हिमालयाच्यां चारधाम यात्रेतील मंतरलेले दिवस

💐हिमालयाच्यां💐
चारधाम यात्रेतील मंतरलेले दिवस
💐💐👏💐💐👏💐💐👏
****************************
... नानाभाऊ माळी

माणूस स्वप्न पाहात जगत असतो!कधी कधी स्वप्न सत्यातही उतरत असतं!तर कधी स्वप्न न पाहताही सत्याला स्वप्न म्हणतं असतो!आम्ही असचं सत्य स्वप्न जगलो!स्वप्नातही शक्य होणार नाही असं सत्य जगलो! स्वर्ग आणि कैलास दोन्ही ठिकाणी साक्षात जाऊन पृथ्वी लोकात परत माघारी आलो!हे स्वप्न तर नव्हते नां?असा भास होत होता!कधी चार धाम यात्रेला जाऊ असं मनातही आलं नव्हतं! बालपणीचें शाळेतील वर्ग मित्रांच्या आग्रहाने साक्षात देवभूमीवर जाऊन आलो!हिमालयाच्या कुशीत जाऊन आलो!हो..आम्ही चार धाम यात्रेला जाऊन आलो!यमनोत्री,गंगोत्री, केदारनाथ,बद्रीनाथ धाम करून आलो!मी स्वप्नात तर नव्हतो ना?मला भास होत आहे!

उत्तराखंडचीं देवभूमी!तेथील निसर्ग!तेथील माणसं!तेथील नद्या!तेथील पर्वत!तेथील माती!सर्वं सर्वं  डोळयांतून हृदयात बांधून आणलं आहे!निसर्ग माणसाचा मित्र असतो!निसर्गात माणूस एकरूप होत असतो!निसर्ग किमयागार असतो!त्यात धर्म आणि अध्यात्म निवासाला असतात!धर्माची खरी ओळख निसर्ग करून देतं असतो!निसर्ग सानिध्यात अध्यात्म जन्म घेत असतं!शांत, एकांत अन खळखळून वाहणाऱ्या नदीकाठी मानवी मनाला प्रसन्नता लाभतं असतें!तेथे धर्माचा अविष्कार जन्म घेत असतो!मनाला शांती मिळण्यासाठी एकांत ठिकाण फुललेला निसर्ग असतो!अशा निसर्ग सानिध्यात भारतीय प्राचीन मंदिरे आणि धाम आहेत!💐

निसर्गाशी मैत्री केली तर माणसाचा सर्वात जवळचा अन विश्वासू मित्र निसर्ग असतो!त्यावर भरभरून प्रेम केलं तर तो ही दुपटीने आपल्यावर प्रेम करतो!त्यात श्रद्धा नावाचं अढळ स्थान विशाल रूप धारण करीत असतं!ते पावित्र्याचं सुंदर मंदिर बनतं असतं!त्या मंदिरात अढळ विश्वास अन श्रद्धा नावाचा देव,ईश्वर मूर्तीतून प्रकट होतो!त्याच्या दर्शनाने मनाला समाधान आणि शांती मिळते!अशा श्रद्धेपाशी माथा टेकण्यास मिळाले हे मी माझं भाग्य समजतो!

हिमालयाच्या उंच उंच रांगा गगणाला स्पर्श करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत!उंच शिखरे बर्फाची चादर पांघरून उगवत्या सूर्य किरणातून सोनेरी रूप धारण करून मन मोहित असतांना अति थंडीचा कडाका मानवाला आव्हान देतं असतें!शरीर गोठवाणाऱ्या बर्फाच्छादित उंच शिखरावर आपण पोहचतो तेथे ईश्वराचं मंदिर असतं!त्या मंदिरातील देवत्वाची पूजा आपण करू लागतो!अशा देवत्वाच्या चरणी स्वतःस अर्पण करण्यासाठी गेलो होतो!मी हिमालयातील देवाकडे दर्शनाची आसं,अभिलाषा अन ओढीने गेलो होतो!मी चार धाम यात्रेला गेलो होतो!स्वतःस त्या विशाल रूपासं अर्पण करण्यासाठी गेलो होतो!माझ्यातील गर्व हरण्यासाठी मी निसर्ग सानिध्यातील विशालतेच्या चरणी गेलो होतो!💐

मी विशालकाय यमुना नदीच्या उगमाला नतमस्तक होण्यासाठी गेलो होतो!मी विशाल-विस्तीर्ण गंगा मातेच्या उगमस्थानी माथा टेकण्यास गेलो होतो!मी मंदाकिनी सरितेच्या उगमस्थानी गेलो होतो!मी अलकनंदा नदीच्या उगमस्थांनी तिची कृपादृष्टी घेण्यासाठी गेलो होतो!हिमालयाच्या कुशीतून जन्म घेणाऱ्या!बर्फ वितळून खळखळून पाणी वाहणाऱ्या देव नद्यांनां नतमस्तक होण्यासाठी गेलो होतो!मी उत्तराखंडच्या पावन-पवित्र देव भूमीच्या कुशीत 'मी'पन हरण्यासाठी गेलो होतो!💐

मी निसर्गदेवतेच्या,महाविशालतेच्या बिंदू स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो!मी उंच उंच गगनाला भिडणाऱ्या देवदार वृक्षानां डोळ्यातून हृदयाशी ओढण्यास गेलो होतो!मी प्रचंड खोल दरी अन उंच कडयांना माझ्या नजरेत एकवटण्या गेलो होतो!विशाल जंगल हिरवळीचा अलौकिक खेळ पाहण्यासाठी गेलो होतो!मी चार धाम यात्रेसाठी हिमालयाच्या कुशीत गेलो होतो!

मी येतांना काहीही आणलं नव्हतं!सोबत काहीही घेऊन जाणार नाहीये!मी मर्त्य शरीर सोडून काही दिवसांनी, काही वर्षांनी निघून जाणार आहे!पण तत्पूर्वी मला मिळालेले,मी माझे श्वास परमात्म्यास अर्पित करण्यासाठी देवभूमीत गेलो होतो!मी चार धाम यात्रेस गेलो होतो!मी बद्रीनाथ
 धामास गेलो होतो!मी भगवान केदारनाथ धामास गेलो होतो!प्रचंड थंडी आणि पावसाच्या लहरीपणाला जिंकण्यासाठी,मी मलाच जिंकण्यासाठी यमनोत्री अन गंगोत्री धामास गेलो होतो!निसर्ग उदारतेला नतमस्तक होण्यासाठी मी हिमालयाच्या विशाल रूपाचं दर्शन करण्यासाठी गेलो होतो!💐

कडाक्याच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत गरम पाण्याच्या कुंडात डुबकी मारण्यासाठी चार धाम यात्रेला गेलो!गरम पाण्याच्या त्या दानाला तरी काय म्हणावं? पवित्र धामाच्या स्थळी गरम पाण्याचा उगम असावा?अशा चमत्काराला नतमस्तक होण्यासाठी मी चार धाम यात्रेला गेलो होतो!मी यमणोत्रीच्या गरम कुंडात अंघोळ केली होती!मी केदारनाथच्या पहिल्या पायरीवरील गौरीकुंडातं अंघोळ केली होती!मी नर-नारायण या दोन डोंगराच्या कुशीत वाहणाऱ्या अलकनंदा नदीकिनारी असणाऱ्या बद्रीनाथ भगवान यांच्या स्थळी गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केली होती!विश्वास अन श्रद्धेच्यां अनाकलनीय चमत्कारास नतमस्तक होण्यासाठी बद्रीनाथ धामास गेलो होतो!जिथे उणे तापमानाची नोंद होतं असतें अशा ठिकाणी गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ करून मी आयुष्यभर केलेलं पाप च्छालनासाठी भक्तीच्या त्या पवित्र देवभूमीतं गेलो होतो!

'मी' आणि 'स्व'ला त्या विशालकाय विधात्यास अर्पित करण्यासाठी चार धाम यात्रेला गेलो होतो!गंगा,यमुना, मंदाकिनी,अलकंनंदा या देव नद्यांच्या उगमावर अमृतसार घेण्यासाठी गेलो होतो!पावित्र्याच्या अलौकिक उगमावर जाऊन मन तृप्तीचा सागर सोबत घेऊन आलो!चार नद्या,चार माता आहेत!त्या भारतीय अध्यात्माच्या मूळ आहेत!मूळ
 उगमापाशी जाऊन डुबकी मारण्याचा अविस्मरणीय आनंद या जन्मी घेता आला!माझ्या जन्मदेती मातेच्या उदरातून जन्म घेणारा मी, अनंत जन्मीचा ऋण घेऊन जगणारा मी,चारही धामाचं पवित्र जल मातेच्या चरणी अर्पुन थोडं तरी पुण्य घेण्याचं भाग्य ऋणाच्या उतरायीतील पहिली पायरी समजतो!माझ्या जन्म देणाऱ्या मातेस नतमस्तक होतं असतांना भारत भूमीच्या कुशीत जन्म घेण्याचं भाग्य मला मिळालं, मनोभावे वंदन करीत येथेच थांबतो!
💐👏💐👏💐👏💐👏
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
(चार धाम यात्रा प्रवास
१८मे२०२३ ते ३०मे २०२३)
दिनांक-१२जुलै २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)