माझी आई अशीच आहे (भाग-२१)

माझी आई अशीच आहे
         (भाग-२१)
💐🙏💐🙏💐🙏💐
***********************
... नानाभाऊ माळी 

सर्वांची आई गगणाहून विशाल असतें!माझी आई देखील अशीच आहे......कसं ते बघा.....

आई काय असतें,अशा मुलांना विचारा ज्यांची आई बालपणीच देवाघरी गेलेली असतें!आई काय असतें अशा मुलांना विचारा ज्यांचें आई-वडील दोघेही नोकरीला असतात,संगोपन पाळणाघरात होत असतं!मुलं ममतेला, प्रेमाला दुरावलेली असतात!आई काय असतें अशा मुलांना विचारा जी निराधार असतात,अनाथाश्रमात राहातात!आई नावाचं हक्काच कैवल्यधाम त्यांच्या भाग्यात नसतं!आई काय असतें अशा मुलांना विचारा ज्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला असतो!दोघांच्याही प्रेमाला पारखे झालेली मुलं मनाने खचलेली असतात!आतून हिंसक होऊ पाहतात!बालपणीचं अशा समस्यांना सामोरे जाणारी मुलं आईच्यां ममतेला दुरावलेली असतात!आई शिवाय हृदयाचं जाणून घेणारं जवळचं असं कोण असतं बरं ? कोमल, अजाणत्या वयाच्या उमलणाऱ्या अशा कळ्यांना मायेने कुशीत घेणारे असं हक्काचं देवघर भेटतं नाही!... तेव्हा तेंव्हा जाणीव होतें!देवाने या मुलांवर खूप मोठा अन्याय केलेला आहे!आई नावाचं 'हृदय' हिरावून घेतलं आहे!मायेच्या सावली पासून दूरावलेली असतात!...🌹

... बघा नां आपल्या अनेक घरात 'आई' आपल्या जवळचं असतें!पण तिची साधी विचारपूस देखील होत नसते!मुलांना तिने उपसलेलं कष्ट दिसतं नसतं!तिची किंमत कळत नसते!अशी मुलं आईच्या कोमल,विशाल सावलीपासून परकी होतात!आईला दूर लोटणारे असें अनेक नतभ्रष्ट मुलं या जगात दिसतात!ती सुखी असतील का हो?? 🤔

आई जन्म देणारी!ममता ओतणारी!काळीज देणारी,प्रेम देणारी!क्षणोक्षणी संकटमोचक होणारी!कधी मुलांच्या चुकीमुळे नवऱ्याचा देखील मार खाणारी,सहनीय आई जगात एकदाच भेटतं हो!श्रेष्ठ असतें!हे पूजनीय दैवत आपल्या जन्माच सार्थक असतं!जगातील अनेक धाम,देवदर्शन करून आल्यावर आईच्या चरणावर कोणी डोक ठेवत नसतील तर ते धाम व्यर्थ असतं!आईला जाणतां जाणता अर्थ जन्म घेत असतो!आपल्या जीवनाला सार्थकं करणारी आई आपल्या जीवनाची सुरक्षा कवच असतें!तिच्या आशिर्वादाचं हे कवच वक्रदृष्टी ठेवणारे कोणीही भेदू शकत नाहीत!जगातील पहिला गुरु असणाऱ्या  मातृ देवतेच्या पायांवर आपलं आयुष्य ठेवल्यावर मिळणारं पुण्याचं समाधान अलौकिक असतं!माझी आई अशीच आहे!💐

आईच्या पावलांपासून देवदर्शनाची सुरुवात होत असतें!आई या सर्वं तिर्थांची उगमस्थान असतें!अशा तीर्थप्रसादीकं जीवंत मूर्तीला टाळून कितीही तीर्थाटन केलं तरी शून्य असतं!सर्वं सारांचीं अर्क असणारी आई देवपायरीची प्रारंभ असतें!मी विशाल प्रारंभाची पूजा करीत असतो!जगातील स्वामींत्व असेलेलं देवपण आई जवळ असतं!मी आईच्या पायांवर मनोभावे डोक ठेवतो!आई आपल्या डोक्यावर हात ठेवते!आशीर्वाद देतं असतें!त्या आशीर्वादाची शक्ती महान असतें!अशा पवित्र स्थळी देवपूजा होत असतें!देवही नतमस्तक होत असतात!आपल्या आईसं जीवनदाता म्हणावे!सर्वांची आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!💐

असं म्हणतात की आपण हे भाड्याचं शरीर घेऊन आलेलो असतो!खूप खूप गर्व करीत असतो!मालक तर वेगळा असतो!तो हे घर कधी ताब्यात घेईल सांगता येत नसतं!वेळ आणि काळाच्या संगतीने आपण भाडे तत्वावरील या देहाचा मिथ्याभिमान करतो!बाह्य सौंदर्याचा  अतिअभिमान अंतरंगात दुफळी मजवतो अन विनाशाच्या खोल खाईत ढकललें जातं असतो!सार्थ जीवनमार्ग दाखवणारी जन्मदात्री संस्कार देतं आपलं जीवन समृद्ध करीत असतें!ती चिखलात कमळ फुलवीत असतें!मातीच्या गोळ्याला आकार देतं असतें!भाड्याच्या शरीराची स्ववागणुकीतून आदर्श घालवीत उभी असतें!अशा विशाल हृदयी मातेला कुठलाही मोह नसतो!तिला काळजी असतें मुलांच्या उज्वल भवितव्याची!स्वतः झिजत, क्षर होत जगत असतें!मुलांना घडवत असतें!आई प्राणवायू होत असतें!कधी मुलांसाठी प्राणही देते अन आदर्श घालून देते आपल्या भाडेकरू देहाचा!आई गगणाहून विशाल होत जाते!अशा मातांना वंदन करतो!माझी आई देखील अशीच आहे!

आईचं छत्र छत्री सारखे असतं!स्वतः पावसात भिजून मुलांना भिजण्यापासून वाचवीत असतें!आई तासांवर नसते!आई दिवसांवर नसते!आई जिंदगीभर,आयुष्यभर राबत असतें!आपल्या जन्मापासून राबत असतें!स्वतः संकटं झेलत आपल्याला संकटातून,दुःखातून, आजारपनातून निरनिराळ्या समस्यातून वाचवीत असतें म्हणून आई मुलांना,वडिलांपेक्षा निकटची असतें, जवळची असतें!आई मुलांचं हे पवित्र नातं युगायुगे चालतं आलेलं आहे!म्हणून देवीरूप सर्वं मातांना वंदन करतो!माझी आई अशीच वंदनीय आहे!💐

राग..माणसाला चिकटलेला अवगुण असतो!राग अवगुणी असूनही गर्विष्ठ असतो!अशा गर्विष्ठ रागास दूर पिटाळण्यासाठी 'आई' नावाचं दैवत  ईश्वराने पाठवीलं असतं!आई जन्मगुरु असतें!मुलांना संस्कार औषधाची गोडी लागावी म्हणून आई कधीतरी कडू बोलत असतें!हक्काने रागावते!छोटी -मोठी शिक्षा देखील देत असतें!रागवणाऱ्या आईचा लळा लागतो!आई कितीही रागावली तरी मुलं तिच्या कुशीत जाऊन बसत असतात!कारण आई हक्काची जागा असतें!आई जीवंत झरा असतें!

ज्याच्यावर आपण हक्काने रागवतो त्यांच्यावरचं आतून,हृदयातून प्रेम करीत असतो!आई तेचं करीत असतें!आईचे संस्कार करीत असतात!भल्यासाठी रागावणं ही तर आपली संस्कृती आणि परंपरा आहे!मुलं चुकलीत तर आई त्यांच्याच भवितव्यासाठी रागवत असतें!आई जन्म देतं असतें!पोटच्या गोळ्याच्यां हितासाठी रागावून भवितव्य सुरक्षित करीत असतें!आई सतमार्गांवरील पहिला गुरु असतें!बालपणी आईचा बोट धरून मार्गक्रमण सुरु होत असतो!आई अनुभवसंपन्न ऊर्जास्रोत असतें!शक्ती असतें!मुलांना बरे-वाईट समजून सांगणारी,ओळख करून देणारी दैवी दूत असतें!रागाच्या आतील कप्यात मातृहृदय दडलेलं असतं!बालपणीच्या गोळ्याला आकार देणारी आई ईश्वररूप असतें!सहहृदयी प्रतिबिंब असतें!मुलांवरती ममतेने बालसंस्कार करीत असतें!आई संस्कारदात्री असतें!जगातील सर्वं मातांचें उपकार ऋण व्यक्त करून फिटणारे नसतात!मी नमस्तक होत वंदन करतो!माझी आई देखील अशीच आहे 💐
    💐🙏💐🙏💐🙏💐🌹
    ************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१३जुलै २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)