चालावानी मज्याचं न्यारी व्हती!हडपसरथून खडकी १७ किलोमीटरं दूर व्हतं!ड्युटी सकायना साडे-सातनीं ऱ्हाये!मी घरथून सव्वा सवलें नींघू!येयवर ड्युटीलें
पोहचागुंता सायकलनां हॅण्डल आनी पायडलनां खेय रोज चालतं ऱ्हाये!घामेंघूमं व्हयी जावू!यंग्रट मनल्हे, जिद्दल्हे यंग्रट सायकल साथ संगत देतं ऱ्हाये!तोच रस्ता!तिचं सायकल!त्याचं मानसे,त्याचं रोजना वयखिना ठिकाने डोयाले दिखतं ऱ्हायेत!बठ्ठ डो्यांना पापनीम्हा घुसत ऱ्हाये!नजरे खालतून पयेत ऱ्हाये!दिन मवय्यालें साडे पाचं वाजता ड्युटी सुटे!💐
काम आनी सवसारनां व्हडा मोटन्हा नाडांमायेक ऱ्हास!सवसारनं पानी उपसी उपसी बैल थकी जास तरीभी नाडा तूटत नई!एक एक धागा मातर व्हडाई व्हडाई,तान पडीपडी तुटत ऱ्हातस!व्हडा यंग्रटं ऱ्हास!आक्सी पयाडतं ऱ्हास!व्हडा आढावू ऱ्हास!अशा नवकरी आनी सवसारनां व्हडाम्हा मी भी व्हडाई ऱ्हायंतूं!यंग्रट सवासरनां नांदे लागी मी भी यंग्रट व्हयी ऱ्हायतूं!🌷🙏
मानोस यंग्रटंपना करालें लाग्ना का कोनचं आयकत नही!आपलंचं घोड दामटंत ऱ्हास!"बठ्ठास्नी मन्हचं आयकाले जोईजे!"आशी त्या यंग्रटं सभावनां मानोसलें वाटतं ऱ्हास!कव्हयं-मव्हयं मी भी घरमा "तोंडं बंद"नां मार्गे चाली,कानघायी आयकतं ऱ्हासं!काही पोरें,गंजज मानसे उज्जी यंग्रटं ऱ्हातस!निस्त आडं आडं चालत ऱ्हातस!आढावूपना करी मव्हरे जानारंनां भी पाय व्हडी सोतांसंगे खड्डाम्हा पाडतंस!मव्हरला थरकं भराई त्यानं संगे कंडली जास!अशा यंग्रटसलें काय म्हनो आते!🌷
मी भी दुन्याना यंग्रट व्हतू!आडा-हुभा कथा भी मुल्लानं मोडी हुभी बाजरी करवत्या इयाघायी चरचर कापत फिरु!ना वागानां सवाद,ना बोलाना सवाद व्हता!पडता पानीम्हा पयेत फिरु!वल्ला व्हयी घरमा नाचतं फिरू!नाक लायी सोतानी बढाई मारत फिरू!मंग दोन-तीन दिनम्हा फनफनात थरक्या ताप आनी थंडीम्हा झावर गुंढायीस्नी खाटलावर पडी ऱ्हावू!हावू यंग्रटंपना मानोसना सभाव व्हयी जास,संगे मांगे चालत ऱ्हास!मी जितला उपादिखोर व्हतू तितला खड्डाम्हा जातं ऱ्हावू!हावू बांगटंपना व्हता का मंग?हयातीभर हावू यंग्रटंपना कोन सयीन करी बरं?धाकल्पनें माय-बाप,भाऊ-बहिनीस्नी सयीन करा!मव्हरे लगीन व्हयनं!खटलानी सयीन कर!कामनां ठिकाने बठ्ठा बरोबरीना जोडीदारस्नी सयीन करा!मव्हरे घरमा आंडोरं-आंडंरीस्नी सयीन करा!पोरेंस्ना लगीनयावं व्हयी ग्यात!घरमा भायेरथीन व्हवू-बेटी येल सें!ती भी सयीन करी ऱ्हायनी!ऱ्हायी सुयी यायी-भायी भी मन्हा यंग्रपना सयीन करी लेतस!आते नात-नातू सेतस!या नात्रे तें मन्हातून चार पाय मव्हरे जाईसनी येडायीपना
करतसं!
नातू इतला यंग्रट सेतंस तें माले बठ्ठा म्हंतंस,"तुम्हना नातू तुम्हनाथून चार पाऊल मव्हरे सेतंस!तुम्हनाचं गुन ली मव्हरे जायी ऱ्हायनात!तुम्हना यंग्रटपना हुभेहूभ नात्रे लिसनी चाली ऱ्हायनात!"... मी काना डोया करी मव्हरे निंघी जास!मी यंग्रट व्हतू, बांगट व्हतू!आढावू व्हतू!आते धयेडंपनें नात-नात्रेस्ना संगे हिरी-फिरी ऱ्हायनु!नाता-गोता,आली-गलिना खुशाल म्हंतंस, "तुम्हना नात्रे भलता यंग्रट सेतंस हो!कोनवर सेतंस यां?"मी त्यास्नागंम मटमट दखी खिसाना व्हयी मव्हरे निंघी जास!यंग्रटपना संगे फिरत ऱ्हास का मंग? मसनें गव्हऱ्या जावालोंग संगे मांगे ऱ्हानारा यंग्रटपना मानोसनीं वयख ठी जास!💐
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*************************
... नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४१२०२८)
मो.नं-९९२३९७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१८जुलै२०२३
Comments
Post a Comment