आनंदी शांत संयमी गझलकाराचा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस!
आनंदी शांत संयमी गझकाराचा,
🌹व्यक्तिमत्वाचा वाढदिवस🌹
🌷🎂🌷🎂🌷🎂🌷🎂
***************************
... नानाभाऊ माळी
....वाढदिवसाच्या निमित्त आयोजित या भव्य मैफिलीच कान तृप्त करणाऱ्या कविता...सन्मान होता एका विद्वानाचा!वाढदिवस मित्र जन्माला घालत असतो!नाजूक धागा जन्माला घालीत असतो!धागा धागा विनीत मैत्री घट्ट होत जाते!🌹
५२वर्षांचे गझलकार बाळासाहेब गीरी हे मामासाहेब मोहोळ शैक्षणिक संस्थेत ट्रस्टी आहेत!सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत!मैत्री निखळ झऱ्यासारखी असतें!बाळासाहेब हे अतिशय साधे व्यक्तिमत्व आहे!शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहेत!कवी आणि गझलकार म्हणून सरांचं योगदान विशाल आहे!🌷
वाढदिवस माणसं जोडीत असतो !वाढदिवस मित्र जोडीत असतो!वाढदिवस आनंदाचं झाड असतं!आनंद होण्यासाठीचं वाढदिवस असतो!मुळातच हा गौरव व्यक्तीच्या कार्याचा आढावा असतो!आज गौरव मूर्ती बाळासाहेब गीरी सरांचा वाढदिवस म्हणजे त्यांनी कमावलेली माणसं आहेत!अनेक कविंच्या कवितेतून आदरणीय बाळासाहेब यांचं व्यक्तिमत्व खुलत गेलं,फुलत गेलं!कविंची मैफिल गौरव करीत होती!🌹
आज रोजी प्रसिद्ध कवी आणि गझलकार मा बाळासाहेब गीरी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील एस एम जोशी भवनातं भव्य काव्य मैफल आयोजित केली होती!मैत्र जीवाचे आयोजक कवी चंद्रकांत जोगदंड आणि मित्र परीवारांनी मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित केला होता!🌹
"सुखदुःखाचा शेवट असतो असाच मित्रा ... या जगात जगण्यासाठी साथ असावी मित्रा!".. अशी गझल मैफिल रंगत गेली!मैत्री आणि वाढदिवसाचीं ही रंगत ऐकण्या अवघे एस एम जोशी भवन मंत्रमुग्ध झाले होतें!कवी रसिक असतो!कवी माणूस असतो!कवी समाजाचं खणखनत नाणं असतं!नाणं वाजतं असतं!समाज मनास जागृत करीत असतं!नाणं समाजास ढवळून काढीत असतं!🌹
आज बाळासाहेब श्रोता म्हणून बसले होतें!त्यांचं रसिकरुपी मन कविंच्या कविता ऐकत होत!कवी व्यवहार शून्य असतो असं जग म्हणतं असतं!पण कवी उत्तम प्रबोधनकार असतो!अशा प्रबोधनकारी कवीचा वाढदिवस कवितेतून सन्मान रूपाने प्रसवत होतं!माणसं पेहरणारा कवी, गझलकार,शिक्षण महर्षी बाळासाहेब गीरी यांचा वाढदिवस डोळे आणि कान तृप्त करणाऱ्या कवितेतून साजरा होतं होता!🌹
अनेक नामवंत कवी,गझलकार, रचनाकारांनी या मैफिलीत आपल्या रचनांतून नात्यांचा पाऊस पाडीत राहिली!पावसाचीही रिमझिम सुरु होती!मन चिंब होतं राहिलं!बाळासाहेबांचां वाढदिवस साजरा होतं राहिला!मैत्री जीवाचं हे नातं गुफिंतं गुफिंतं वाढदिवसाच्या मैफिलीत सर्वच एकजीव झाले होतें!
आगळ्या वेगळ्या काव्य मैफि्लीतून वाढदिवस साजरा होतं राहिला!.. आनंद शब्दफुले काव्यात गुफुंनं अखंड काव्य माळा अर्पित होतं राहिल्या!आदरणीय बाळासाहेब गीरी सर चिंब भिजत राहिले!संपूर्ण मैफिल काव्यात भिजत राहिली!माणसं वेचणारा का गझलकार प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसला!
काव्य मैफिलीत अतिशय सुरेख सूत्रसंचालन करीत रानकवी वनशिव सरांनी रंगत वाढवली!असा सतत आठवणीतल्या कप्प्यात राहणारा वाढदिवस साजरा होतं राहिला!माणसं कवी होतं राहिली!कवी माणूस होऊन हृदयात निवासाला बसून आनंद घेत राहिला!अशा या भव्य काव्य मैफिलीत तृप्तीचां क्षण येऊन ठेपला!गोड वाढदिवसाचीं सांगता स्वतः बाळासाहेब गीरी यांच्या सुंदर शब्द सुमनांनी झाली!🌷
🌷🎂🌷🎂🌷🎂🌷🎂
**************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो नं -९९२३०७६५००
दिनांक-१०जुलै २०२३
Comments
Post a Comment