माझी आई अशीच आहे!.

माझी आई अशीच आहे
         (भाग-१९)
💐💐💐💐💐💐💐
**********************
... नानाभाऊ माळी 


....आई आणि माऊली दोन्ही एकचं आहेत!आई जन्म देऊन जीवन साकार करीत असतें!माऊली भक्ती रसात अमृत टाकून जीवनाला आकार देतं असतें!आमची आई,माझं परीसपान आळंदीला आली होती!माय.. माऊलीच्या भेटी आली होती!आयुष्यभर कष्टाचा देव केलेली आई,कष्टातून भक्तीअमृतापाशी आली होती!संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधीला माथा टेकविण्यास आली होती!
आईपण विसरून देवपणाच्या कुशीत आली होती!सारं आयुष्यचं दान दिलेली आई भक्तीअमृत कुबेरापाशी आली होती!निखळ झरा ज्ञान सागराजवळ पोहचला होता!शालस,सौज्वळ,सात्विक देवत्वाजवळ आलं होतं!
भक्तीसागरात डुंबण्यासाठी आई ज्ञानाईपाशी आली🌹

......माऊली!माय!हृदयात खोलवर जाऊन बसलेली कोमल,शांत,शीतल धुगधुगणारी दिव्य ज्योत!दिव्य ज्योती संत ज्ञानेश्वर माऊलींची!!... आळंदीत माउलींच्या भेटीसाठी, दर्शनाला लाखोंनी भक्तजन येत असतात!जिथे परकेपणा गळून जातो तिथे माऊली नावाचे अंकुरीत होणारे ओले-ताजे शब्दभाव जन्म घेत असतात!अंकुरीत होतं असतात!माऊली माझ्या आई सारखीचं!हक्काने तिच्या कुशीत बसून आपली गाऱ्हाणी सांगावी!डोळयांतंल्या आसवांतं बसवून अंघोळ घालावी अशी हृदयातली माऊली!मला जन्म देणारी "माय"माझी आई,माऊलीच्या दर्शनाला आली होती!🌷

.....गर्भगृहातील माऊलींच्या समाधीवर आईने डोकं ठेवलं!दोन माऊली,मायमाऊली एकमेकांना भेटून एकरूप झाल्या होत्या!आई भाव भक्तीत तल्लीन झाली होती !आई माऊलीला भेटली!कडकडून भेटली!समाधीवरील हातांच्या स्पर्शातं माऊली जाणवत होती!माझी आई संतश्रेष्ठ साक्षात ज्ञानमाऊलींच्यां समाधीवर डोकं ठेवून काही क्षण स्वतःचं आईपण विसरली होती!माऊली दर्शनातं एकरूप झाली होती!समाधीवर फुलं आणि तुळशीचीं पानं वाहिली होती!समाधी गर्भगृहात भाव भावात एकरूप झाला होता!भक्ती श्रद्धेतं पोहत होती!श्रद्धा अतूट होती!आई माऊलीला डोळे भरून पाहात होती!माऊली विश्वरूप होती!भरलेल्या डोळ्यात दिसतं होती!आई तान्हूली झाली होती!🌹

.....आम्ही दिनांक ०४ मे२०२३ रोजी आईसोबत आळंदीला गेलो होतो!भाव भक्तीत चिंब भिजण्यास गेलो होतो!माझी १०० वर्षांची.....आई माऊलीच्या दर्शनानें हर्षभरीत झाली होती!देहभान विसरली होती!
हर्ष ऊल्हासनें फुलं वाहिली होती!माझी आई आईपण विसरून माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून माऊलीरुपी आईस पाहात होती!आई भावभक्तीत स्वतःसं विसरली होती माझी साधी भोळी आई माऊलीच्या दर्शनाने आनंदित झाली होती!🌷

...जे जवळचे असतात!हृदयाचे असतात!जन्मापासून ज्यांच्यावर हक्क असतो अशा व्यक्तीतं आपण हक्काचा ओलावा शोधित असतो!त्या ओलाव्यात आपणास "आई" दिसतं असतें!आई ब्रम्हरूप असतं!आई नावाच्या दैवी शक्तीत सगुणांची मांदियाळी असतें!कधी कधी आमच्या सारखी भौतिक सुख लालसेत बुडालेली माणसं....आपल्या आईवर सतत रागवत असतो!का? तर,'तू सर्वांनाचं पाहते!आई तू अशी कशी? तें एवढे बोलून गेले तरी त्यांचाचं ओढा तूला आहे?'... असं काहीबाही आपण बोलतं असतो!..असं बोलणं ऐकणारी आई सर्वांच्याच हितासाठी झिजत असतें!राबत असतें!पोटाच्या सर्वचं गोळ्यांना आपलेसे करीत असतें!सर्वांना ममतेने जवळ घेत असतें!माझी आई अशीच आहे!इतर आईंसारखी आहे!🌹

....आई चंदनासारखी असतें!झिजून झिजून सुगंध देत असतें!सर्वांनां ममतेच्या कुशीत घेतांना समान न्यायाने पाहात असतें!तिच्या मनात स्वार्थ कधीही येत नसतो!सर्व मुलांना सारखाचं न्याय देतं असतें!आईने जन्म दिला म्हणून आपलं अस्तित्व असतं!आपल्या जगण्यात आईचं ऋण असतं!आई नावाच्या या पवित्र देवतुळशी सभोवती सतत फेऱ्या माराव्याशा वाटतातं!नतमस्तक व्हावेसे वाटतं असतं!माझी आई देखील तुळस आणि चंदना सारखीचं स्वतः झिजतांना सर्वांना सुगंध देतं आलेली आहे!माझी आई अशीचं आहे!

.....आशीर्वादाचं वटवृक्ष असलेलं 'आई' नावाचं विशाल झाड सावलीसाठीचं उभे राहात असतं!जमिनीत खोल मूळ्या घेऊन उभे असतं!सर्व नात्या गोत्यांच्या मध्यभागी असतं!आईचं प्रेम जगात सर्वात मोठं असतं!म्हणूनचं आई...वंदनीय..पूजनीय असतें!आई अन्नपूर्णा रूपात दिसते!लक्ष्मी रूपात दिसते!जगदजननी असलेली आई आपल्या पदराच्या गडद सावलीत सर्वांनाचं घेत असतें!आपल्या कुशीत घेत असतें!घरा घरात अशी आई असतें!माझी आई अशीच आहे!🌹

....आपल्या उगवत्या क्षणी आई उन्हात असतें!आपल्या उन्हातंल्या क्षणी आई मावळतीला असतें!खूप कष्ट उपसून थकलेली आई असतें! उन्हाचा सूर्य अंगावर घेत आई मावळतीच्या दरवाज्यापाशी उभी असतें!मावळतीच्या अंधुक उजेडात आईचे आशीर्वाद घेत,थकलेल्या देहाचीं सेवा करायची असतें!अंधाराच्या उजेडात आशीर्वाद घेत थकलेल्या अंधाराच्या डोळ्यात कष्टाचं पाणी पाहायचं असतं!त्यासं नमन करीत राहावे!आईची संध्याकाळं सुखावह आनंदी व्हावी म्हणून आईला आनंद द्यायचा असतो!थकलेल्या देहास आनंदाने आधार देतं आई नावाच्या पुण्य देहास आपण समर्पित व्हायचं असतं!हे पुण्य जगातील वजन काट्यातं बसत नाही एवढे मोठं असतं!सर्वात श्रेष्ठ असतं!आईच्या सेवेसाठी देव देखील उभे असतात!सर्वांची आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!🌹

....जन्म मरणाच्या खेळात आई नावाची जन्मदाता जगात एकच असतें!रक्त सांडून जन्म देणारी आई एकटीच असतें!आपल्या संपूर्ण जीवनाची दाता अन शिल्पकार असलेल्या आईच्या डोळ्यात आपल्यामुळे अश्रू येत असतील तर आपल्यासारखा जगातील सर्वात मोठा गुन्हेगार आपणच असतो!आईच्या दीर्घायुष्यासाठी तिला आनंदी ठेवून जपणे,काळजी घेत सुखाचे चार घास तिच्या मुखी घातले तर त्यासारखे महापुण्यकर्म जगात नसतं!आई दैवतं आयुष्यातून एकदाच मिळतं असतं!अशा दैवताचरणी आपण समर्पित होऊन आपलं जगणं कैलास,वैकुंठ अन स्वर्ग करून घ्यावे!येथेच पृथ्वीवरती पुण्य कमावून घ्यावे!🌹
💐💐💐💐💐💐💐
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
         ७५८८२२९५४६
दिनांक-०९जून २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)