इंद्रायणी काठी संताच्या चरणी

इंद्रायणी काठी संताच्या चरणी 
💐💐💐💐💐💐💐💐
*************************
.... नानाभाऊ माळी 

....संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिनांक ११जून रोजी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान ठेवते आहे! वारीचीं प्राचीन परंपरा संतांनी सुरु केली!देवं आणि भक्तांतील अंतःकरण सांधण्याचं अमृतकर्म संत करीत आहेत!पांडुरंग भेटीची ओढ सतत व्याकुळ करीत असतें!माऊली आणि आई एकचं आहे!माझी आई माऊली होऊन सतत आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवून असतें!🌷

आज रविवार दिनांक ०४जून २०२३!सकाळी अलंकापुरीत पोहचलो!संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीवर डोक ठेवलं!चारधाम यात्रेचं संचित माउलींच्या चरणी समर्पित केलं!साक्षात विष्णू अवतार चरणी समर्पित झालो!आजान वृक्षाचं दर्शन घेतलं!अजान वृक्षाखाली अनेक ज्ञानवंत वाचन करतांना दिसलीतं!देवंग्रंथ वाचन,मननातं
एकचित्त दिसली!माउलींच्या अलंकापुरीत माझी आई स्वतः माउलींच्या समाधीवर डोकं ठेवून माऊली भजत होती!धन्य धन्य देवा म्हणत होती!आई 

जगाच्या कल्यानां जगद्गुरुनीं स्वतः अतिशय कष्ट उपसले!.. वारी पंढरपूर दिशेने प्रस्थान करणारं आहे!आम्ही आमच्या १०० वर्ष आईच्या संगे माउलींच्या दर्शनाला आलो!दर्शन घेत असतांना माऊलीस अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली, "माझ्यातील वाईट तें काढून फेक देवा!माझ्यातील अशुद्ध तें इंद्रायणीतं धुवून टाकले देवा!तू भक्तवत्सल आहेस!कृपा कर देवा!"

ज्ञान माऊलीचं दर्शन घेतलं!आळंदीहून देहू गावं विश्वसंताकडे निघालो!जगद्गुरुंच्या चरणी माथा टेकण्यास गेलो!संत नारळासारखे असतात!आतून गोड खोबरे तर बाहेरून टणक कवटी सारखे असतात!संत तुकोबांचीं सगुण निर्गुण भक्ती महिमा जगानें स्विकारली आहे!महाराजांचं जीवन कार्य भक्तीचां अलोट सागर आहे!त्यातून एक एक मोती बाहेर काढत राहायचा!सत्संगाचां आदर्श घेत राहायचा!संत तुकोबांचं संपूर्ण जीवन "गाथा"आहे!गाथा सत्संगासमोर माथा टेकवायला शिकविते!आम्ही जगद्गुरूंच्या चरणी माथा टेकवायला आलो!साधू,संत,मुनी सामान्यांना दृष्टी देत असतात!आम्ही संतचरणी माथा टेकण्यास आलो होतो!हृदयातून 'स्व'अर्पित करण्यासाठी आलो होतो!संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो!आताच पावसाने हजेरी लावली!झिमझिम पावसात जगद्गुरूंच्या चरणी माथा टेकवला!अन जीवनासाठी सदगुणांची मागणी केली!💐💐
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
(संत तुकारामांच्या सानिध्यातून बाहेर आलो )
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-०४जून २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol